agriculture story in marathi, Arun Ghavad is doing horticulture based farming to raise the income. | Agrowon

फळबाग शेतीतून गवसला शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग

संतोष मुंढे
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब गव्हाड यांनी पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा फळबाग केंद्रित व व्यावसायिक शेती पद्धतीची निवड केली आहे. मोसंबी व डाळिंब ही मुख्य पिके निवडून जोडीला हंगामी फळपिके घेत त्यांनी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब गव्हाड यांनी पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा फळबाग केंद्रित व व्यावसायिक शेती पद्धतीची निवड केली आहे. मोसंबी व डाळिंब ही मुख्य पिके निवडून जोडीला हंगामी फळपिके घेत त्यांनी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब गव्हाड यांना शेतीची पहिल्यापासूनच आवड आहे. ते तीन वर्षांपासून गावचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांची वडिलोपार्जित २३ एकर शेती आहे. पत्नी अर्चना, आई कौसल्या व मुलगा ऋतुराज असे त्यांचे कुटुंब आहे. साधारण २००९-१० पर्यंत अरुणराव पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. त्यामध्ये कपाशी, ज्वारी, बाजरी अशी पिके असायची. मात्र कष्ट, त्या तुलनेत होणारा खर्च यांचा हिशेब पाहिला, तर अर्थकारणाचा ताळमेळ बसविणे अवघड व्हायचे. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा फळबाग लागवडीला त्यांनी अधिक भर दिला. सुरुवातीला
मोसंबीची निवड केली.

सिंचनाची केली सोय
फळबाग करायची तर पाण्याची सोय महत्त्वाची. मग आधी असलेल्या विहिरीला आणखी चार विहिरींची जोड २००७ ते २०१३ या काळात दिली. एवढ्यावरच न थांबता शासकीय योजनेतून एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे २०१४ मध्ये तयार केले. त्यानंतर पुन्हा जवळपास ७० लाख लिटर पाणी क्षमतेचे शेततळे स्वखर्चातून २०१५ मध्ये उभारले. त्यातून सिंचनाची सक्षम सोय तयार केली.

मोसंबीची शेती
अरुणरावांनी २०१० ते २०१४ या काळात सुमारे आठ एकरांवर मोसंबीची सुमारे १४०० झाडे उभी केली. त्यात २०१० मध्ये साडेपाच एकर, तर २०१४ मध्ये अडीच एकरांतील मोसंबीचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने उत्पादनक्षम झालेल्या बागेने सातत्याने खर्चाच्या तुलनेत उत्पन्न देण्याचं काम केलं. अलीकडील उत्पादनाचा विचार करता २०१८-१९ मध्ये साडेपाच एकरांत सुमारे ४० टन उत्पादन झालेल्या मोसंबीला ३५ हजार रुपये प्रति टनाचा दर मिळाला. मागील वर्षी आठ एकरांत ६० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. ही बाग बागवानाला साडेसतरा लाख रुपयांना उक्‍ती दिली.

डाळिंबाची शेती
दुसरे फळपीक स्वीकारताना अरुणरावांची २०१७ मध्ये पाच एकरांत भगवा डाळिंबाची
१४ बाय ८ फूट अंतरावर लागवड केली. क्षेत्र अलीकडे वाढविताना २०२० मध्ये जवळपास तीन एकरांत लागवड केली. एकरी सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च होणाऱ्या
पूर्वीच्या पाच एकर बागेतून २०१८ मध्ये एकूण ८ ते ९ टन उत्पादन मिळाले. त्यास ३५ रुपये प्रति किलो दर मिळाला. सन २०१९ मध्ये एकूण उत्पादन २२ टनांवर पोचले. मागील वर्ष नुकसानीचे ठरले. अति पावसामुळे पुरेसे ‘सेटिंग’ झाले नाही. केवळ पाच टनच उत्पादन झाले.

वळले खरबुजाकडे
अरुणराव आता खरबुजाकडे वळले. दोन टप्प्यांत जवळपास अडीच एकरांत त्यांनी व्यवस्थापन केले.
पहिल्या एक एकरात डाळिंबाच्या बागेत घेतलेल्या खरबुजाचे एकरी सात टन उत्पादन तर १४ ते १८ रुपये प्रति किलो दर मिळाला. सद्यःस्थितीत दीड एकर डाळिंब बागेतील खरबुजाच्या वेलींना दर्जेदार फळे लगडली आहेत.

स्लरी व शेणखताचा वापर
प्रत्येक फळपिकाला प्रत्येक वर्षी सुमार पाच ते सहा वेळा सेंद्रिय स्लरी दिली जाते. यात मुख्य, सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा पद्धतींचा समावेश असतो. यासोबत प्रत्येक फळझाडाला दरवर्षी २० किलो शेणखत दिले जाते.

सौरपंपानं सिंचन झालं सोपं
रात्रीच्या वेळी फळपिकांना सिंचन करण्याची वेळ येऊ नये म्हणून अलीकडेच दोन सौरपंप उभारले आहेत. ही सोय करताना प्रत्येक विहिरीतील व शेततळ्यातील पाणी एकमेकांत पोचविण्याची सोय
केली. प्रति सौरपंपाची कार्यक्षमता तीन एचपीची आहे. त्यांना एकाच ठिकाणी जोडत त्याची
क्षमता वाढवून सिंचनासाठी आवश्‍यक दाब निर्माण केला.

माती, पाणी व देठ परीक्षण
दोन वर्षांपासून माती परीक्षणासोबतच पाणी, तसेच फळपिकांत देठ परीक्षणही केले जाते.
त्या आधारे अन्नद्रव्य व्यवस्थापन केले जाते. त्यातून खतवापर व खर्चावर नियंत्रण मिळविणे शक्‍य होत असल्याचे अरुणराव सांगतात.

टोमॅटोची साथ
अरुणराव सांगतात की टोमॅटोनेही आपल्याला एकवेळ साथ दिली. मोसंबीत सुमारे पावणेपाच एकरांत २०१६ मध्ये टोमॅटोची लागवड केली होती. नांदेड, परभणी, बिदर, सोलापूर आदी बाजारपेठांमध्ये जाऊन विक्री केली. प्रति क्रेट ६०० ते एकहजार रुपये दर मिळाला. उत्पन्नही चांगले मिळून आर्थिक आधार झाला.

शेतीतील महत्त्वाचे

  • संपूर्ण क्षेत्र टप्प्याटप्प्याने आणले सूक्ष्म सिंचनाखाली
  • संपूर्ण शेतीला संरक्षण कुंपण
  • पत्नी अर्चनाही सांभाळतात शेतीतील जबाबदारी.
  • ३० देशी व संकरित जनावरांचा सांभाळ
  • खड्ड्यात न टाकता शेणखत जमिनीवर कुजविण्यात येते.
  • मोसंबीला तीन वेळा तीन ते चार महिन्याच्या अंतराने खते
  • डाळिंबाला ताण तोडतेवेळी पहिले पाणी ठिबक संचाने ७ ते ८ तास.
  • मोसंबीची बाग नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येते ताणावर. एक जानेवारीच्या सुमारास ताण तोडताना ठिबक संचाद्वारे चार ते पाच तास पाणी.

संपर्क- अरुण गव्हाड, ९९२३७७५६७०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पॅलेट स्वरूपातील कोंबडी खतनिर्मितीनाशिक जिल्ह्यातील बल्हेगाव (ता. येवला) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनाचा आले शेतीतील आदर्शमौजे शेलगाव (खुर्द) (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद)...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
कडक जमिनींसाठी ठरतोय ‘व्हायब्रेटिंग...खोल जमिनीत तयार झालेला कडक थर फोडण्यासाठी तसेच...
पूरक व्यवसायांतून ‘नंदाई’ ने उभारले...साधारण अठरा वर्षांपूर्वी भावाने रक्षाबंधनाला शेळी...
शेतीचे शास्त्र अभ्यासून आदर्श बीजोत्पादनसवडद (जि. बुलडाणा) येथील विनोद मदनराव देशमुख या...
विषाणूजन्य रोग अन् ‘कीडमुक्त क्षेत्रा’...मागील वर्षी राज्यातील टोमॅटो पट्ट्यात कुकुंबर...
पुन्हा जोडतोय शेतीशीपुणे शहराजवळील पडीक शेत जमिनीवर ‘अर्बन फार्मिंग'...
देवरूख भागात फुलली स्ट्रॉबेरीमहाबळेश्‍वरसारख्या थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणात...
मांस उत्पादनांची ‘ऑनलाइन’ विक्रीकोरोना संकटाच्या कालावधीत अनेकांच्या नोकरीवर गदा...
साठे यांचे लोकप्रिय पेढेयवतमाळ जिल्ह्यातील लोणीबेहळ (ता. आर्णी) येथील...
जलसमृद्धीतून मिळवली संपन्नता नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता.चांदवड) गावाने...
फळबाग शेतीतून गवसला शाश्‍वत उत्पन्नाचा...कौडगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील अरुण बाबासाहेब...
गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनात ‘मास्टर’सांगली जिल्ह्यातील नेहरूनगर (निमणी) (ता. तासगाव)...
विद्यार्थी बंधूंनी उभारला जैविक स्लरी...पुणे जिल्ह्यातील नानगाव येथील प्रतीक व प्रवीण या...
स्वादिष्ट हुरड्याचे उत्पादन अन् ‘...परभणी जिल्ह्यातील लिमला येथील तरुण शेतकरी...
भाजीपाला, फळबागेतून बसवली आर्थिक घडीसांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील सोमनाथ...
काटों पे चलके मिलेंगे साये बहार के...रुक जाना नहीं तू कहीं हार के काटों पे चलके...