agriculture story in marathi, agrowon, exotic vegetables farming, nagthane, satata | Agrowon

वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती
विकास जाधव
बुधवार, 12 जून 2019

वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील सुनील प्रल्हाद काटवटे यांनी आपल्या केवळ दोनच एकरांत संपूर्ण परदेशी भाजीपाला (एक्सॉटिक) शेती फुलवली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पाच ते पंधरा गुंठे क्षेत्र निवडून वर्षभरात सुमारे सात ते आठ प्रकारचा भाजीपाला घेण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. 
 
सातारा जिल्ह्यातील नागठाणे गाव आले पिकासाठी प्रसिद्ध आहे. ऊस व भाजीपाला शेतीसाठीही गावातील शेतकरी ओळखले जातात. उरमोडी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्याने नदीस बारमाही पाणी अडवले आहे. साहजिकच बागायती शेतीला भरपूर वाव मिळाला आहे. 

वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील सुनील प्रल्हाद काटवटे यांनी आपल्या केवळ दोनच एकरांत संपूर्ण परदेशी भाजीपाला (एक्सॉटिक) शेती फुलवली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पाच ते पंधरा गुंठे क्षेत्र निवडून वर्षभरात सुमारे सात ते आठ प्रकारचा भाजीपाला घेण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. 
 
सातारा जिल्ह्यातील नागठाणे गाव आले पिकासाठी प्रसिद्ध आहे. ऊस व भाजीपाला शेतीसाठीही गावातील शेतकरी ओळखले जातात. उरमोडी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्याने नदीस बारमाही पाणी अडवले आहे. साहजिकच बागायती शेतीला भरपूर वाव मिळाला आहे. 

शेतीचा अनुभव 
आले, ऊस या नगदी पिकांपेक्षा गावातील सुनील काटवटे यांनी परदेशी अर्थात एक्सॉटिक भाजीपाला शेतीची कास धरली आहे. सुमारे तीन वर्षांपासून त्यात सातत्य ठेवण्याबरोबर चांगले अर्थार्जनही करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी सुनील रोजंदारीच्या कामावर जायचे. मुंबई येथे वर्तमानपत्र पुरवठा व्यवसायाही त्यांनी केला. मुंबई येथे शेअर ट्रेडिंगशी संबंधित त्यांचा व्यवसायदेखील आहे. मिळत असलेल्या उत्पन्नातून शिल्लक टाकून दोन एकर जमीन त्यांनी खरेदी केली. शेतीचीच आवड असल्याने व्यवसाय भाडेतत्त्वावर देत २००७ च्या सुमारास ते गावाकडे आले. 

आले पिकापासून सुरवात 
मुंबई येथील व्यवसाय अडचणीत आल्यानंतर तोटा सहन करावा लागला होता. मात्र खचून न जाता शेतीवरच भर देण्यास सुरवात केली. सुरवातीला आले पिकाची १५ गुंठे क्षेत्रात लागवड केली. त्यातून १५ गाड्या (प्रतिगाडी ५०० किलो) उत्पादन मिळाले. दरही चांगला मिळून उत्पन्नही चांगले मिळाले. पहिला अनुभव समाधानकारक वाटल्यानंतर उत्साह वाढला. त्यानंतर काही वर्षे आले, ऊस ही पिके सुरू ठेवली. नावीन्याचा ध्यास असल्याने महामार्गालगत शेती भाडेतत्त्वावर घेऊन नर्सरी सुरू केली. यामध्ये फळझाडे, शोभिवंत व भाजीपाला रोपांची निर्मिती सुरू केली. यामध्येच झुकीनी, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, लाल कोबी, कांदा आदी प्रकारच्या परदेशी भाजीपाल्याची ओळख झाली. या भाज्यांचा कालावधी, अर्थशास्त्र, मार्केट यांची माहिती मिळवली. त्यातून आपणही हा प्रयोग करून पाहावा असे वाटू लागले. 

परदेशी भाजीपाला प्रयोग 
२०१५ मध्ये हिरवी व पिवळी झुकिनीची सुमारे १७ गुंठ्यांत लागवड केली. अनुभव नसल्यामुळे लागवड थोडी दाट झाली. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला. मात्र उपाय म्हणून दोन्ही सरींमध्ये आडवी नेट बांधून नियंत्रण मिळवले. या अडचणीतूनही साडेसहा ते सात टन उत्पादन मिळाले. किलोला सरासरी ४० ते ५० रुपये दर मिळाला. खर्च वगळता सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. 

या प्रयोगातून अन्य परदेशी भाज्यांच्या प्रयोगाविषयी आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर तीन वर्षांपासून परदेशी भाजीपाला सातत्याने घेतला जात आहे. यामध्ये झुकिनी, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, लाल कोबी, कांदा, लोलो, लीक आदी भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. सध्या दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने केवळ चेरी टोमॅटो, लाल कोबी व लीक ही पिके शेतात उभी आहेत. 

काटवटे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

  • वर्षभरात सुमारे सात परदेशी भाज्यांचे प्रकार, प्रत्येकासाठी क्षेत्र ५ गुंठ्यांपासून १५ ते २० गुंठे 
  • सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन, रेन पाइप, मल्चिंग पेपरचा वापर 
  • प्रतवारी, पॅकिंग करून मुंबई व गोवा या प्रमुख ठिकाणी माल पाठवला जातो. तेथील व्यापारी वा पुरवठादार यांच्याशी सतत संपर्क ठेवत मागणीचा अंदाज घेतला जातो. त्यानुसारच पुढील हंगामात भाजीची निवड 
  • भाज्यांचे ‘रोटेशन’ ठेवले जाते. 
  • वर्षाकाठी एकरी सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 
  • यंदाच्या जानेवारीत दहा गुंठे क्षेत्रात सात लाख रुपये खर्च करून शेडनेटची उभारणी, कृषी विभागाकडून २५ टक्के अनुदान, सध्या त्यात चेरी टोमॅटो, देशी हिरवी मिरची 
  •  एक विहीर, दोन कूपनलिका. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असताना रेन पाइप, ठिबक यांचा वापर 
  • पत्नी सौ. शोभा, मुलगा ध्ययेश, मुलगी अनुजा यांची मोठी मदत शेतीत होते. 
  • गोठा बांधला असून, देशी गोपालन व शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाणार आहे. 
  • कृषी साहायक अकुंश सोनावले तसेच ॲग्रोवन दैनिकाचे मोठे मार्गदर्शन मिळते. 

 संपर्क- सुनील काटवटे - ७०६६५५२५०६ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
पावसाळ्यात फुलले नागपुरातील मका मार्केट सध्या राज्यातील विविध बाजारपेठांत स्वीटकॉर्न (...
दुष्काळी भागातही दर्जेदार उत्पादनाचा...नगर जिल्ह्यात कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...
कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...
भूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...
गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...