कायद्याचा अभ्यास केल्यास अडचणी दूर होतील : नामदेव घुले

कायद्याचा अभ्यास केल्यास अडचणी दूर होतील : नामदेव घुले
कायद्याचा अभ्यास केल्यास अडचणी दूर होतील : नामदेव घुले

कायद्याचा अभ्यास सरपंचांसाठी महत्त्वाचा आहे. कायद्याने काम केले तर कोणतीही अडचण सरपंचांना भेडसावणार नाही. माहिती अधिकाराची अडचणही सरपंचांबरोबर ग्रामसेवकांपुढे येणार नाही असे प्रतिपादन ग्रामपंचायतींच्या कायद्याचे अभ्यासक नामदेव घुले यांनी केले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम याबाबत त्यांनी सरपंच महापरिषदेत विचार मांडले. श्री. घुले म्हणाले, की सरपंचांनी कायद्याची माहिती घेणे गरजेचे आहे. कायद्यांबाबत अज्ञानी राहून चालणार नाही. तसे झाल्यास अनेकदा चुकीचे निर्णय होतात. दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक अनेक गावांमध्ये श्रीमंतदेखील आहेत. हा घोळ कायद्यानुसार काम न केल्याने व कायद्याची माहिती नसल्याने अधिक झाला. आपला देश संविधानानुसार चालतो. कायदा मोठा आहे. सरपंचपद हे आव्हानात्मक पद आहे, त्यामुळे पुढील आव्हाने पार करीत असताना ग्रामपंचायतींच्या नियमांची माहिती असली तर कोणतीही अडचण येणार नाही. कायदेशीरपणे काम केले तर लोकांचा विश्वास वाढतो.

लोकांचा विश्‍वास सोबत हवा

अलीकडे माहितीच्या अधिकारांबाबत तक्रारी दिसतात; परंतु पारदर्शकपणे काम केले तर कोणतीही अडचण येणार नाही. मग माहितीच्या अधिकाराची भीतीही वाटणार नाही. लोकांचा विश्वास सोबत असला तर मग कामेही गतीने होतात. ग्रामपंचायतीला अन्न विभाग, ग्रामविकास व अन्य अनेक अधिकार आहेत; परंतु त्यांची माहिती आपल्याला नसते. या संदर्भात कामे करताना म्हणूनच अडचण येते. ग्रामसभेला अलीकडे अधिकार वाढवून मिळाले आहेत, त्यामुळे हवी ती कामे साध्य करता येतील. ग्रामसभेचे अधिकार कोणते आहेत या संदर्भातील काम सुरवातीला सरपंच मंडळींनी केले पाहिजे, असेही घुले यांनी भाषणात सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com