agriculture story in marathi, agrowon sarpanch mahaparishad, alandi, pune | Agrowon

ग्रामस्थांच्या पाठबळावर पाण्याचा प्रश्‍न सोडविला : सरपंच सुभाष भोसले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

गावाचा विकास साधायचा तर पाणी अत्यावश्यक आहे. आमचे गाव टेकडीवर असल्याने पाण्याची समस्या गंभीर होती. शेती उजाड होती. अनेक जण हमालीचा व्यवसाय करायचे. पण मी ग्रामस्थांच्या पाठबळाने काम केले. पाणी प्रश्न सुटला. गाव हिरवेगार झाले. पुढे आम्ही अनेक विकासकामे साधून अडचणी दूर केल्याचे पिराचेवाडी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील सरपंच सुभाष भोसले यांनी सांगितले.

गावाचा विकास साधायचा तर पाणी अत्यावश्यक आहे. आमचे गाव टेकडीवर असल्याने पाण्याची समस्या गंभीर होती. शेती उजाड होती. अनेक जण हमालीचा व्यवसाय करायचे. पण मी ग्रामस्थांच्या पाठबळाने काम केले. पाणी प्रश्न सुटला. गाव हिरवेगार झाले. पुढे आम्ही अनेक विकासकामे साधून अडचणी दूर केल्याचे पिराचेवाडी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील सरपंच सुभाष भोसले यांनी सांगितले.

सरपंच महापरिषेत बोलताना श्री. भोसले म्हणाले की गावापासून नदी सात किलोमीटर दूर आहे. पाणी हवे असेल तर नदीवरून जलवाहिनी आणणे गरजेचे होते. या विचारातून ग्रामस्थांना जलवाहिनीचा प्रस्ताव सांगितला. मात्र त्यासाठी पुरेसा निधी नव्हता. मी माझी मालमत्ता, दागिने, जमीन गहाण ठेवली. बारा इंची जलवाहिनी टाकून घेतली. गावात पाणी आल्याने अनेकांनी आपला हमाली व्यवसाय थांबवून शेतीकडे लक्ष दिले. सुमारे २५० एकर क्षेत्र बागायती झाले. गावात उसाची शेती आहे. हळूहळू ग्रामस्थांच्या बळावरच पुढे स्मशानभूमी बांधली. पंचायतीची इमारत बांधण्याच्या वेळेस जुनी इमारत निर्लेखित न करता पाडल्याने मला अपात्र करण्याचा प्रस्ताव सादर झाला. पण आम्ही चांगले काम करीत असल्याने प्रशासनाने हा प्रस्ताव फेटाळला. आता ग्रामपंचायतीची सुंदर इमारत बांधली आहे. गावची स्मशानभूमी चांगली केली आहे. शंभर वर्षे जुनी असलेली शाळा डिजिटल केली. तिथे शिक्षण घेतलेली मुले उच्चशिक्षित झाली. गावातील सुमारे ६५ युवक नोकरी व शिक्षणासाठी पुण्यात राहताहेत. गावातील शंभर एकर क्षेत्रात आता ठिबकची व्यवस्था करायची आहे. यामुळे अधिकाधिक शेती सिंचनाखाली येईल, असेही भोसले यांनी सांगितले.

समस्या झेलत विकास साधायला हवा
समस्या कायम येतच असतात. पण त्या दूर करून गावाचा विकास करण्याची आपली प्रवृत्ती हवी. आमच्या गावाचा विकास करताना अनेक अडचणींचा सामना केला. अपहार, अनियमितता, असे आरोप आमच्यावर झाले, पण पारदर्शक काम केल्याने कुठलेही आरोप सिद्ध झाले नाहीत, असे राजगड (ता. मूल, जि. चंद्रपूर) येथील चंदू पाटील यांनी या वेळी सांगितले. त्यांनी गावातील विविध उपक्रमांची माहितीही दिली.

इतर अॅग्रो विशेष
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...
कृषी निर्यातीला धोरणात्मक पाठबळ हवे :...जागतिक स्तरावर कृषी निर्यातीत भरपूर संधी आहे,...
शेतकऱ्यांसाठी निवडणुका फक्त...देशात असो किंवा राज्यात ज्या वर्षात निवडणुका...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
‘मिरॅकल बीन’चा लुप्त होतोय चमत्कारदोन दिवसांपासून ढगाने व्यापलेल्या आकाशाने...
स्वस्त थाळी शेतकऱ्यांना पडू शकते महागातशिवसेनेच्या जाहीरनाम्यातील, त्यांच्या शब्दात ''...
नारळ, सुपारीत फुलली दर्जेदार काळी मिरीरत्नागिरी जिल्ह्यात पावसापासून काही अंतरावरील...
नागपूरच्या बाजारात भाव खाणारी सावळीची...बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने विविध...
संपूर्ण शेतमाल नियमनमुक्तीच्या हालचालीपुणे : बाजार समित्यांच्या जोखडातून शेतीमालाची...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे: अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि परिसरावर...
‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे थाटात...सोलापूर : ‘सकाळ ॲग्रोवन’च्या यंदाच्या दिवाळी...
२०१९ पशूगणना : गायींची संख्या १८...पुणे ः देशात २०१२ मध्ये ५१२ दशलक्ष पशुधन होते....
कर्जमाफीच्या गोंधळामुळे सोसायट्या संकटातसांगली ः कर्जमाफीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही....
मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घटसोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या...