agriculture story in marathi, Amla fruit is getting good demand & rates in Pune Market Comitee in the ongoing season. | Page 3 ||| Agrowon

पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव, ग्राहकांसह आयुर्वेदिक उद्योगाकडून मागणी

गणेश कोरे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

‘आम्ही २० वर्षांपूर्वी २० एकर क्षेत्रावर नरेंद्र (एन) ७ सह कांचन, कृष्णा, फ्रांन्सिस, एन८, ९, १० या वाणांची लागवड केली होती. यामध्ये एन ७ वाणाचे दर्जेदार उत्पादन सुर झाले. दरवर्षी एकूण साधारण १५० टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. मात्र गेल्या दोन वर्षांतील दुष्काळामुळे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षी एकूण ५० ते ६० टन उत्पादन मिळाले. यंदाही तेवढेच उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. पुढील आठवड्यात माल सुरू होईल. किलोल २० ते २५ रुपये दर मिळतील असा अंदाज आहे.
-सुभाष निकम
दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक
संपर्क - ९६७३१५६०५०

‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर वापर होत असलेल्या आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. ग्राहकांबरोबरच व्यावसायिकांकडूनही त्यास मोठी मागणी असते. पुणे- गुलटेकडी बाजार समितीत राज्यातील काही भागांतून आवळ्याची आवक होत असली तरी प्रमुख आवक राजस्थान, मध्यप्रदेशातूनच होते. या बाजार समितीत वाणांनुसार व ग्रेडनुसार दर मिळतात. दरवर्षी वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांच्या पुढेच असल्याचे आकडेवारीवरून दिसते. त्यावरूनच आवळा शेतमालाचे महत्त्व अधोरेखीत होते.
 
अत्यंत बहुगुणी व आरोग्यवर्धक म्हणून आवळ्याची खास ओळख आहे. बाजारात तो मर्यादित हंगामात येत असला तरी त्याचा वापर वर्षभर सुपारी, मोरावळा, कॅंडी आदी विविध स्वरूपात घराघरांतून सुरू असतो. आवळ्याचा हंगाम साधारण ऑक्टोबरअखेर पासून सुरू होतो. साधारण मार्चअखेरपर्यंत तो असतो. पुणे येथील गुलटेकडी बाजार समितीत आवळ्याची आवक प्रामुख्याने राजस्थान आणि मध्यप्रदेशातून होते. राजस्थानातील पुष्कर, जयपूर, अजमेर तर मध्यप्रदेशातील प्रतापगड ही त्यासाठीची ठिकाणे आहेत. एकूण आवकेच्या २५ ते ३० टक्के आवक राज्यातील पंढरपूर, मालेगाव, औरंगाबाद आणि नगर जिल्ह्यांतील राहुरी परिसरातून होते. ही माहिती बाजार समितीमधील आवळ्याचे प्रमुख आडतदार विलास (आण्णा) निंलगे यांनी सांगितले.

हंगामातील आवक व दर
हंगाम सुरू झाल्यावर दररोज साधारण पाच टनांची आवक होते. डिसेंबरमध्ये हंगाम तेजीत असतो. या काळात दररोज सुमारे १० टन आवक होते. यात स्थानिक २ ते ३ टन तर ८० टक्के आवक राजस्थान आणि मध्यप्रदेशातील असते. हंगामाच्या प्रारंभीला आवक आणि मागणी कमी असल्याने दर प्रतिकिलोला ३५ ते ४५ रुपये असतो. हाच दर हंगामाच्या तेजीत ३० ते ३५ रुपये असतो.

आवळ्याची बाजारपेठ
महाराष्ट्रात आवळ्याचे क्षेत्र फार कमी असल्याने त्याची बाजारपेठ राजस्थान आणि मध्यप्रदेशातील आवळ्यावर अवलंबून असते. आवळ्याला प्रामुख्याने आयुर्वेदिक उत्पादने बनविणाऱ्या प्रक्रिया उद्योगांकडून अधिक मागणी असते. यामध्ये पुणे परिसरातील कामधेनू मसाले, ग्रीन फार्मसी, वुमन आर्टस, आयुर्वेदिक रसशाळा, गणेश फूडस, पुष्पक फूडस यांच्याकडून १० टनांपासून ते ५० टनांपर्यंत खरेदी होते. च्यवनप्राश, आवळा कॅंडी, चूर्ण, सरबत, मोरावळा यासाठी आवळ्याचा वापर होतो.
शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. दिवसेंदिवस आरोग्याच्या बाबतीत जागरुकता वाढत असल्याने घरगुती ग्राहकांकडून किरकोळ १ ते ५ किलोपर्यंतची खरेदी होते. आवळ्याच्या लोणच्यासाठी गृहिणींकडून विशेष मागणी असते.

आवळ्याचे वाण
महाराष्ट्रात एन ७, कृष्णा आणि कांचन तर राजस्थान आणि मध्यप्रदेशात एन ७ आणि ‘चकाया’ हे वाण प्रसिद्ध आहेत. यामधील एन ७ या वाणाच्या आवळ्याचा आकार पूर्ण गोल तर रंग गडद हिरवा असतो याला चकाकी असल्याने मागणी चांगली असते. तर कांचन, कृष्णा आणि चकाया वाणांचा आकार थोडा चपटा, लहान असून दर थोडे कमी मिळतात. एन ७ वाणाला प्रतिकिलो ३० ते ४० रुपये तर उर्वरित वाणांना २० ते ३० रुपये दर मिळतो. राजस्थानात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने आवळ्यांना डाग पडले आहेत. त्यामुळे डागी मालाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे दर पाच रुपयांपर्यत कमी झाले आहेत. अर्थात डाग वरच्या भागात असले तरी दर्जा चांगला असल्याचे आडतदार निलंगे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
‘आम्ही २० वर्षांपूर्वी २० एकर क्षेत्रावर नरेंद्र (एन) ७ सह कांचन, कृष्णा, फ्रांन्सिस, एन८, ९, १० या वाणांची लागवड केली होती. यामध्ये एन ७ वाणाचे दर्जेदार उत्पादन सुर झाले. दरवर्षी एकूण साधारण १५० टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. मात्र गेल्या दोन वर्षांतील दुष्काळामुळे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षी एकूण ५० ते ६० टन उत्पादन मिळाले. यंदाही तेवढेच उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. पुढील आठवड्यात माल सुरू होईल. किलोल २० ते २५ रुपये दर मिळतील असा अंदाज आहे.
-सुभाष निकम
दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक
संपर्क - ९६७३१५६०५०

दोन एकरांत २२ वर्षांपूर्वी लागवड केलेल्या एन ७ वाणाची २०० झाडे असून सध्या उत्पादन सुरू झाले आहे. आठवड्याला तीन वेळा तीन टन माल काढणी होते. पूर्वी पुण्यात माल पाठवायचो. मात्र, आवक जास्त होत असल्याने चांगला दर मिळत नव्हता. आता दोन- तीन वर्षांपासून कोल्हापूर येथे माल पाठवतो. पुण्यात ३० ते ४० रुपये दर मिळायचा. हाच दर कोल्हापूर येथे ६० रुपयांपर्यत मिळतो. पुण्यात व्यापारी क्रेट किंवा बॉक्समधून माल घेऊन येण्यास सांगायचे. यात खर्च वाढायचा. कोल्हापूरला सिमेंटच्या गोण्यांमधून माल पाठवतो. आकार वा ग्रेडनुसार १० ते ६० रुपये दर मिळतो. यंदा सुमारे पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
- दर्शन भांगे
माढा, जि. सोलापूर
संपर्क - ९४२३३३२८८५

पुणे बाजार समितीतील आवळ्याची आवक (अलीकडील वर्षांतील प्रातिनिधीक)

                                               दर                       
वर्ष --- - आवक        किमान --- कमाल --- सरासरी ---
२०१५-१६ --- ३, ९२९ --- १०००---३००० -- २००० 
२०१६-१७ --- ३, ४११ --- १५०० ---२५०० --- २०००  
२०१७-१८ --- १, ४०५ --- २००० --- ३००० --- २५००  
२०१८ -१९ --- ८२९ --- २०००---३००० --- २५००  

                          
वर्ष                           उलाढाल (रू.)
२०१५-१६ ---          ७८ लाख ५८ हजार
२०१६-१७ ---        ६८ लाख २२ हजार
२०१७-१८             ३५ लाख १२ हजार ५००
२०१८ -१९            २ लाख ७२ हजार ५००
                          (हंगाम सुरू आहे.)
आकडेवारी स्रोत - पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

संपर्क- विलास (आण्णा) निलंगे- ९३७१०१४९५७
आवळ्याचे प्रमुख आडतदार
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नोकरीला शेतीची जोड देत उंचावले अर्थकारणआसोदे (ता. जि. जळगाव) येथील नीलेश नारायण माळी एका...
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...
नागपूरात १०.६ अंश तापमान पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...