ग्रामविकासासाठी दानशूरांची मदत घ्या : जयंत पाटील कुर्डूकर

जयंत पाटील
जयंत पाटील

आळंदी, जि. पुणे : सरकारी योजनांतून विकास होतोच. पण गावविकासासाठी अनेक हात पुढे येतात. अशा दानशूर व्यक्तींची मदत घ्या, लोकसहभाग वाढवा आणि चांगल्या हेतूने काम करा, असे आवाहन ग्रामविकासात अनेक वर्षे कार्य करणारे कुर्डू (ता. माढा, जि. सोलापूर) येथील जयंत पाटील कुर्डूकर यांनी केले. 

सरपंच महापरिषदेत शनिवारी (ता.२४) कुर्डूकर यांनी शासनाच्या मदतीशिवाय ग्रामविकास कसा साधता येईल या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सरपंचांवर आता महत्त्वाची जबाबदारी आहे. ग्रामपंचायत व गाव चालवणे तसे सोपे नाही. गावचा विश्वास मिळवणारी व्यक्तीच सरपंच होते. गावच्या विकासासाठी जलयुक्त, समाजकल्याण, चौदावा वित्त आयोग, खासदार, आमदार फंड आदींमधून निधी मिळतो. पण त्यातून प्रश्न सुटणार नाहीत. सरकारी योजनांव्यतिरिक्तही गावच्या विकासासाठी योगदान देता येते. रावसाहेब गिरामे, दत्ता काकडे, ज्योती देशमुख, सागर माने, अजय काशीद, विजय चव्हाण, विकास जाधव अशा राज्यभरातील अनेक सरपंच मंडळींनी लोकसहभागातून विकास साधून नावलौकिक मिळवला आहे. गावातील रहिवासी आणि अन्य ठिकाणी चांगल्या पदांवर कार्य करणाऱ्या व्यक्तींची मदत घ्या. आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल यासाठी प्रत्येक सरपंचाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अनेक सरपंचांनी ते काम यशस्वी करूनही दाखवले आहे. शहरात व खेड्यात फरक केला जात आहे. खेड्यातही लोक राहतात. पण शहराच्या तुलनेत खेड्याला निधी दिला जात नाही. मात्र ‘सीएसआर फंडा’ची मदत घेऊनही अनेक कामे करता येतील. त्यासाठी सरपंचांनी एकजूट करण्याची गरज आहे.    चांगले काम कराल तर यशस्वी व्हाल  जयंत पाटील कुर्डूकर म्हणाले की, मान मोठा पण सरपंचाचा खिसा मात्र मोकळा असतो. हक्काने पैसे मिळाले तर अजून गावे सक्षम होतील. सरपंच जोमाने कामे करतील. पण राज्यात प्रत्येक प्रयोग सरपंचांवर केले जातात. आम्ही दहावी पासच्या अटींसह अनेक बाबींना विरोध केला.  चांगल्या नैतिकतेतून तुम्ही चांगले काम करत यशस्वी व्हाल.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com