प्रतिकूल परिस्थितीलाच मानले उत्तम संधी 

शेतीतून समाधानी आहे. महिन्याला खर्च वजा जाता कंपनीतील पगाराप्रमाणे चांगले उत्पन्न शेतीतून मिळते. शेतीत कष्टांची तयारी असायला हवी. आज खर्च अधिक आहे. मात्र पुढील काळात उत्पन्न अजून वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. -विनायक पवार
 सीताफळाची नवी लागवड
सीताफळाची नवी लागवड

तडसर (जि. सांगली) येथील विनायक शंकर पवार यांनी ‘मर्चंट नेव्ही’ क्षेत्रात सुमारे २२ वर्षे नोकरी केली. मात्र कुटुंबावर आलेल्या बिकट परिस्थितीमुळे त्यांना नोकरी सोडून गावी यावे लागले. मग शेतीतच करिअर करण्याचा निर्धार केला. सन २००७ पासून फळबाग लागवड सुरू केली.  टप्प्याटप्प्याने विविध पिके घेत फळबागेचे क्षेत्र वाढविले. आजमितीस सुमारे १० एकरात फळबाग शेतीचा विस्तार केला आहे. सेंद्रिय पद्धतीवर भर देत जागेवरच मार्केट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.    सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर हे तसं दुष्काळी गाव होतं. ताकारी योजनेचं पाणी कडेगाव तालुक्यात आलं आणि तालुक्यातील शिवारं कशी हिरवीगार झाली. तडसर गावात मात्र अजूनही पाणीटंचाई भासते आहे. याच गावातील विनायक पवार आपल्या संघर्षाची कहाणी सांगत होते. सन १९७५ चा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. दुष्काळानं ग्रासलं होतं. दुभती जनावरं दावणीला होती. त्यांच्या दुधावरच प्रपंच चालत होता. मला शिकायचं होतं. पण परिस्थिती आड येत होती. दर शनिवारी शाळा सुटली की जनावरं चरण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडायची. वडील शेतात कामाला जायचे.  शिक्षण आणि नोकरी  संघर्षाच्या परिस्थितीत कसंबसं बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे ‘वेल्डींग’चं शिक्षण घेतलं. मुंबईत ‘मरीन फीटर’ म्हणून शिक्षण पूर्ण केले. कॅंपसमधून मर्चंट नेव्ही क्षेत्रात निवड झाली. अमेरिका, कुवेत, अरब देशात, स्विर्त्झंलंड, सिंगापूर, जपान अादी विविध देशांत काम केले. करिअला शाश्वती येत होती. मग लग्‍न झालं. पत्नी सौ. राजश्री गावाकडंच राहून आई वडिलांची सेवा करायची. सन १९९० मध्ये कुवेतमध्ये झालंलं युद्ध अगदी जवळून पाहता आलं.  शेतीची व घरची जबाबदारी  संसाराची गाडी सुरळीत सुरू होती. दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत होती. दरम्यान आईचं २००३ मध्ये तर दोनच वर्षांनी वडिलांचं निधन झालं. पुढे आणखी दोन वर्षांत बंधूंचे छत्र हरपले. आपत्ती पाठोपाठ येत होत्या. आता सारी जबाबदारी विनायक यांच्यावरच आली. नोकरी करायची की गावी येऊन शेती करायची असा प्रश्न उभा राहिला. अखेर पत्नीला विश्वासात घेत  नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.  शेती करण्यास प्रारंभ  विनायक सांगतात की जिद्द, कष्टाची सवय हवी तर यश मिळतेच हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवले. शेती करण्यास प्रारंभ केला. वडिलांकडून शेतीचे धडे घेतले होतेच. सुरवातीला पारंपरिक शेती करण्यास सुरवात केली. हाती काहीच मिळत नसल्याने खचून गेलो होतो. नोकरीत महिन्याला गलेलठ्ठ पगार मिळायचा. नोकरी सोडून चूक तर केली नाही ना असा प्रश्न मनात यायचा. शेतीला आधार म्हणून शेळी पालन सुरू केलं. पण त्यात तोटा झाला.   फळबाग शेतीचा श्रीगणेशा  दरम्यान अॅग्रोेवनमधील फळबागांविषयी प्रसिद्ध यशकथा वाचनात येत होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेटीही दिल्या. त्यातून अभ्यास झाला. फळबाग लागवड करायची हा विचार पक्का झाला. संपूर्ण माळरान विकसित करायला सुरवात केली. डाळिंबाची पहिली लागवड केली. अपेक्षित उत्पादन मिळालं. पण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पीक वाळू लागले. मग डाळिंब काढावे लागले. त्याचवेळी गोड चिंचेच्या पाचशे झाडांची लागवड केली. उत्पादन समाधानकारक मिळू लागले.  मार्केटचा अभ्यास  फळबाग शेती यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील बाजारपेठांत जाऊन दर, आवक यांचा अभ्यास केला. त्यातून जागेवर विक्री करण्याचा निर्णय फायदेशीर असल्याचे समजले. भविष्यात सेंद्रिय फळांना येऊ पाहणारी मागणी लक्षात घेता शेती त्याच पद्धतीने करण्याचा विचार केला. त्यादृष्टीने देशी गायी सांभाळल्या आहेत. परिसरातही सेंद्रिय मालाची प्रसिद्ध झाली आहे.  जागेवरच होते विक्री  फळ खरेदी करण्यासाठी थेट शेतात आलेल्या ग्राहकाला फळ तुमच्या हाताने तोडून घ्या असे सांगण्यास सुरवात केली. मग ग्राहक आपोआपच शेताकडे अधिकाधिक अोढला गेला. एकाच ठिकाणी विविध फळे मिळत असल्याने ग्राहकांची संख्या वाढू लागली. विनायक सांगतात की मला शिक्षणासाठी संषर्घ करावा लागला. तसा तो मुलांना कराव लागू नये यासाठी काळजी घेतो. आज अजय गुजरातमध्ये एम. एस्सी (स्टॅट) तर विजय जयसिंगपूर येथे ‘फूड सायन्स’ विषयात शिक्षण घेत आहे. सुटीच्या दिवशी दोघेही मुले शेतात कष्ट करतात. फळांच्या थेट विक्रीत सहभागी होतात. उत्पन्नाला हातभार लावतात.  विनायक यांच्या शेतीतील वैशिष्ट्ये 

  • फळबागेत तागाची लागवड 
  • टप्प्याटप्प्याने ताग मातीआड केला जातो 
  • दररोज जीवामृताचा होतो वापर 
  • झाडांना पाचटाचे आच्छादन केले जाते 
  • ठिबकद्वारे पाणी व गांडूळ खताचा वापर 
  • फळबाग शेती 

  • गोड चिंच- ५०० झाडे 
  • पेरू-३०० झाडे 
  • रामफळ-१५० झाडे 
  • आंबा-१०० झाडे 
  • सिताफळ-१००० झाडे- नवी लागवड 
  • दर रुपये. (प्रति किलो) 
  • गोड चिंच-३०० 
  • आंबा- ८० ते १०० 
  • सीताफळ- ५० 
  • पेरू-३० ते ३५ 
  • आवळा-५० 
  • रामफळ- ७० 
  • विनायक शंकर पवार-९९७५९६८०२० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com