चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे रंग 

‘सोशल मीडिया’द्वारे संपर्कजाळे सुरेश यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून संपर्कजाळे निर्माण केले आहे. त्यांनी मंगल ॲग्रो फार्म नावाने यू ट्यूब चॅनलही सुरू केले आहे. शेळी, कोंबडी, पक्षी आदी विषयांतील व्हिडिओ ते चॅनेलवर अपलोड करतात. सुमारे २५ हजारांहून अधिक त्यांचे फॉलोअर्स आहेत. ट्विटर, फेसबुक, व्हॉटस ॲप, ब्लॉग यांचाही वापर ते मार्केटिंगसाठी करतात.
मुक्त संचार पध्दतीने पक्षांचे पालन. राजहंसाचे संगोपन
मुक्त संचार पध्दतीने पक्षांचे पालन. राजहंसाचे संगोपन

नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे या तरुण शेतकऱ्याने आपल्यातील चित्रकलेची आवड जोपासली. त्यातील उत्तुंग प्रतिभेला चालना देताना शेतीकडे जराही दुर्लक्ष केले नाही. शेळीपालनानंतर कडकनाथ कोंबडी तसेच पक्ष्यांच्या दहाहून अधिक प्रकारांचे व्यावसायिक पालन व त्यास चांगले मार्केट मिळवत या व्यवसायात सुरेशने आर्थिक बळकटी आणली आहे. जोडीला खाद्यतेलांचे उत्पादन घेत उत्पन्नाला जोड दिली आहे.  नगर जिल्ह्यातील माका (ता. नेवासा) येथील लिंबराज गुलगे हे सेवानिवृत्त शिक्षक. कुटुंबाची सहा एकर जमीन. मात्र, भागात सातत्याने पाण्याची चिंता. कापूस, ज्वारी, बाजरी यांसारखी पारंपरिक पिके ते घेत. लिंबराज यांना सुरेश व दत्तात्रय ही मुले. सुरेश यांनी जी. डी. आर्ट डीएड पर्यंत शिक्षण घेतले. आपल्यातील चित्रकलेतील प्रतिभेला अजून वाव देताना त्यांनी चित्रकला व विविध पेंटिंग्ज करण्यास सुरवात केली.  कलेसोबत वाढवली शेती  आपल्या पेंटिंग्जचे गॅलरीमध्ये प्रदर्शन भरवण्याबरोबर त्यांची विक्रीही सुरू केली. मात्र हे करताना सुरेश यांनी घरच्या शेतीची जबाबदारीही ओळखली. केवळ पीक उत्पादनावर थांबून आर्थिक उत्पन्न वाढणार नाही हे जाणले. मग २०१५ च्या सुमारास दहा शेळ्यांपासून शेळीपालनास सुरवात केली. उत्पन्नासाठी बराच कालावधी द्यावा लागत असल्याने जोड म्हणून कोंबडीपालन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार  ४० गावरान कोंबड्या खरेदी केल्या. स्वस्थ न बसता सतत उद्योगी राहण्याचा व प्रत्येक गोष्टीचा विस्तार करण्याचा सुरेश यांचा स्वभाव. त्यातूनच २०१६ मध्ये कडकनाथ कोंबड्यांचेही पालन करण्याचे ठरवले. झाबुआ (मध्यप्रदेश) येथून १२०० कोंबड्या आणल्या.  विविध पक्षीपालन व्यवसाय- ठळक मुद्दे 

  • सुरेश यांनी पक्ष्यांचे अन्य प्रकार आणून त्यांचेही संगोपन सुरू केले. 
  • सध्या गावरान, कडकनाथ, अशील (फायटर) जातीच्या कोंबड्या, टर्की, गीनीफाऊल, बटेर, व्हाईट पेकीन बदक, इंडियन रनर बदक), खाकी कॅंपबेल बदक, राजहंस कबुतर, लव्हबर्ड जातीचे पक्षी, ससे, सिरोही, उस्मानाबादी जातीच्या दहा शेळ्या व एक बोअर बोकड एवढी विविधता पाहण्यास मिळते. 
  • कोंबड्या व पक्ष्यांना मुक्त संचारासाठी एक एकर क्षेत्र. त्याला चारही बाजूंनी कुंपण. 
  • शेळी, कुक्कुट, मशरुम, मधमाशी, मत्स्यपालन आदी विषयांत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण. 
  • तमीळनाडू येथून दहा हजार रुपयांचा अशील जातीचा (फायटर) कोंबडा आणला आहे. 
  • वडिलांसह बंधू दत्तात्रय, आई सौ. मंगल, भावजय सौ. नम्रता व पत्नी सौ. कल्याणी यांची शेतीत मदत. 
  • जागेवरच मार्केट  सुरेश पक्षांची संपूर्ण बॅच घेण्यापेक्षा साधारण एक महिने वयापर्यंत त्यांची वाढ करून विक्री करण्यावर भर देतात. त्यातून खर्च कमी होऊन पैसे लवकर हाती येतात असे ते म्हणतात. कडकनाथ कोंबडी ८०० रुपये, गावरान कोंबडी ४०० रुपये, राजहंसाची जोडी साडेचार हजार रुपये, टर्की पक्षी २५० रुपये प्रति किलो, बटेर ६० रुपये, ससे ५०० रुपये प्रती नग, लव्हबर्ड पक्षी जोडी ६०० रुपये, बदक ७०० रुपये प्रति पक्षी, गिनीफाऊल १४०० रुपये प्रति जोडी असे पक्षांचे दर आहेत. करडांची तीनशे रुपये प्रति किलो दराने विक्री होते. बहुतांश ग्राहक जागेवरून खरेदी करतात.  तेलनिर्मिती  सुरेश यांनी भागात प्रथमच भुईमूग, करडई, तीळ (काळा व पांढरा), खोबरा आदींपासून तेलनिर्मिती सुरू केली आहे. त्यासाठी लाकडी घाणा आणला आहे. खोबऱ्याचे व तिळाचे तेल ५०० रुपये तर करडई व शेंगदाण्याचे तेल प्रतिकिलो २४० रुपये दराने विकण्यात येते. तेलाला पुणे, मुंबईसह राज्यात अन्य ठिकाणीही मागणी आहे.  प्रशिक्षण  आपल्या शेतपरिसरात पूरक व्यवसायाचे सशुल्क प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. प्रती बॅच ५० ते ९० जणांची असते. प्रशिक्षणार्थींनी कमी खर्चाची विविध मॉडेल्स पाहण्याबरोबर कडकनाथच्या चिकनचा आस्वाद मिळतो. कोणतीही गोष्ट मोफत दिल्यास त्याची किंमत राहात नाही हे उमगून सुरेश यांनी प्रतिदिन शंभर रुपये याप्रमाणे शिवारफेरीही सशुल्क केली आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत असे नेहमी म्हटले जाते. सुरेश यांचे प्रयत्न त्याच वाटेवरचे आहेत. शेती, पूरक व्यवसाय, प्रशिक्षण या सर्व बाबींमधून महिन्याला सुमारे ५० हजार रुपये किंवा त्यापुढे उत्पन्न मिळवण्याचा सुरेश यांचा प्रयत्न असतो.  चित्रकलेस वाव  आपल्या कुशल हातांद्वारे रेखाटलेल्या सुरेश यांच्या पेंटिंग्जना चांगली मागणी असते. त्यांच्या चित्रांना दर्जा प्राप्त झाला असून बारा हजार रुपये प्रतिचौरस फूट दराने ते चित्रांची विक्री करतात.  चारा पिकांची लागवड 

  • राखीव क्षेत्रात शेवरी वा चारा पिके 
  • बियांची मागणीनुसार साडेतीनशे रुपये प्रतिकिलो दराने विक्री 
  • चाऱ्याच्या ठोंबाची प्रतिनग एक रुपया याप्रमाणे विक्री 
  • आगामी नियोजन- ॲग्रो टूरिझम, गीर गायींचे पालन 
  • संपर्क- सुरेश गुलगे- ८६०५३५३२१२   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com