agriculture story in marathi, agrowon prerana award 2019, pune | Agrowon

रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने अर्ध्यावरच साथ सोडली. दीड वर्षाचा मुलगा आणि एक महिन्याची मुलगी पदरात सोडून पतीने मृत्यूला कवटाळले. तो क्षण डोंगर कोसळल्यासारखाच होता. पुढं खाई आणि मागे विहीर अशा या कठीण संकटकाळात स्वतःतील दुर्गेला साद घातली. रडायचं नाही, लढायचं असा निर्धार प्रत्यक्षात आणणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील वैशाली येडे या शेतकरी महिलेला यंदाच्या ॲग्रोवन प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने अर्ध्यावरच साथ सोडली. दीड वर्षाचा मुलगा आणि एक महिन्याची मुलगी पदरात सोडून पतीने मृत्यूला कवटाळले. तो क्षण डोंगर कोसळल्यासारखाच होता. पुढं खाई आणि मागे विहीर अशा या कठीण संकटकाळात स्वतःतील दुर्गेला साद घातली. रडायचं नाही, लढायचं असा निर्धार प्रत्यक्षात आणणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील वैशाली येडे या शेतकरी महिलेला यंदाच्या ॲग्रोवन प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात दिमाखदार सोहळ्यात बुधवारी (ता. ८) २०१९ च्या ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कारांचे वितरण झालेआपल्याकडील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाची साथ हवीच. पण त्या जोडीला शेतीतील गुंतवणूकही गरजेची आहे. बियाणे, खते आदी निविष्ठांसाठी शेतीला पतपुरवठाही तितकाच महत्त्वाचा आहे. पाऊस पुरेसा पडला आणि हातात पैसा नसेल तर शेतीत पेरणार काय या कल्पनेनेच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकते. शेतकऱ्यांपुढची ही सार्वत्रिक समस्या आहे. दुर्दैवाने अजूनही शेतीला संस्थात्मक आर्थिक पाठबळाचा अभावच दिसून येतो. त्याचमुळे शेतकरी खासगी सावकाराच्या दावणीला बांधले जातात. एकदा का शेतकरी सावकारांच्या व्याज, चक्रवाढ व्याजात गुरफटला की त्यातून त्याची सुटका होत नाही, जोडीला दुष्काळ-नापिकी असतेच. शिवाय पिकूनही घामाला योग्य दाम मिळाला नाही तरी सगळेच मातीमोल ठरते. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही ही ग्रामीण म्हण शेतकऱ्यांची विदारक आर्थिक स्थिती दर्शविते. शेवटी खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळतात. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. शेतकरी आत्महत्या करतात, पण प्रश्न तिथेच राहतात. माणूस जातो, मागे कुटुंबाचे काय होते, याचा कोणी विचार करीत नाही. 

विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही वेगळाच दिसून येतो. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील वैशाली येडे या शेतकरी महिलेने प्रसंगी पुरुषासारखं ताठ मानेने उभं राहत निराश शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. येडे कुटुंबीय ज्या ठिकाणी राहतात ते राजूर आदिवासी बहुल भागात मोडतं. गावात सगळी कोरडवाडू शेती. मजुरीशिवाय पर्याय नाही. अशा ठिकाणी सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने अर्ध्यावरच साथ सोडली. दीड वर्षाचा मुलगा आणि एक महिन्याची मुलगी पदरात सोडून पतीने मृत्यूला कवटाळले. तो क्षण डोंगर कोसळल्यासारखाच होता असे वैशाली येडे सांगतात. पुढं खाई आणि मागे विहीर अशा या कठीण संकटकाळात त्यांनी स्वतःतील दुर्गेला साद घातली. गेल्या आठ-नऊ वर्षांत त्यांनी परिस्थिती संपूर्णपणे बदलवली आहे. हा लढा कधीच न संपणारा आहे. हे ओळखून रडण्यापेक्षा लढायचं असा निर्धार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला.

वैशालीताईं येडे यांच्या संघर्ष, पहा व्हिडिओ....

सर्वांनाच मिळाली प्रेरणा 
ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रेरणा पुरस्कार जाहीर होताच अख्ख्या सभागृहाने अखंड टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. सभागृहातील वातावरणाने सगळेजण भारावून गेले होते. येडे यांना मिळालेला हा पुरस्कार सर्वांनाच प्रेरणा देणारा असल्याची भावना यावेळी सभागृहात व्यक्त झाली. सभागृहात वैशाली येडे यांच्या कर्तृत्वावर आधारित ध्वनिचित्रफित सभागृहात दाखविण्यात आली. ती पाहून अवघे सभागृह काही क्षण स्तब्ध झाल्याचे भासत होते.  

इतर यशोगाथा
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...
सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...
काटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...
दहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
दुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...
परिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...
कष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...
सुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...