agriculture story in marathi, Anil Shinde from Sangli Dist. has grown sweet watermelons for Ramjan festival. | Page 2 ||| Agrowon

रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडे

श्यामराव गावडे
शनिवार, 15 मे 2021

यंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशावेळी सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल शिंदे यांनी रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवले. योग्य व्यवस्थापानातून कलिंगडे पिकवून त्यास चांगला दरही मिळवण्याचा प्रयत्न केला.

यंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशावेळी सांगली जिल्ह्यातील आष्टा (ता. वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल शिंदे यांनी रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवले. योग्य व्यवस्थापानातून कलिंगडे पिकवून त्यास चांगला दरही मिळवण्याचा प्रयत्न केला.

सांगली जिल्ह्यात आष्टा येथे अनिल शिंदे यांचे शेतशिवार लागते. त्यांची सहा एकर शेती आहे. त्यात मागील वर्षापासून दोन एकरांत त्यांनी कलिंगड घेतले आहे. पहिल्या वर्षी सलग दोन एकरांत तर यंदा केळी पिकात त्याचे आंतरपीक घेतले. वास्तविक केळीत कलिंगडासारखी वेलवर्गीय पिके घेऊ नयेत, अशी तज्ज्ञांची शिफारस असते. मात्र यंदाच्या प्रयोगात किडी-रोगांचा धोका जाणवला नसल्याचे शिंदे म्हणाले.

लागवडीचे नियोजन
मागील वर्षी रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवून शिंदे यांनी १० ते १२ फेब्रुवारीच्या दरम्यान साडेचार फूट सरीत झिगझॅग पद्धतीने लागवड केली. चांगल्या व्‍यवस्थापनानंतर एकरी २७ टनांपर्यंत उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले. हा यशस्वी अनुभव पदरी असल्याने यंदाही लागवड करायची असा निर्धार केला, परंतु क्षेत्र रिकामे नव्हते. जे उपलब्ध होते त्यात केळी लागवडीचे नियोजन होते. मग शिंदे यांनी धाडस करून केळीत कलिंगडाचे आंतरपीक घेण्याचे नियोजन केले. सुरुवातीला मल्चिंग पेपर अंथरून झाल्यावर केळी लावणीचे मार्किंग करून घेण्यात आले. त्यानंतर एक आड एक सरीत बगलेवर कलिंगडाच्या रोपांची लावण केली.

रमजान सणात विक्री
रमजान सण काळात रोजे पवित्र मानले जातात. महिनाभराच्या उपवासाच्या काळात
फळांना मागणी चांगली असते. आष्टा गावापासून जवळ असलेल्या कोल्हापूर व सांगली येथील बाजारपेठेत विक्री करण्यात आली. सांगली, कोल्हापूर मार्केटला मागील वर्षी प्रति किलो पाच ते सात रुपये दर मिळाला. शिंदे गावातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रयोगशाळा विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे गाव परिसरात त्यांचे नेटवर्क चांगले आहे. यंदा व्हॉट्‌सॲप ग्रुपद्वारे कलिंगड खाण्यास अवश्‍य या अशा आशयाची ‘पोस्ट’ त्यांनी पाठवली. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. यंदा किलोला ९ रुपये दरही मिळाला.

अन्य पिके
शिंदे यांनी पपईची देखील लागवड केली आहे. यंदा उसात आले घेण्याचा प्रयत्न केला आहे. आल्याची काढणी सुरू आहे. पाच महिन्यांचा ऊस जोमदार आहे. उसाचे दरवर्षी एकरी ८० ते ९० टनांपर्यंत उत्पादन घेतात. पाचट न जाळता कुट्टी करून वापर, फेरपालट, दूरदूरष्टी ठेवून पिकांचे नियोजन करण्यावर त्यांचा भर असतो.

संपर्क- अनिल शिंदे, ९९७०७००८७०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...