रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडे

यंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशावेळी सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल शिंदे यांनी रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवले. योग्य व्यवस्थापानातून कलिंगडे पिकवून त्यास चांगला दरही मिळवण्याचा प्रयत्न केला.
अनिल शिंदे यांनी पिकवलेले कलिंगड
अनिल शिंदे यांनी पिकवलेले कलिंगड

यंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशावेळी सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल शिंदे यांनी रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवले. योग्य व्यवस्थापानातून कलिंगडे पिकवून त्यास चांगला दरही मिळवण्याचा प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यात आष्टा येथे अनिल शिंदे यांचे शेतशिवार लागते. त्यांची सहा एकर शेती आहे. त्यात मागील वर्षापासून दोन एकरांत त्यांनी कलिंगड घेतले आहे. पहिल्या वर्षी सलग दोन एकरांत तर यंदा केळी पिकात त्याचे आंतरपीक घेतले. वास्तविक केळीत कलिंगडासारखी वेलवर्गीय पिके घेऊ नयेत, अशी तज्ज्ञांची शिफारस असते. मात्र यंदाच्या प्रयोगात किडी-रोगांचा धोका जाणवला नसल्याचे शिंदे म्हणाले. लागवडीचे नियोजन मागील वर्षी रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवून शिंदे यांनी १० ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान साडेचार फूट सरीत झिगझॅग पद्धतीने लागवड केली. चांगल्या व्‍यवस्थापनानंतर एकरी २७ टनांपर्यंत उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले. हा यशस्वी अनुभव पदरी असल्याने यंदाही लागवड करायची असा निर्धार केला, परंतु क्षेत्र रिकामे नव्हते. जे उपलब्ध होते त्यात केळी लागवडीचे नियोजन होते. मग शिंदे यांनी धाडस करून केळीत कलिंगडाचे आंतरपीक घेण्याचे नियोजन केले. सुरुवातीला मल्चिंग पेपर अंथरून झाल्यावर केळी लावणीचे मार्किंग करून घेण्यात आले. त्यानंतर एक आड एक सरीत बगलेवर कलिंगडाच्या रोपांची लावण केली. रमजान सणात विक्री रमजान सण काळात रोजे पवित्र मानले जातात. महिनाभराच्या उपवासाच्या काळात फळांना मागणी चांगली असते. आष्टा गावापासून जवळ असलेल्या कोल्हापूर व सांगली येथील बाजारपेठेत विक्री करण्यात आली. सांगली, कोल्हापूर मार्केटला मागील वर्षी प्रति किलो पाच ते सात रुपये दर मिळाला. शिंदे गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रयोगशाळा विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे गाव परिसरात त्यांचे नेटवर्क चांगले आहे. यंदा व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे कलिंगड खाण्यास अवश्‍य या अशा आशयाची ‘पोस्ट’ त्यांनी पाठवली. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. यंदा किलोला ९ रुपये दरही मिळाला. अन्य पिके शिंदे यांनी पपईची देखील लागवड केली आहे. यंदा उसात आले घेण्याचा प्रयत्न केला आहे. आल्याची काढणी सुरू आहे. पाच महिन्यांचा ऊस जोमदार आहे. उसाचे दरवर्षी एकरी ८० ते ९० टनांपर्यंत उत्पादन घेतात. पाचट न जाळता कुट्टी करून वापर, फेरपालट, दूरदूरष्टी ठेवून पिकांचे नियोजन करण्यावर त्यांचा भर असतो. संपर्क- अनिल शिंदे, ९९७०७००८७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com