कोंबडीपालन, दुग्ध व्यवसायातून साधता येईल प्रगती : डाॅ. दिनेश भोसले

डाॅ. दिनेश भोसले
डाॅ. दिनेश भोसले

शेतकऱ्यांची कष्ट करायची तयारी असते. मात्र अनेकवेळा योग्य सल्ला मिळत नसल्याची समस्या जाणवते. कोंबडीपालन, दुग्ध व्यवसाय या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगती साधता येईल, असे मत एबी व्हिस्टा या आंतरराष्ट्रीय कंपनीचे दक्षिण आशिया विभागाचे तांत्रिक सल्लागार डाॅ. दिनेश भोसले यांनी व्यक्त केले.

सरपंच महापरिषदेत डाॅ. भोसले यांनी ‘दुष्काळाला आधार पूरक उद्योगाचा’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की राज्याला दररोज चार कोटी अंड्यांची गरज भासते. मात्र, राज्यात सव्वा कोटी अंडी उत्पादन होते. उर्वरित अंडी तेलंगण व अन्य राज्यांतून येतात. कोंबडीपालन हा पूरक उद्योग निश्चित आर्थिक प्रगती देणारा आणि समाधान करणारा उद्योग आहे.

दुग्ध व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा डॉ. भोसले म्हणाले की दुग्ध व्यवसायही अत्यंत फायद्याचा आहे. राज्यात वीस टक्के संकरित गायी असून ८० टक्के देशी गायी आहेत. ए टू दुधाला मागणी असून, त्यासाठी आवश्यक ती किंमत मोजायला लोक तयार आहेत. राज्यात ५५ टक्के म्हशीचे दूध थेट ग्राहकांना विकले जाते. त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा पूरकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. वेताच्या आधीचे तीस दिवस व वेतानंतरचे सत्तर दिवस या व्यवसायात महत्त्वाचे असतात. महिला, शेतकरी गट हे पूरक व्यवसायातील थेट विक्रीद्वारे स्वतःची वेगळी ओळख तयार करू शकतात. तसे राज्यात अनेकांनी केले आहे. या व्यवसायाचे प्रशिक्षणही मिळते. गावांनी यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

मूरघासातून दुष्काळावर मात पशुपालन हा महत्त्वाचा घटक आहे. मुरघासातून चाराटंचाई व दुष्काळावर मात करता येईल. मुरघास मोठ्या प्रमाणात तयार करावा. कोंबडीपालन, दुग्ध व्यवसाय हे खऱ्या अर्थाने दुष्काळात आधार देणारे व्यवसाय आहेत. ते सुरू करताना कष्ट सोसावे लागतात. आपापल्या गावात असे उद्योग सुरू होण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com