agriculture story in marathi, agrowon maharashtra smart farmer award, Subhash Sharma, yavatmal | Page 2 ||| Agrowon

काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू : सुभाष शर्मा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे जीवजंतू, आदिवासी मजूर, शेतकरी यांच्या कष्टाला मिळालेले फळ म्हणजे मला मिळालेला हा पुरस्कार आहे.   हेच माझे शेतीतील गुरू आहेत. . ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या हजारो यशकथांमधील शेतकरी माझे गुरू आहेत. त्यामुळेच इतक्या वर्षात शेती करताना मला कधीच कोणत्याही ज्ञानाची उणीव भासली नाही. अशी भावना ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कारप्राप्त सुभाष शर्मा यांनी व्यक्त केली. 

पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे जीवजंतू, आदिवासी मजूर, शेतकरी यांच्या कष्टाला मिळालेले फळ म्हणजे मला मिळालेला हा पुरस्कार आहे.   हेच माझे शेतीतील गुरू आहेत. . ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या हजारो यशकथांमधील शेतकरी माझे गुरू आहेत. त्यामुळेच इतक्या वर्षात शेती करताना मला कधीच कोणत्याही ज्ञानाची उणीव भासली नाही. अशी भावना ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कारप्राप्त सुभाष शर्मा यांनी व्यक्त केली. 

ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सुभाष शर्मा यांना येथील बालगंधर्व रंगमंदिरात शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. 
शर्मा सुमारे २० हून अधिक वर्षे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. त्यांच्या शेतीतंत्रात जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण या दोन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य आहे. स्वतःच्या दहा एकर आणि भाडेतत्त्वावरील सात एकर अशा सतरा एकरांत त्यांनी फळा-फुलांनी समृद्ध असे शिवाराचे मॉडेल उभे केले आहे. शेतीतील हे ज्ञान त्यांनी स्वतःपुरते मर्यादित ठेवलेले नाही. विविध प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून राज्यात, देशातील शेतकऱ्यांपर्यंत ते ही ज्ञानाची गंगा पोचविण्याचे काम करीत आहेत. 

यावेळी मनोगत व्यक्त करताना शर्मा भावूक झाले. ते म्हणाले की, हा पुरस्कार मिळवून देणाऱ्या काळ्या आईचे मी आभार मानतो. माझ्या शेतीत वावरणारे जीवजंतू, आदिवासी मजूर शेतकरी यांच्या कष्टाला मिळालेले फळ म्हणजे हा पुरस्कार आहे. शेती काय हे मला या सर्वांनी शिकवले. हेच माझे शेतीतील गुरू आहेत. 

सुभाष शर्मा यांची शेती, पहा व्हिडिओ....

गेल्या चौदा वर्षांपासून ॲग्रोवनच्या पहिल्या अंकापासूनचा मी वाचक असल्याचे शर्मा यांनी अभिमानाने सांगितले. यात प्रसिद्ध झालेल्या हजारो यशकथांमधील शेतकरी माझे गुरू आहेत. त्यामुळेच शेती करताना मला कधीच ज्ञानाची उणीव जाणवली नाही. ॲग्रोवनने माझ्या ज्ञानात नेहमीच मोलाची भर टाकण्याचे काम केले, असेही शर्मा यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, माझे मित्र लक्ष्मीकांत कापशीकर यांनी स्वतःची १०० एकर जमीन मला प्रयोगांसाठी उपलब्ध करून दिली. कापशीकर म्हणाले की माझ्या शेतीत संशोधन करावे. त्यासाठी लागेल तो खर्च करण्याची माझी तयारी आहे. खर्च वाया गेला तरी बेहत्तर, पण प्रयोग सुरू ठेवावेत. या सर्वांच्या मदतीमुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला, अशी कृतज्ञताही शर्मा यांनी व्यक्त केली. 

ज्या व्यवस्थेत पाणी निर्माण होते, हवा निर्माण होते ती म्हणजे शेती. सर्व सजीवांचे अन्न निर्माण करणे म्हणजेच शेती असे मी मानतो. हीच शेती व्यवस्था आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 


इतर इव्हेंट्स
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
AGROWON_AWARDS : अपंगत्वावर मात करीत...ॲग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय पुरस्कार...
‘ॲग्रोवन’ जलसमृद्धी योजनेत साडेनऊ...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून...
AGROWON_AWARDS : देशी, परदेशी ३०...ॲग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती पुरस्कार शेतकरी -...