agriculture story in marathi, aromatic plants farming, oil extraction, ambhol, akole, nagar | Agrowon

सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही केली यशस्वी
सूर्यकांत नेटके 
बुधवार, 23 जानेवारी 2019

मच्छिंद्र म्हणतात 

 • शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सुगंधी पिकांची लागवड फायदेशीर - 
 • सुमारे दहा एकर क्षेत्र व त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये किंमतीचे प्रक्रिया यंत्र तसेच रोपांसाठी भांडवल वा गुंतवणूक अपेक्षित. गटाने शेतकरी एकत्र आल्यास खर्च विभागाला जाऊ शकतो. 

नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र चौधरी या उच्चशिक्षित तरुणाने जिरॅनियम, पाल्मारोजा, लेमनग्रास व वाळा या चार सुगंधी वनस्पतींद्वारे शेतीचा वेगळा मार्ग जोपासला. एक पाऊल पुढे टाकून वनस्पतींपासून तेलनिर्मितीही सुरू केली आहे. उद्यमशीलता, तांत्रिक ज्ञान व बदलत्या शेती व बाजारपेठेचे भान यांचा संगम साधून राज्यासाठी उपक्रमशीलतेचा आदर्श उभारला आहे. 

नगर जिल्ह्यातील आंभोळ हे अकोले तालुक्यातील दुर्गम गाव. येथील मच्छिंद्र चौधरी यांचे कुटूंब सदस्य पूर्वी फळबाग, भाजीपाला आदी पारंपरिक पिके घेत. त्यातून अर्थकारण मात्र आकारास येत नव्हते. कुटुंबातील मच्छिंद्र ‘एमएस्सी केमिस्ट्री तर धाकटे भाऊ अनिल "एमए' झालेले आहेत. मच्छिंद्र यांना बावीस वर्षांचा मुंबईत सांडपाणी व्यवस्थापन कामांचा (वेस्ट वॉटर ट्रीटमेंट) अनुभव आहे. त्यांची या क्षेत्रातील कंपनीही आहे. आपल्या कंपनीतील सांडपाण्याला उग्रवास येत असताना मुंबई स्थित एका कंपनीच्या प्रकल्पातील सांडपाण्याला मात्र सुगंध येत असल्याचे त्यांच्या निरीक्षणास आले. 
त्यामागील कारण जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले. 

सुगंधी वनस्पतीच्या शेतीला सुरवात 
या विषयातील अधिक अभ्यास करताना सुगंधी तेलनिर्मितीची दिशा मिळाली. देशातील सुगंधी तेलाची मागणी, बाजारपेठ व अर्थकारण यांचा अभ्यास मच्छिंद्र यांनी सुरू केला. मग पारंपरिक शेतीत अडकून राहण्यापेक्षा सुगंधी वनस्पतींची शेती आणि तेलनिर्मितीकडे वळण्याचे त्यांनी ठरवले. उद्यमशीलता त्यांच्याकडे होतीच. त्यादृष्टीने व्यवसायाचा आराखडा तयार केला. आपल्या भागातील जमीन, हवामान व पाणी यांचाही विचार त्यात होता. 

असा साकारला प्रकल्प 
सुरवातीचे प्रयत्न 

१) पहिली लागवड - चार वर्षांपूर्वी दीड एकरांवर जिरॅनियम तर लेमनग्रास, वाळा, पाल्मारोजा 
यांची एकूण अर्धा एकरावर पथदर्शक लागवड 
२) मुंबई, लखनौ आदी भागांतून रोपे आणली. सुरवातीला उत्पादन घेण्यात तांत्रिक अडचणी आल्या. अनुभवातून शिकत मार्ग काढला. 
३) बाजारपेठेतील मागणी व आपल्या कामाचा आवाका लक्षात घेत लागवड क्षेत्रात टप्प्याटप्प्याने वाढ केली. 
४) पहिल्या वर्षी सुगंधी तेल काढण्याचे प्रात्यक्षिक घेतले. ते जमल्यानंतर दोन वर्षांपासून त्यात नियमितता ठेवली आहे. 
 

 • सध्याचे सुगंधी वनस्पती लागवड क्षेत्र (एकर) 
 •  जिरॅनियम - ९ 
 • पाल्मारोजा व लेमनग्रास- प्रत्येकी दीड एकर 
 • वाळा - ५ 

उत्पादन 
जिरॅनियम 

 • लागवडीसाठी मध्यम प्रतीची जमीन अनुकूल. माळरानावरही घेणे शक्य. 
 • पाल्यापासून तेल काढता येते. वर्षभरात एकरी सरासरी ४० टन पाला. 
 • प्रति टनापासून एक किलो तेल. 
 • तीन वर्षे पीक घेता येते. 
 • तेलाला साडेबारा हजार रुपये प्रति किलो दर 
 • पहिल्या वर्षी- दीड लाख रुपये व नंतर प्रति वर्ष सरासरी ५० हजार रुपये एकरी खर्च 

पाल्मारोजा 

 • सर्वसाधारण जमिनीत येते. लागवडीनंतर तीन महिन्यांनी तेल काढता येते. 
 • प्रति डिस्टलेशन सुमारे २५ किलो तेल 
 • सरासरी अडीच हजार रुपये प्रति किलो दर 

लेमनग्रास (गवती चहा) 

 • साधारण जमिनीत, बांधावरही पीक येते. 
 • प्रति टनापासून सरासरी चार किलो तेल मिळते. 
 • सरासरी १५०० रुपये प्रति किलो दर 

वाळा 

 • भुसभुसीत जमीन अनुकूल. वनस्पतीच्या मुळ्यांपासून तेल काढले जाते. साधारण १८ महिन्यांनी तेल काढता येते. एकरी दोन टन मुळ्या मिळतात. 
 • प्रति टन मुळ्यांपासून सरासरी साडेसात किलो तेल मिळते. 
 • पंचवीस ते पस्तीस हजार रुपये प्रति किलो दर 

सुगंधी तेलनिर्मिती 

 • तेल निर्मितीसाठी पाचशे किलो क्षमतेची टाकी. पूर्वी या प्रकल्पासाठी एक लाख रुपये किंमतीचे यंत्र बसवले होते. आता दोन लाख रुपये किंमतीचे आधुनिक यंत्र बसवण्याची तयारी. त्यातून इंधन व खर्चात बचत साधणार. तयार झालेले तेल कॅनमध्ये साठवले जाते. 
 • या प्रक्रिया कामांत दररोज दहा मजूर व दोन व्यवस्थापक कार्यरत. त्यांना प्रक्रियेचे प्रशिक्षण. 

बाजारपेठ 
मच्छिंद्र म्हणाले, की सध्या मुंबई येथील ‘परफ्युम व कॉस्मेटीक’ क्षेत्रातील एका कंपनीला करार पद्धतीने 
तेलांचा पुरवठा केला जात आहे. सुगंधी तेलांना बाजारपेठेत मागणी मोठ्या प्रमाणात आहे. 
तेलाचा ‘फ्रॅग्रन्स’ व ‘फ्लेवर’ यांना मोठे महत्त्व आहे. 

सहकार्य 
मच्छिंद्र यांचे बंधू अनिल यांचे मोठे पाठबळ आहे. नातेवाईक युवराज कुटे शेतीचे व्यवस्थापन पाहतात. बीएस्सी ॲग्री, एमबीए पर्यंत त्यांचे शिक्षण झाले अहे. त्यांचे मंचर (जि. पुणे) येथे कृषी सेवा केंद्रही आहे. 

शेतकऱ्यांच्या भेटी 
चौधरी यांच्या या शेतीला आत्तापर्यंत राज्यासह देशभरातून असंख्य म्हणजे हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. त्यांना माहिती देण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे. 

काड्यांपासून कंपोस्ट खत 
तेल काढणी झाल्यानंतर काड्यांपासून वर्षभरात सुमारे वीस टन सेंद्रिय खत तयार होते. आपल्याच शेतात त्याचा वापर होतो. 

शेतीतील ठळक बाबी 

 • अकोले तालुक्‍याचा हा दुर्गम भाग आहे. आंभोळ गावापासून मुळा नदी वाहत असल्याने पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असली तरी संरक्षित आधार म्हणून सव्वा एकरांवर सुमारे अडीच कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याची सुविधा. 
 • संपूर्ण सतरा एकराला ठिबक सिंचन 
 • अन्य पिके- ऑलस्पाईसेस, मलेशियन चिंच, दुबई खजूर, बारा जातींच्या वेगवेगळ्या तुळशी, गुलाब, आंबे, चिकू, नारळ, हिमाचल हळद, बटाटे 
 • सुगंधी वनस्पतींची लागवड केल्यावर उन्हाळ्यात त्यांना सावली मिळावी यासाठी या शेतात 
 • शेवग्याची सहा एकरांवर लागवड. 
 • जिरॅनियमसाठी रोपवाटिका. दरवर्षी सुमारे दोन लाख रोपनिर्मिती 

आगामी नियोजन 

 • अधिक सुगंध असलेल्या परदेशी गुलाबाची लागवड करून त्याचे गुलाबपाणी, तेल काढणीचे नियोजन आहे. त्यासाठी लखनौ येथून १२० रोपे आणली आहेत. या गुलाबाच्या तेलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला दर मिळतो. 
 • सध्याच्या सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न त्याद्वारे तेल काढण्यासाठी "मोबाईल युनिट' उभारण्याचा संकल्प 

मच्छिंद्र म्हणतात 

 • शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सुगंधी पिकांची लागवड फायदेशीर - 
 • सुमारे दहा एकर क्षेत्र व त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये किंमतीचे प्रक्रिया यंत्र तसेच रोपांसाठी भांडवल वा गुंतवणूक अपेक्षित. गटाने शेतकरी एकत्र आल्यास खर्च विभागाला जाऊ शकतो. 
 • या शेतीविषयी माहिती देण्यासाठी मोफत मार्गदर्शन वा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा मानस 
 • तुळसी, वाळा आधारित ‘हर्बल वॉटर' सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात तयार करण्याचे 
 • नियोजन आहे. त्यासाठी तुळशीची दोन एकरांवर लागवड करणार. रोजमेरीचीही तेवढ्याच क्षेत्रात होणार लागवड. 

संपर्क- मच्छिंद्र चौधरी - ९३२२४०५५८१ 
अनिल चौधरी - ८८८८६८२३८८ 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...