शेडनेटमधील काकडी ठरते किफायतशीर 

दत्ता वाळके यांनी शेडनेटमध्ये नुकतीच लावलेली काकडी
दत्ता वाळके यांनी शेडनेटमध्ये नुकतीच लावलेली काकडी

वाशीम जिल्ह्यातील वाळकी मजरे गावात आमची चार एकर शेती आहे. बारमाही पाण्याची सोय पुरेशी नसल्याने कमी पाण्यात येणारी पिके घेण्याकडे आमचा कल असतो. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत आम्ही जाणली आहे. काळाची गरज ओळखून २०१४ मध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने २० गुंठ्यात शेडनेट उभारणी केली आहे. त्यात योग्य नियोजन करीत अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल, अशा पद्धतीने पीक नियोजन व व्यवस्थापन करतो. शेडनेट शेती आमच्यासाठी फायदेशीर ठरली आहे.  असे असते पीक नियोजन  शेडनेटमध्ये कारली, मिरची, काकडी अशी पिके घेतो. सध्या काकडीची नुकतीच लागवड केली आहे. लागवड ही गादवाफ्यावरच (बेड) असते. एक फूट उंच असलेल्या प्रतिबेडवर ठिबकच्या दोन नळ्या अंथरल्या आहेत. दोन ठिबक लाइन्सनमधील अंतर सव्वा फूट असून दोन झाडांमधील अंतर दोन फूट ठेवले आहे. निरोगी बियाण्याचीच निवड करतो. निकृष्ट असल्यास ते बाजूला काढून ठेवतो. पाण्याचे नियोजन जास्त महत्त्वाचे असते. पाणी जास्त झाल्यास जमिनीत चिकटपणा येतो.  लागवडीनंतर दहा ते बारा दिवसांनी काकडीचे वेल चांगल्याप्रकारे वाढीस लागतात. साधारण पंधरा दिवसांनी १९-१९-१९ यांसारख्य विद्राव्य खतांचा वापर सुरू होतो. पीक पंचवीस दिवसांचे झाल्‍यानंतर सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर सुरू करतो. पीकवाढीनुसार विद्राव्य खतांची निवड होते. पांढरी माशी, लाल कोळी, तुडतुडा, नागअळी यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी वेळच्यावेळी फवारणीचे नियोजन होते. शेतातील कामे संपूर्ण कुटुंब मिळून करतो. त्यामुळे मजुरीवरील खर्च कमी केला आहे. डनेटमध्ये काकडीची लागवड करण्याची अनेक कारणे आहेत. वेल एक फूट उंचीचा झाला की त्याची एकच फांदी वाढवण्यात येते. अन्य फुटवे काढून टाकण्यात येतात. वेलीवरील वाळलेली खालच्या बाजूची पानेही तोडण्यात येतात. कळी तसेच फूलगळ कमी होते. पिकाचा कालावधी काही प्रमाणात वाढतो असे अनुभवण्यास आले आहे. वाशीममध्ये विक्री  शेडनेटमध्ये अन्य पिकांच्या तुलनेत काकडीवर रोग-किडींचा प्रादुर्भाव कमी होतो असा अनुभव आहे.  एकरी साधारण १५ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. सरासरी २० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. खर्च वजा जाता दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. संपूर्ण माल वाशीम बाजारात विकतो. येथे दर घसरले तर पर्याय म्हणून यवतमाळ बाजारात माल पाठविण्यात येतो.  आंतरपीक मेथीचा प्रयोग  काकडी बेडवर असते. त्यामुळे खालील बाजूस जागा रिकामी राहते. या जागेत मेथीचे पीक घेता येते. काकडी उगवल्यानंतर मेथी लावण्यात येते. साधारण २५ दिवसांत हे पीक निघून येते. मेथीची काढणी करतानाच काकडीचे वेल तारेवर चढविण्याचे काम करता येते. उन्हाळ्यात निघणाऱ्या मेथीला चांगला दर मिळतो.  संपर्क- दत्ता वाळके- ९९६०४३६१२७   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com