agriculture story in marathi, Anil Patil a progressive farmer from Konkan- Palghar Dist. has done mechanization in rice seedling transplantation. | Agrowon

यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा कोकणात पाटील यांचा प्रयोग

उत्तम सहाणे
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी अनिल पाटील यांनी भातशेतीत यांत्रिकीकरणाला मोठी चालना दिली आहे. रोपनिर्मिती व यंत्राच्या साह्याने लागवडीचा प्रयोग त्यांनी आपल्या वैतरणा मंडळाच्या माध्यमातून यंदा शंभर एकरांत राबवला. वेळ, पैसे, मजूरबळ अशा सर्व कामांत बचत करणारे पाटील यांचे प्रयोग समस्त शेतकऱ्यांसाठी पथदर्शक आहेत.

सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी अनिल पाटील यांनी भातशेतीत यांत्रिकीकरणाला मोठी चालना दिली आहे. रोपनिर्मिती व यंत्राच्या साह्याने लागवडीचा प्रयोग त्यांनी आपल्या वैतरणा मंडळाच्या माध्यमातून यंदा शंभर एकरांत राबवला. वेळ, पैसे, मजूरबळ अशा सर्व कामांत बचत करणारे पाटील यांचे प्रयोग समस्त शेतकऱ्यांसाठी पथदर्शक आहेत.

पालघर जिल्ह्यातील वाडा म्हटले की वाडा कोलम तांदूळ डोळ्यासमोर येतो. याच तालुक्यातील
सांगे येथील कृषिभूषण अनिल पाटील यांची ओळख सर्वदूर आहे. काळाच्या पुढचा विचार करणारे, शेतीत विविध प्रयोग करणारे व अन्य शेतकऱ्यांना कायम नवी दिशा देणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून पाटील यांची ओळख आहे.

भातशेतीतील प्रयोग
भात हे पाटील यांचे मुख्य पीक. ही शेती फायद्याची करण्याविषयी ते सातत्याने चिंतन करीत
असतात. आठ- दहा वर्षांपासून भात लागवडीच्या विविध पद्धतींचा अभ्यास व प्रयोग त्यांनी केले. प्लॅस्टिक मल्चिंगवरील भात हा त्यापैकीच एक प्रयोग. त्यापुढे जाऊन यंत्राद्वारे भातरोप लागवडीचा प्रयोग त्यांनी यंदा केला आहे. लागवडीसाठी रोपवाटिका बनविणे आणि पुर्नलागवड करणे हे कष्टाचे काम असते. कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांच्या कायम संपर्कात असलेल्या पाटील यांच्या पाहण्यात चार वर्षांपूर्वी भात रोपवाटिका निर्मितीचा परदेशातील ‘व्हिडिओ’ आला. परदेशात भातशेतीत यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील चौरास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अनिल नोकरदार यांनीही यंत्राचा प्रत्यक्ष वापर करण्याविषयी त्यांना आपले अनुभव सांगून मार्गदर्शन केले. त्यानंतर आपल्या शेतात प्रत्यक्ष वापरास सुरुवात झाली.

प्रयोगाची वाटचाल

 • पाटील वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यातर्फे २० शेतकरी व शंभर एकर क्षेत्रात प्रयोगाचे नियोजन केले.
 • सुरुवातीला बाजारातील मिळतील ते ट्रे घेऊन काम सुरू केले. लाल माती व शेणखत मिसळून
 • माध्यम तयार केले. रोपवाटिका तयार करून शेतकऱ्यांना रोपे वाटण्यात आली.
 • दरम्यान कृषी विभागाकडे नावीन्यपूर्ण योजनेतून मंडळातर्फे २०१९ मध्ये संपूर्ण यांत्रिकीकरणाचा प्रकल्प सादर केला.
 • यात रोपलागवड करणारे यंत्र, दोन ट्रॅक्टर्स, दोन भातकाढणी यंत्रे व दोन भातसफाई यंत्रे व शेड असा संच होता.
 • यात कृषी विभागाचे ६० टक्के अनुदान, २५ टक्के बँक कर्ज व १५ टक्के शेतकऱ्याचे समभाग असे भांडवल जमा करून ६० लाखांचा प्रकल्प हाती घेतला.

प्रकल्प वैशिष्टये

 • उद्दिष्टे- भात शेतीतील कष्ट कमी करणे, उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादन वाढविणे
 • सुरुवातीला ट्रे ठेवण्याची जागा प्रथम सपाट करून घेतली. दोन बाय एक फूट आकाराचे ट्रे घेऊन त्यात
 • लाल माती, थोडे गांडूळखत आणि कंपोस्ट खत भरले.
 • गवत उगवून येऊ नये म्हणून एक महिना माती भिजवून ठेवली.
 • प्रति ट्रेसाठी ८० ते १०० ग्रॅम बियाणे लागले.
 • पेरणीनंतर तुषार पद्धतीने पाणी दिले.
 • सुमारे ३००० ते ३५०० एवढी रोप संख्या मिळाली.
 • रोपे १७ ते २२ दिवसांत लागवडीसाठी तयार झाली. जोमदार, एकसमान वाढीची मिळाली.
 • ट्रे मधील रोपांचे वैशिष्ट्य़ म्हणजे काढणीनंतर लागवडीला काही कारणाने उशीर झाल्यास ७ दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत बांधावर राहू शकतात.
 • यंदा सुमारे ९ हजार ट्रे भरले.
 • कर्जत ३, कर्जत ५, वाडा कोलम, सुरती कोलम, डांगी या भातजातींचा वापर केला.

लागवडीबाबत

 • एक एकर लागवडीसाठी सुमारे ८० ते १०० ट्रे पुरेसे
 • पाटील यांच्या १० एकर व मंडळाच्या मिळून ३५ एकरांत यंत्राने लागवड. उर्वरित ५५ एकरसाठी ट्रेची ‘वैतरणा’ मंडळाकडून विक्री. प्रति ट्रे किंमत ४० रुपये.
 • पालघर, वाडा, वसई, भिवंडी, मुरबाड, शहापूर, विक्रमगड, जव्हार येथील शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला.

यांत्रिक पद्धतीचे झालेले फायदे

-प्रचलित पद्धतीत एकरात मजुरांकरवी रोपलागवडीस प्रति दिन २० मजूर लागतात.
यांत्रिक पद्धतीत दिवसाला चार ते पाच एकरांपर्यंत रोपलागवड पूर्ण करता येते. त्यासाठी ट्रॅक्टरचालक, रोपे टाकत जाणारा व देखरेख यासाठी केवळ तीन व्यक्ती पुरेशा होतात. एकरी ढोबळमानाने खर्चाचा विचार केल्यास त्यात ४० टक्क्यापर्यंत बचत होऊ शकते. या व्यक्ती आपल्याकडील असल्यास खर्च कमी होऊ शकतो.

-मुख्य म्हणजे सध्या पैसे देऊनही मजूर सांगेल ते काम करायला राजी नसतात. अशावेळी
यंत्र काम करून जाते.

-वेळेची, श्रमाची मोठी बचत होते.

-पारंपरिक पद्धतीतील त्रुटी दूर होतात.
उदा. रोपे बनविण्याच्या जागेवर राब (भाजवण) केली जाते. त्यासाठी मोठ्या
प्रमाणात झाडांचा पाला, जनावरांचे शेण, काडीकचरा जाळण्याची पद्धती आहे. यात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्बाचा नाश होतो. हवेत प्रदूषण होते. मजुरी खर्च, वेळ, बियाण्याचे प्रमाण जास्त लागते. एवढे करूनही रोपे जोमदार तयार होतीलच याची शाश्वती नाही. आधुनिक पद्धतीत या त्रुटी दूर होऊन गुणवत्ताप्राप्त रोपे तयार करता येतात.

कृषिमंत्र्यांनी खांद्यावर ठेवला हात
राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी अलीकडे पाटील यांच्या प्रयोगांची पाहणी करीत प्रसंशा केली. त्यावेळी मनोदय व्यक्त करताना पाटील म्हणाले की ४५ वर्षे शेती करतो आहे. केशर आंबा, केळी, पपई, कलिंगड व चिकू अशी बागायती शेती आहे. चांगले उत्पन्न व समाधान मिळत आहे. मात्र सातत्याने विचार डोक्यात यायचा तो म्हणजे जिल्ह्यातील भात उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीत ६४ टक्के खर्च मजुरीवर होत आहे. हे लक्षात घेऊन भातशेतीत यांत्रिकीकरणासाठी प्रयत्न सुरू केले. मंत्रिमहोदयांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. पण मला वाटते की तो भातशेती करणाऱ्या समस्त शेतकऱ्यांच्या खांद्यावर ठेवून दिलेला तो दिलासा आहे. पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनीही पाटील यांच्या प्रयोगांची पाठ थोपटली आहे.

अन्य शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा
सांगे गावातील शांताराम पाटील (आंबेकर) हे ७८ वर्षे वयाचे शेतकरी आहेत. यंदा त्यांनी दोन एकरांत भात लागवडीची तयारी सुरू केली. मात्र गवत जास्त झाल्याने रोपे पातळ झाली. पावसाअभावी कामाला खोळंबा झाला. अशा परिस्थितीत ‘वैतरणा’ मंडळाने त्यांना मदत केली. विशेष म्हणजे तरूणालाही लाजवेल अशा प्रकारे आंबेकरांनी दोन एकरांत सुंदर भात लागवड केली. त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून खुद्द अनिल पाटील यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

सर्वांची समर्थ साथ
मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप शिलोत्री व सदस्यांची पाटील यांना समर्थ साथ मिळते. पत्नी सौ अश्विनी, मुलगी गौरी, मुलगा गौतम, सून सौ. गायत्री अशा कुटुंबातील सर्वांचीही मदत होते. मुलगा गौतम कृषी पदवीधर असून मुलगी गौरीने अन्न तंत्रज्ञान या विषयात पदवी घेतली आहे. ती देखील भात लागवड यंत्र चालवते.

(लेखक कोसबाड कृषी विज्ञान केंद्र येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)
संपर्क- अनिल पाटील-९९७०९७८७०


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...