AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल

शंभर एकरांतील प्रयोगशाळा यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटवर मित्राची शंभर एकर शेतीदेखील शर्मा यांनी कसण्यास घेतली आहे. इथल्या ५७ एकरांत संशोधन, प्रयोग सुरू आहेत. इथं जमिनीची सुपीकता बळकट केली जातीय. कोणत्याही फवारण्यांशिवाय पीक अवशेषांचा भरपूर वापर करून तुरीचंएकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन घेतलं जात आहे. कमी पाण्यात येणाऱ्या व जमिनीची सुपीकता टिकवणाऱ्या ऊसशेतीच्या मॉडेलवरही याच क्षेत्रात चाचण्या सुरू आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक जीवनाची पुरेपूर अनुभती देणारं कृषी पर्यटन विकसित केलं जात आहे.
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल

ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार  सुभाष शर्मा, यवतमाळ  नैसर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळची ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न जिल्ह्यातील काही शेतकरी करीत आहेत. यवतमाळचे सुभाष शर्मा त्यापैकीच एक. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता बळकट करणे, शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार, बहुवीध पीक पद्धती, दर्जेदार उत्पादन, देशी गोसंगोपन, अशा विविध वैशिष्ट्यांनी शाश्‍वत शेतीचे मॉडेलच शर्मा यांनी उभे केले आहे.    शेतीतलं गुरूकुल  बागायती शेतकऱ्याबरोबरच कोरडवाहू शेतकऱ्याचे जीवनही समृद्ध झाले पाहिजे हाच ध्यास यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांनी बाळगला आहे. यवतमाळ शहरापासून सुमारे २० किलोमीटरवरील तिवसा येथे त्यांची १० एकर शेती आहे. त्याच ठिकाणी सात एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली आहे. हे १७ एकर क्षेत्र म्हणजे शेतीचे मोठे गुरूकुलच आहे.  फळाफुलांनी समृद्ध शिवार  रासायनिक खते, कीडनाशके न फवारता अडीच एकरांवर फुलवलेला टवटवीत हरभरा आणि झाडाला ४०० ते ५०० घाटे पाहून आपले मन प्रसन्न झाल्याशिवाय राहात नाही. ड्रीप किंवा स्प्रिंकलर न वापरता कंटूर पद्धतीचा हा हरभरा एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन देऊन जातो. पलीकडे तारा, मंडप, बांबू यांच्याविना फळांनी भरगच्च लगडलेला देशी टोमॅटो, शेजारी सुरती धण्याचा अर्थात कोथिंबिरीचा हिरवागार मधमाश्‍यांनी भरलेला बिजोत्पादन प्लॉट, पुढं देशी जांभळी वांगी, कांदापात, वालाच्या १० फूट उंचीपर्यंत लगडलेल्या शेंगा असं सगळं समृद्ध शिवार पाहिलं की शर्मा यांनी घडवलेल्या किमयेचा प्रत्यय येतो.  सुभाष शर्मा यांची नैसर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेती, पहा व्हिडिओ... शंभर एकरांतील प्रयोगशाळा  यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटवर मित्राची शंभर एकर शेतीदेखील शर्मा यांनी कसण्यास घेतली आहे. इथल्या ५७ एकरांत संशोधन, प्रयोग सुरू आहेत. इथं जमिनीची सुपीकता बळकट केली जातीय. कोणत्याही फवारण्यांशिवाय पीक अवशेषांचा भरपूर वापर करून तुरीचं एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन घेतलं जात आहे. कमी पाण्यात येणाऱ्या व जमिनीची सुपीकता टिकवणाऱ्या ऊसशेतीच्या मॉडेलवरही याच क्षेत्रात चाचण्या सुरू आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक जीवनाची पुरेपूर अनुभती देणारं कृषी पर्यटन विकसित केलं जात आहे.  शर्मा यांची मुख्य पिके  तूर, हरभरा, सोयाबीन, भाजीपाल्यात कांदा पात, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, धने बियाणे, मेथी, कोहळा, आंबा, पेरू, चारा पिके.  प्रातिनिधिक उत्पादन  तूर, हरभरा- एकरी १० ते १५ क्विंटल.  भाजीपाला पिके- एकरी ६० क्विंटल ते २५०, ३०० क्विंटलपर्यंत. पीक व वाणनिहाय त्यात बदल.  शेतीची वैशिष्ट्ये 

  • सन १९९४ पासून म्हणजे सुमारे २४ वर्षांपासून नैसर्गिक शेती. रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर नाही. अगदी फवारणीही नाही. 
  • जमिनीची सुपीकता वाढवणे, जलसंवर्धन, शेती पर्यावरण अर्थात इकॉलॉजी जोपासना व उर्जेचा सक्षम वापर या मुख्य उद्दिष्टांवर केंद्रित शेती व्यवस्थापन 
  • देशी जनावरे संगोपन. देशी दुधाची सक्षम विक्री व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न 
  • माती प्रचंड सुपीक, निरोगी 
  • काही वर्षांपूर्वीची वाळलेली आंब्याची बाग चरी खोदून वा ट्रेचिंगद्वारे ओलावा तयार करून पुनरुज्जीवित केली आहे. झाडे मोहोरली असून आता नंदनवनात फळे लगडतील 
  • कंटूर पद्धतीने म्हणजेच समतल चर पद्धतीने पाणी. पाणीबचतीबरोबर उत्पादन दुप्पट वाढवण्याची या तंत्रात क्षमता 
  • जवळपास बियाणे घरचेच म्हणजेच देशी. बियाण्यात स्वयंपूर्णतः, त्यातून संकरित बियाण्यांवरचा एकरी किमान ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च वाचवला जातो. 
  • बहुवीध पीक पद्धती 
  • मजुरांचे सक्षम व्यवस्थापन 
  • सुमारे १३ मजूर कायमस्वरूपी 
  • नैसर्गिक अधिवास जपला. शंभर एकरांवरील जागेत सुमारे १२ ते १५ हजारांपर्यंत विविध झाडांची लागवड. विविध जातीच्या पक्ष्यांची विविधता 
  • बायोमास अर्थात पीक अवशेष, पालापाचोळा यांचा भरपूर वापर 
  • लागवडीचे अंतर, एकरी झाडांची संख्या, प्रत्येक झाडाला फुले, फळे, शेंगा वा घाटे यांची संख्या असा प्रत्यक्ष गणीतीय हिशेब 
  • मार्केटिंगचा प्रचंड अभ्यास. मागणीनुसार पीक निवडीचा निर्णय 
  • भाजीपाल्याची यवतमाळला व्यापाऱ्यांना तर कडधान्याची थेट ग्राहक विक्री 
  • शेती तंत्रज्ञानाचा प्रसार 

  • ज्ञान आपल्यापुरते सीमित न ठेवता प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे देशभरातील हजारांहून अधिक शेतकऱ्यांत त्याचा प्रसार 
  • स्वतःच्या शेतावर दोनदिवसीय सातत्याने प्रशिक्षण. प्रति बॅच शेतकऱ्यांची संख्या ५० पर्यंतच ठेवण्यावर भर 
  • हजारो शेतकरी प्रयोग पाहण्यासाठी शर्मा यांच्या शेतीला भेटी देतात. या व्यतिरिक्त कृषी शास्त्रज्ञ, कुलगुरू, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनीही शेताला भेट दिली आहे. 
  • पुरस्कार  शर्मा यांना कृषिभूषण, शेतीनिष्ठ तसेच यंदाच्या मराठी साहित्य संमेलनातही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com