‘जैन इरिगेशन’ने दिले भारतीय शेतीला ‘स्मार्ट’ वळण 

ठिबक, तुषार सिंचन, उतीसंवर्धित तंत्र, विद्राव्य खते आदींच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. आधुनिक शेतीचे तंत्र गावपातळीवर पोचविण्यासाठी सरपंच मंडळींनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. यामध्ये ‘जैन इरिगेशन’ कंपनी निश्चित जबाबदारी पार पाडू शकेल असा मी विश्‍वास देतो. -अशोक जैन, ​अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव
 जैन इरिगेशन कंपनीने भारतीय शेतीला स्मार्ट वळण दिले आहे.
जैन इरिगेशन कंपनीने भारतीय शेतीला स्मार्ट वळण दिले आहे.

पाणी वापराचा विषय येतो तेव्हा जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे नाव आवर्जून घ्यावे लागते. जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी भारतीय शेतीच्या संदर्भात अभ्यास, संशोधन आणि बदल अशी ठोस कामगिरी केली. भारतीय शेतीला ठिबक तंत्राची ओळख करून दिली. तेव्हापासून भारतीय शेतीची पावलं ‘स्मार्ट ’होण्याकडे वळली. शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत.  भवरलालजी जैन यांनी इस्त्राईलमध्ये शेती, ठिबकचे तंत्र पाहिले. ते भारतात आणण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. आज ठिबक व्यतिरिक्त उतीसंवर्धित (टिश्यूकल्चर) रोपांच्या लागवडीकडेदेखील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ठिबक तंत्राद्वारे पाण्याची मोठी बचत झाली. उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. टिश्यूकल्चर रोपे वापरल्याने रोग- किडींचे प्रमाण कमी झाले.  शेतकऱ्यांनी तंत्र  स्विकारलं   भवरलालजी जैन यांची खरे तर राजपत्रित अधिकारी पदासाठी निवड झाली होती. मात्र शेतीशी संबंधित उद्योग करण्याचेच त्यांनी ठरवले होते. शेतीतील बारकाव्यांचा, शेतकऱ्यांच्या समस्यांचा त्यांनी अभ्यास केला. शेती ‘स्मार्ट’ पद्धतीने करण्यासाठी जमिनीचा पोत, मातीची क्षमता तपासून पिकाची निवड, पाण्याचा काटेकोर वापर यावर भर दिला. सुरवातीला कंपनीच्या प्रक्षेत्रात प्रयोग करून ते शेतकऱ्यांना दाखवले. त्यानंतर त्यांच्या शेतात नवे तंत्रज्ञान पोचवले. त्यामुळेच शेतकऱ्यांचा ठिबकसारख्या तंत्रावर विश्वास बसला. हे तंत्र त्यांनी स्वीकारलं.  भारतीय शेतीला जगात पोचवले  पाणी अडवून त्याचे व्यवस्थापन, अनुत्पादक जमिनीचा विकास, सेंद्रिय, जैविक खते, कीडनाशके यांचा योग्य प्रमाणात वापर, हरितगृहेनिर्मिती, पर्यावरण संवर्धनासाठी वनीकरण, फळे व भाज्यांवर प्रक्रिया, त्यांची निर्यात आदींबाबत भरवलालजी यांनी कार्य उभे केले. नैसर्गिक स्त्रोतांचे जतन, कृषी उत्पादन क्षमतेत वाढ, मूल्यसंवर्धन व भारतीय कृषीला जगात मानाचे स्थान मिळवून देणे हेच भवरलालजी यांचे उद्दिष्ट होते.  करार शेतीतील ‘पायोनीयर’  जळगाव येथील सहकारी तत्त्वावरील केळी पावडरनिर्मितीचा बंद पडलेला प्रकल्प  सन १९७८ मध्ये भवरलालजी यांनी चालवण्यासाठी घेतला. कृषी प्रक्रिया उद्योगात कंपनीने दमदार पाऊल ठेवले. पपेन लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. पपईवर प्रक्रिया करून टुटी-फ्रुटी हे उत्पादन तयार होऊ लागले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशात अडीच हजांराहून अधिक प्रयोगशील शेतकरी या प्रकल्पाद्वारे जोडले गेले. यातूनच ‘करार शेती’चा भारतातील पहिला प्रयोग जैन इरिगेशनने यशस्वी करून दाखविला. निर्जलीकरण व प्रक्रियेसाठी कांदा, आले, लसूण, हळद, मिरची, आंबा, पेरू, डाळिंब, केळी आदी शेतमाल करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून घेतला जातो. त्यांना हमी भाव दिला जातो. त्यामुळे त्यांना दरांच्या अनुषंगाने नुकसानीची झळ बसत नाही.  शेतकऱ्यांना प्रगतीची संधी 

  • भवरलालजी हे दूरदृष्टी राखणारे उद्याेजक शेतकरी होते. सन १९९५ मध्ये जैन फूडपार्क येथे त्यांनी कांदा निर्जलीकरण प्रकल्प सुरू केला. कंपनी आणि शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचे स्थित्यंतर ठरले. 
  • फळ प्रक्रिया प्रकल्प, कांदा व भाजीपाला निर्जलीकरण या माध्यमातून मूल्यवर्धित माल सातासमुद्रापार निर्यात होऊ लागला. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे खेळू लागले. त्यांना प्रगतीची संधी मिळाली. 
  • प्रशिक्षणावर भर  शेतकऱ्यांना स्वबळावर उभे करून त्यांच्या घरी समृद्धी नांदावी हेच उद्दिष्ट ठेवून कंपनीची वाटचाल सुरू आहे. देशभरातील शेतकऱ्यांना कंपनीतील नवतंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते. स्पर्धेच्या काळात शेतीची उत्पादन क्षमता कशी वाढीला लागेल याबाबत कंपनीत सातत्याने प्रयोग सुरू असतात. त्यासाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जातात.  कष्ट व गुणवत्ता हाच पाया  जैन उद्योग समूहाचा पायाच कष्ट आणि गुणवत्ता या सूत्रांवर उभारला आहे. ‘पाणी हेच जीवन आणि जीवन म्हणजेच पाणी’ हा ध्यास त्यांनी अंगीकारला. तोच संस्कार सहकाऱ्यांना दिला.  जैन उद्याेग समूहाला मिळालेले सन्मान 

  • आंतरराष्ट्रीय १४, राष्ट्रीय १४६, राज्यस्तरीय ४५, राष्ट्रीय स्तरावरील संस्था ७९ 
  • आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील गौरवलेल्या संस्थांद्वारे मानांकन- १७ 
  • राष्ट्रीय प्रतिष्ठित व्यक्तींद्वारे गौरव- ४ 
  • एकूण पुरस्कार ३०५ 
  • फॉर्च्यून मासिकाच्या ‘चेंज द वर्ल्ड २०१५’ या यादीत जगातील ५१ कंपन्यांमधून सातव्या स्थानाचा बहुमान 
  • जैन उद्योग समूहाचा विस्तार 

  • जगभरात ३३ कारखाने, १४६ कार्यालये व डेपो 
  • सुमारे आठ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल 
  • आंबा प्रक्रिया, केळी, डाळिंब टिश्यूकल्चर रोपनिर्मिती, सौर कृषिपंपनिर्मितीत जगात प्रथम 
  • कांदा व भाजीपाला निर्जलीकरणात जगात द्वितीय 
  • पाणीटंचाईवर मात हीच मुख्य गरज  सध्या महाराष्ट्रात जवळपास २६ जिल्हे दुष्काळी छायेत असून ११२ तालुक्यात टंचाई सदृश परिस्थिती आहे. टंचाईच्या काळात प्राधान्याने पिण्यासाठी पाणी वापरले जाते. यावर्षी खरीप व रब्बी हंगामाला कमी पावसाचा फटका बसला. उन्हाळी हंगाम शक्य होईल असे वाटत नाही. सरपंच मंडळींवर आता मोठी जबाबदारी आली आहे. केवळ उन्हाळ्यापुरता विचार न करता पाण्याचे नियोजन त्यांना बारमाही करावे लागणार आहे. पावसाळ्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, जलयुक्त शिवाय योजना, छतावरील पाणी जमिनीत जिरविणे, जलपुनर्भरण, तलाव व नाले खोलीकरण अशी कामे लोकसहभाग व सामूहिक निधीतून करावी लागतील. ठिबक, तुषार सिंचन, उतीसंवर्धित तंत्र, विद्राव्य खते आदींच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. आधुनिक शेतीचे तंत्र गावपातळीवर पोचविण्यासाठी सरपंच मंडळींनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा. यामध्ये ‘जैन इरिगेशन’ कंपनी निश्चित जबाबदारी पार पाडू शकेल असा मी विश्‍वास देतो.  -अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com