agriculture story in marathi, agrowon smart farmer award programme, event, pune | Agrowon

राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न सोडविला : प्रतापराव पवार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 मे 2019

पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘सकाळ’ने कायम ठेवला. आज दुष्काळी स्थितीत पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यावर जागरूकपणे आम्ही काम करतो आहोत. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून लोकसहभागाच्या जोरावर आजपर्यंत ६०० गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवला, असे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी बुधवारी (ता. ८) येथे सांगितले. 

पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘सकाळ’ने कायम ठेवला. आज दुष्काळी स्थितीत पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यावर जागरूकपणे आम्ही काम करतो आहोत. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून लोकसहभागाच्या जोरावर आजपर्यंत ६०० गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवला, असे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी बुधवारी (ता. ८) येथे सांगितले. 

सकाळ- ॲग्रोवनच्या वतीने ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड’चे वितरण बुधवारी झाले. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले की, केवळ शेती हाच विषय केंद्रस्थानी ठेवून ॲग्रोवनसारखे दैनिक सुरू केल्यानंतर अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले. पण आज त्याला मिळालेले हे यश महत्त्वाचे आणि सर्वांच्या सहभागाचे आहे. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्यात आणखी काही बदल हवे असतील तर शेतकऱ्यांनी त्यांच्या सूचना जरूर मांडाव्यात. त्यानुसार बदल केले जातील. सकाळ माध्यम समूह वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते आहे. पाण्याच्या विषयावर सकाळने रिफी फंडाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ५०० ते ६०० गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. शेतकरी प्रशिक्षित व्हावेत, कौशल्याधारित शिक्षण त्यांनी घ्यावे, यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या माध्यमातून चार लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी जवळपास एक लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यातही आले आहे. 

ॲग्रोवनच्या माध्यमातून दरवर्षी सरपंच महापरिषद भरवली जाते. सरपंच शहाणा झाला तर गावाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे, हा यामागील उद्देश आहे. आत्तापर्यंत १० हजार सरपंचांना हे प्रशिक्षण दिले. त्यात महिला सरपंचांचाही सहभाग मोठा आहे. या कामात कोणतीही जात, धर्म असा भेदाभेद नसतो. केवळ समाजाचा उत्कर्ष, हाच उद्देश असतो. लोकांचा मिळालेला विश्वास आणि पाठिंबा हेच यामागील सर्वात मोठे बळ आहे, असेही श्री. पवार म्हणाले. 
 

इतर इव्हेंट्स
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...