अमतराव देशमुख यांची फूलशेती
अमतराव देशमुख यांची फूलशेती

फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास मार्ग?

अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव देशमुख यांनी सुमारे १० ते १५ वर्षांपासून फूलशेती करून त्यात सातत्य ठेवले आहे. त्याद्वारे कुटुंबासाठी उत्पन्नाचा खात्रीशीर मार्ग तयार केला. दोन मुलांच्या मदतीने ते या शेतीत राबतात. अडीच एकरांतील निशिगंध आणि लिली पिकाने त्यांच्या उत्पन्नात मोठी भर घालण्याचे काम घडवले आहे.   अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुका मुख्यालयापासून सात ते आठ किलोमीटरवर कंझरा नावाचे गाव आहे. येथील अमृतराव देशमुख यांची तीन एकर शेती गावाला लागूनच आहे. पूर्वी ते या भागातील सर्व मुख्य हंगामी पिके घ्यायचे. मात्र, सुमारे १० ते १५ वर्षांपूर्वी त्यांनी फूलशेतीची कास धरली. सुमारे अडीच एकर क्षेत्र त्यांनी या शेतीला दिलेले आहे. पैकी दोन एकरांत निशिगंध तर अर्ध्या एकरात लिलीची लागवड आहे. यंदा जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत ऐन पावसाच्या काळात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन त्यांना मिळाले. दर पोचला १५० रुपयांवर जुलै-ऑगस्ट नंतर सणासुदीचा काळ सुरू होतो. यादरम्यान फुलांची मागणी वाढते. यावर्षी सततच्या पावसाने राज्यात विविध पिकांचे नुकसान झाले. परंतु देशमुख यांना या पावसाने साथ दिली. दररोज एक क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन ते घेत होते. या काळात अन्यत्र फुलांचे मोठे नुकसान झाल्याने आवक घटून दर वाढले होते. त्याचा देशमुख यांना फायदा झाला. कमाल काहीवेळा दीडशे रुपयांपासून दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंतचा दर त्यांना मिळवता आला. फूलशेतीला सुरुवात केल्यापासून यंदाचे दर हे कमाल मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. एरवी हे दर शंभर रुपये किंवा त्याहून कमी देखील मिळतात. दसरा, नवरात्री, दिवाळी व अन्य सणांना मागणी अधिक राहते. अकोल्याची बाजारपेठ फुलांसाठी अकोला येथे दुपारी बाजारपेठ राहते. अकोला व अन्य भागातून येणाऱ्या फुलांचा लिलाव केला जातो. देशमुख कुटुंबीय सकाळीच फुलांची तोडणी करून घेतात. दुपारी अकोला बाजारपेठेत प्रतवारी व व्यवस्थित पॅकिंगद्वारे त्यांची पाठवणी होते. टवटवीत फुलांना बाजारात मागणी राहतेच. शिवाय दरही अधिक मिळतो असे देशमुख सांगतात. मागील काही महिन्यांपासून मूर्तिजापूर येथे फुलांचे हार, गुच्छ तयार करून विक्रीचे कामही देशमुख कुटुंबाने सुरू केले आहे. फूलशेतीतून वर्षाला एकरी किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न हाती लागते. रोजगारनिर्मिती फूलशेतीसाठी हंगामात दररोज सहा महिला कामास असतात. उर्वरित महिन्यांमध्ये निंदणी, खत देणे व अन्य कामांसाठी दोन महिला व देशमुख कुटुंबातील तिघे जण राबतात. अर्ध्या एकरात कांदा, हरभरा व अन्य पिके असतात. लिंबू, चिकू आदी फळझाडेही लावली आहेत. या सर्वांचे उत्पन्न मिळते. नवनवीन शिकण्याचा ध्यास अमृतरावांनी पारंपरिक वा हंगामी पिकांपेक्षा फूलशेतीला प्राधान्य दिले. त्यासाठी कुटुंब वर्षभर राबते. फूलशेतीच्या दृष्टीने नवनवीन माहिती मिळवण्याचा तसेच कृषी प्रदर्शनांना भेटी देण्याचा प्रयत्न करतो. यावर्षीही पुण्यात होणाऱ्या प्रदर्शनाला गटाने जाण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. जिल्हा कृषी अधिकारी मोहन वाघ, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, ‘आत्मा’ चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांच्या मार्गदर्शनातून वेगळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यात येत आहे. बाजारपेठेची मागणी ओळखली मूर्तिजापूर तालुक्यात फूलशेतीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सिंचनाच्या सुविधा कमी आहेत. मागील काही वर्षांतील दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे अर्थकारण पारंपरिक पिकांवरच अधिक अवलंबून राहिले आहे. अशा परिस्थितीत अमृतरावांनी अनेक वर्षांपासून फूलशेतीत सातत्य टिकवले आहे ही विशेष बाब म्हणावी लागेल. मूर्तिजापूर शहराची तसेच अकोला बाजारपेठेची क्षमता पाहून त्यांनी दरवर्षी दोन ते अडीच एकरांपर्यंत फूलशेतीचे क्षेत्र निश्‍चित केलेले असते. ठेवलेले असते. फूलशेतीच्या व्यवस्थापनातील बारकावे त्यांना माहिती झाले आहेत. प्रतिक्रिया यावर्षी जास्त पावसामुळे फूलशेतीचे नुकसान झाले. अशा स्थितीत जी काही चांगल्या दर्जाची फुले विक्रीसाठी बाजारात आली त्यांना दर चांगले मिळाले. अमृतरावांकडील फुले वर्षभर आमच्याकडे विक्रीसाठी येतात. पॅकिंग, प्रतवारी करून ते फुले आणत असल्याने त्याचा दरांमध्ये त्यांना फायदा होतो. अकोला बाजारपेठेत विविध भागांतून फुले येतात. सणासुदीच्या काळातील व अन्य वेळच्या दरात फरक असतो. -सुरेश फुलारी, फुलांचे व्यापारी, अकोला

संपर्क- अमृतराव देशमुख-९०११९२६९७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com