मोबाईल वाहनातून प्रक्रियायुक्त मासे विक्री

कुंभारी तलावात तयार झालेले मोठ्या वजनाचे मासे.
कुंभारी तलावात तयार झालेले मोठ्या वजनाचे मासे.

अकोला जिल्ह्यातील मौजे कुंभारी येथील महात्मा फुले शेतकरी उत्पादक गटाने मत्स्यशेती व्यवसायातून अर्थकारण बळकट केले आहे. कृषी विभागाच्या मदतीने आता मत्स्यप्रक्रिया व्यवसायातही संस्था उतरली असून, सुशोभीकरण केलेल्या वाहनाच्या मदतीने मोबाईल विक्रीही सुरू केली आहे. काळी असो वा तांबडी, पीक उपजते माती वसे श्रमात श्रीमंती, श्रम माणसाच्या हाती... अकोला जिल्हा मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर मौजे कुंभारी हे गाव आहे. जेमतेम साडेतीन हजार लोकवस्तीच्या या गावात शेती व पूरक व्यवसाय हेच अर्थार्जनाचे मुख्य साधन आहे. गावात सुमारे दीडशे एकरांत तलाव आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून त्यात मत्स्यशेती करण्याची संधी येथील महात्मा फुले शेतकरी उत्पादक गटाने शोधली. गटाचे अध्यक्ष दिलीप आगळे यांनी आत्मा व जिल्हा मत्स्य विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासंबंधी अभ्यास दौरा व विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले. गोड्या पाण्यातील माशांच्या संगोपनासाठी जाती, त्यांचे खाद्य नियोजन, विक्री व्यवस्थापन, प्रक्रिया केल्यास लागणारी साधने, त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा सर्वांगीण अभ्यास केला. असा आहे मत्स्य व्यवसाय संस्थेने रोहू, मृगल, कटला या माशांचे संगोपन तलावात सुरू केलेच. शिवाय स्थानिक पाल, सांडकोळ, चाल, खवल्या, वाईरबाम या देशी माशांचेही पालन सुरू केले. यंदा तंबू व शीतल हे नवे मासे आणले आहेत. गेल्या दहा ते एकरा वर्षांपासून मत्स्यपालन व्यवसायात सातत्य ठेवले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना त्यांची विक्री होते. शेततळ्याच्या तुलनेत तलावात काही माशांचे वजन पाच ते सहा किलोपर्यंत मिळते. वर्षाकाठी या व्यवसायातून आठ ते दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पाऊस चांगला होऊन तलाव पूर्ण भरल्यास हा व्यवसाय अधिक फुलतो. संस्थेची स्थापना गटाने यापुढे पाऊल टाकले आहे. कुंभारी येथील शेतकऱ्यांची जमीन या तलावात गेल्याने त्यांनी एकत्र येत लोणार मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून तलावात सामूहिक मत्स्यपालन केले जाते. पाच सदस्यांचा गट तयार करून प्रक्रिया व्यवसायालाही चालना दिली आहे. गटाने त्यासाठी भागभांडवल जमा केले आहे. अकोला येथे डाळनिर्मितीचा प्रकल्प आहे. त्या माध्यमातून चुरी व अन्य घटक उपलब्ध होतात. त्यांचा वापर मत्स्य खाद्य म्हणून करण्यात येतो. त्यातून खाद्यावर होणाऱ्या खर्चातही बचत करण्यात आली आहे. वाहनाद्वारे थेट विक्री मत्स्योत्पादनाची क्षमता वाढल्याने या व्यवसायाला चालना मिळू लागली आहे. ताज्या माशांसह रोस्ट केलेले मासेही उपलब्ध केले आहेत. यासाठी शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्यामार्फत राबविण्यात आलेल्या योजनेचा आधार घेतला आहे. उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री वाहनाच्या माध्यमातून सुरू केली आहे. मत्‍स्यगंधा असे त्यास नाव दिले आहे. सुमारे चार लाख ३० हजार रुपयांच्या या वाहनासाठी गटला केवळ ६६ हजार रुपये खर्च करावे लागले. नव्वद टक्के शासकीय अनुदान व दहा टक्के लोकवाटा अशी ही योजना होती. मूल्यवर्धनातून दरांत वृद्धी

  • व्यापारी ताज्या माशांसाठी १०० ते १२० रुपये किलोचा दर देतात. मात्र प्रक्रिया केल्याने रोस्ट केलेल्या माशांच्या दरांत वाढ होते. सध्या रोहू, मृगल व कटला या माशांसाठी त्यासाठी ७० रुपये प्रति किलो दर
  • मरळ या माशासाठी हाच दर शंभर रुपये असतो. या मोबाईल वाहनाद्वारे ताज्या माशांचीही विक्री होते.
  • किलोला १६० रुपयांपासून ते २४० रुपये असा दर त्यासाठी असतो. अन्य ठिकाणी मिळणाऱ्या दरांपेक्षा आपण वाजवी दरात विक्री करीत असल्याने ग्राहक वाढल्याचे गटाचे अध्यक्ष गराळे यांनी सांगितले.
  • कुंभारी हे गाव अकोला शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवर आहे. मात्र येथे अकोला औद्योगिक वसाहत असल्याने याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक उपलब्ध होत असतात. माशांबरोबरच ग्राहकांच्या मागणीनुसार चिकनचाही व्यवसाय गटातर्फे केला जात आहे. ब्रॉयलर कोंबडीपालन करणाऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
  • मत्स्यबीज तयार करून विक्री गटाद्वारे शेततळ्यामध्ये जिल्हा मत्स्यविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली मत्स्यबीजही तयार केले जातात. यामध्ये रोहू, मृगल, कटला आदींचा समावेश आहे. मत्स्यशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची विक्रीदेखील केली जाते. त्यातूनही उत्पन्नात वृद्धी होते. मत्स्यशेती गटाबाबत ठळक बाबी

  • सामूहिक मत्स्यशेती असल्याने सर्वांना होतो फायदा
  • थेट विक्रीमुळे नफ्यात झाली वाढ
  • मत्स्य विभागाकडून अनुदानित फिरते वाहन
  • व्यवसाय वृद्धीसाठी गटातील सदस्यांचे प्रयत्न
  • संपर्क - दिलीप आगळे- ९९२२५११९७४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com