agriculture story in marathi, Arote family has raised their income through floriculture. | Agrowon

फुलशेतीतून सुखाचा बहर

शांताराम काळे
शनिवार, 10 एप्रिल 2021

जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक वृत्तीतून मेहंदुरी (ता. अकोले, जि. नगर) येथील विकास आरोटे यांनी आपल्या सव्वापाच एकर शेतीचा विकास साधला आहे. वर्षभर शेवंती, झेंडू व अन्य फुलांचे उत्पादन घेत त्यातून शेतीचे व कुटुंबाचे अर्थकारण त्यांनी उंचावले आहे. शेतकरी कंपनीची स्थापना करून परिसरातील शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा देण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.

जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक वृत्तीतून मेहंदुरी (ता. अकोले, जि. नगर) येथील विकास आरोटे यांनी आपल्या सव्वापाच एकर शेतीचा विकास साधला आहे. वर्षभर शेवंती, झेंडू व अन्य फुलांचे उत्पादन घेत त्यातून शेतीचे व कुटुंबाचे अर्थकारण त्यांनी उंचावले आहे. शेतकरी कंपनीची स्थापना करून परिसरातील शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा देण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. तालुक्यातील मेहंदुरी येथील विकास आरोटे यांनी अभियांत्रिकी शाखेतून पदविका घेतली. त्यांची सव्वापाच एकर शेती आहे. पूर्वी एक एकर ऊस, त्यात आंतरपीक कोबी, अर्धा एकर बाजरी, गहू, भेंडी, हरभरा, ज्वारी अशी पिके विकास घ्यायचे. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची निवड केली. त्यात म्हैसूर, दिल्ली, बंगळूर, काश्‍मीर येथील फुलांची शेती पाहण्याची संधी मिळाली. त्यानंतर फुलशेतीची आवड निर्माण झाली. ॲस्टर फुलाची शेती काही वर्षे केली. मात्र शेवंती, झेंडू, कापरी आदी फुलांत सातत्य ठेवत सुमारे दहा वर्षांचा अनुभव गाठीस जमा झाला आहे.

फुलशेतीची पद्धत
दरवर्षी शेवंतीचे २० गुंठे ते एक एकर निवडतात. फुलेतोडणी सतत सुरू ठेवावी लागत असल्याने
मजूर व त्यावरील खर्च परवडत नसल्याने हे क्षेत्र मर्यादित ठेवले आहे. एक फूलपिकानंतर बाजरी व त्यानंतर पुन्हा खरिपात पुढचे फूलपीक असे नियोजन असते. शेवंतीची एप्रिल-मेमध्ये लागवड होते. हे संकरित पीक तीन महिन्यांत उत्पादन देण्यास सुरुवात करते असे विकास सांगतात. श्रावणात फुले सुरू होतात. ती गणपती, दसरा व दिवाळीपर्यंत सुरू राहतात.
ऑक्टोबरच्या दरम्यान कटिंग केल्यानंतर पुन्हा जानेवारीनंतर उत्पादन सुरू राहते. मार्गशीर्ष किंवा लग्नसराईच्या काळात फुलांना पुन्हा मागणी राहते.
परिसरातील क्षेत्र, आवक व हवामान यांच्या अनुषंगाने किलोला ४० ते ५० रुपये व कमाल १५० ते २०० रुपयांपर्यंतही दर मिळतात असे विकास म्हणाले.

उत्पादन व उत्पन्न
एकरी सुमारे १५ ते २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. साधारण २० गुंठे क्षेत्राचा विचार केल्यास
पाच दिवसांनी तोडणी येते. एकूण ३० पर्यंत तोडे होतात. एका तोड्यात सरासरी ५०० किलोच्या आसपास फुले मिळतात. दरवर्षी शेवंतीतून दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

झेंडू व कापरीची शेती
विकास म्हणाले, की दसरा, दिवाळीबरोबर अन्य हंगामासाठीही आम्ही दीड ते दोन एकरांत झेंडू घेतो.
अन्य हंगामात किलोला ३५ ते ४० रुपये दर सहज मिळून जातात. त्याचे एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळते. कापरीच्या फुलांचे लागवडीपासून ३५ दिवसांनी उत्पादन सुरू होते. त्यालाही चांगली मागणी असते. त्याचा आकार मोठा व रंग तपकिरी असतो. किलोला ६० ते ७० रुपये त्यास दर मिळतो.

ठळक बाबी

  • एका प्रयोग ऊस, झेंडू व कोबी असाही केला. याच झेंडू व कोबीचे उत्पादन चांगले मिळाले. मात्र दरांनी निराशा केली. तरीही ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळून गेले.
  • सर्व फुलांची शेती पॉली मल्चिंग, बेड व ठिबक पद्धतीने होते.
  • -चवळी व झेंडू असाही प्रयोग केला. सुमारे १९ गुंठ्यांत तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
  • झेंडूनंतर चवळी सुरू होते. किलोला ५५ रुपये दराने विक्री झाली. झेंडूही समाधानकारक झाला.
  • -आंतरपीक पद्धतीमुळे एक पीक गेले तरी दुसरे पीक काहीतरी देऊन जात असल्याचा अनुभव.
  • जिवाणू संवर्धक, गांडूळ खताचा वापर होतो. घर परिसर आणि शेतातील काडी-कचरा परस बागेत केळीच्या झाडांखाली एकत्र करून गांडूळ खताची निर्मिती केली जाते.
  • अनेक वर्षांपासून फुलांचे उत्पादन घेत असल्याने पुढील वर्षासाठी बियाणे घरचेच उपलब्ध होते. यामुळे बियाणे आणि खतांवरील खर्च कमी करण्यात विकास यशस्वी ठरले आहेत.
  • पत्नी अनिता व बंधू बाळासाहेब यांची मोठी मदत शेतीत होते.

विक्री व्यवस्थापन
फुलांची विक्री मुंबई, कल्याण, दादर नाशिक तसेच स्थानिक ठिकाणीही होते. उत्तम गुणवत्तेची फुले असल्याने व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी असते. काही व्यापारी थेट शेतातून फुले घेऊन जातात. अगस्ती मंदिर प्रसिद्ध ठिकाण असल्याने येथे विविध हार विक्रेत्यांनाही विक्री होते.

शेतकरी कंपनीची स्थापना
बारमाही फुलशेतीतून शेती व कुटुंबाचे अर्थकारण उंचावलेल्या विकास यांनी अगस्ती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना २०१५ मध्ये केली आहे. त्यास २६९ शेतकरी जोडले आहेत. कंपनीतर्फे झेंडूची रोपे पुरवणे, गावातच निविष्ठा विक्री केंद्र सुरू केले आहे. राइस मिल उभारण्याचा प्रयत्न आहे.

काळा-जांभळा भात
कंपनीच्या माध्यमातून आसाम राज्यातील काळा-जांभळा भात लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे.
सुरुवातीला ३ किलो बियाणे मिळाले होते. परिसरातील आदिवासींनाही बियाणे देण्यात आले.
आता एकूण १८०० किलो बियाणे संकलित झाले आहे. बियाणे किलोला २५० रुपये दराने पुरवण्यात येत आहे. हा तांदूळ पौष्टिक असून, ३५० रुपये प्रति किलो दराने विक्रीचा पुढील मानस आहे. स्वतः विकास यांनी २५ गुंठ्यांत त्याचे ६५० किलो उत्पादन घेतले आहे.

संपर्क- विकास आरोटे, ९९७५२९९२१४


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...
शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मदतीचा...कोल्हापूर : एकेकाळी महाविद्यालयात एकत्र धमाल...
पाच हजार कोटींचा विमा कंपन्यांना नफा पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे कवच...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
वेगवान वाऱ्याचा कोकण किनारपट्टीला फटका...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
विमा कंपन्यांना आयुक्तांचा दणका पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः देशात सध्या सोयाबीनचा मोठा तुटवडा जाणवत...