आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू : सुभाष शर्मा
पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे जीवजंतू, आदिवासी मजूर, शेतकरी यांच्या कष्टाला मिळालेले फळ म्हणजे मला मिळालेला हा पुरस्कार आहे. हेच माझे शेतीतील गुरू आहेत. . ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या हजारो यशकथांमधील शेतकरी माझे गुरू आहेत. त्यामुळेच इतक्या वर्षात शेती करताना मला कधीच कोणत्याही ज्ञानाची उणीव भासली नाही. अशी भावना ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कारप्राप्त सुभाष शर्मा यांनी व्यक्त केली.
पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे जीवजंतू, आदिवासी मजूर, शेतकरी यांच्या कष्टाला मिळालेले फळ म्हणजे मला मिळालेला हा पुरस्कार आहे. हेच माझे शेतीतील गुरू आहेत. . ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या हजारो यशकथांमधील शेतकरी माझे गुरू आहेत. त्यामुळेच इतक्या वर्षात शेती करताना मला कधीच कोणत्याही ज्ञानाची उणीव भासली नाही. अशी भावना ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कारप्राप्त सुभाष शर्मा यांनी व्यक्त केली.
ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सुभाष शर्मा यांना येथील बालगंधर्व रंगमंदिरात शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
शर्मा सुमारे २० हून अधिक वर्षे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. त्यांच्या शेतीतंत्रात जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण या दोन गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य आहे. स्वतःच्या दहा एकर आणि भाडेतत्त्वावरील सात एकर अशा सतरा एकरांत त्यांनी फळा-फुलांनी समृद्ध असे शिवाराचे मॉडेल उभे केले आहे. शेतीतील हे ज्ञान त्यांनी स्वतःपुरते मर्यादित ठेवलेले नाही. विविध प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून राज्यात, देशातील शेतकऱ्यांपर्यंत ते ही ज्ञानाची गंगा पोचविण्याचे काम करीत आहेत.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शर्मा भावूक झाले. ते म्हणाले की, हा पुरस्कार मिळवून देणाऱ्या काळ्या आईचे मी आभार मानतो. माझ्या शेतीत वावरणारे जीवजंतू, आदिवासी मजूर शेतकरी यांच्या कष्टाला मिळालेले फळ म्हणजे हा पुरस्कार आहे. शेती काय हे मला या सर्वांनी शिकवले. हेच माझे शेतीतील गुरू आहेत.
सुभाष शर्मा यांची शेती, पहा व्हिडिओ....
गेल्या चौदा वर्षांपासून ॲग्रोवनच्या पहिल्या अंकापासूनचा मी वाचक असल्याचे शर्मा यांनी अभिमानाने सांगितले. यात प्रसिद्ध झालेल्या हजारो यशकथांमधील शेतकरी माझे गुरू आहेत. त्यामुळेच शेती करताना मला कधीच ज्ञानाची उणीव जाणवली नाही. ॲग्रोवनने माझ्या ज्ञानात नेहमीच मोलाची भर टाकण्याचे काम केले, असेही शर्मा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, माझे मित्र लक्ष्मीकांत कापशीकर यांनी स्वतःची १०० एकर जमीन मला प्रयोगांसाठी उपलब्ध करून दिली. कापशीकर म्हणाले की माझ्या शेतीत संशोधन करावे. त्यासाठी लागेल तो खर्च करण्याची माझी तयारी आहे. खर्च वाया गेला तरी बेहत्तर, पण प्रयोग सुरू ठेवावेत. या सर्वांच्या मदतीमुळेच आज हा पुरस्कार मला मिळाला, अशी कृतज्ञताही शर्मा यांनी व्यक्त केली.
ज्या व्यवस्थेत पाणी निर्माण होते, हवा निर्माण होते ती म्हणजे शेती. सर्व सजीवांचे अन्न निर्माण करणे म्हणजेच शेती असे मी मानतो. हीच शेती व्यवस्था आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
- 1 of 5
- ››