agriculture story in marathi, Ashish Bolke is doing successful mandarin farming with good management. | Page 2 ||| Agrowon

बोलके यांचे दर्जेदार संत्रा उत्पादन

विनोद इंगोले
गुरुवार, 26 ऑगस्ट 2021

कचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील आशिष बोलके यांनी आपल्या १८ एकर शेतीपैकी १५ एकरांत संत्रा बागेचे सुनियोजित संगोपन करून दरवर्षी दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे.   

कचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील आशिष बोलके यांनी आपल्या १८ एकर शेतीपैकी १५ एकरांत संत्रा बागेचे सुनियोजित संगोपन करून दरवर्षी दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. देशांतर्गत निर्यातक्षम फळांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला विक्री करून त्या माध्यमातून जादा दर मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शीप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडील काळात येथील अनेक शेतकऱ्यांनी संत्र्याच्या जैविक व्यवस्थापनावर भर दिला आहे. तालुक्यातील कचारी सावंगा गावचे आशिष बोलके यांनी अनेक वर्षांच्या अनुभवातून व्यवस्थापनात सुधारणा करीत उत्पादन व गुणवत्ता चांगली जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. सेंद्रिय व रासायनिक असा समतोल साधला आहे.

शेतीची जबाबदारी
आशिष यांचे वडील वीज वितरण कंपनीत नोकरीस होते. त्यांची वडिलोपार्जित सहा एकर शेती होती. पदवी व ‘आयटीआय’चा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण आपणही नोकरी करावी असे आशिष यांना वाटत होते. दरम्यान, वडिलांनी नव्याने १२ एकर शेती घेतली. आशिष हे कुटुंबात एकुलते एक असल्याने संपूर्ण १८ एकर शेतीची जबाबदारी सांभाळावी व त्यातच करियर करावे, असे त्यांनी ठरवले. साधारण पंधरा वर्षांपासून ते शेतीची सूत्रे सांभाळत आहेत. जोडीला त्यांचे कृषी सेवा केंद्रही आहे.

संत्रा बाग व्यवस्थापन

  • सुमारे १५ एकरांत संत्र्याची सुमारे २०५० झाडे आहेत. वर्गीकरण करायचे झाल्यास २५ वर्षे वयाची सुमारे ९००, आठ वर्षे जुनी ५००, तर सहा वर्षांपूर्वी लागवड केलेली साडेसहाशे झाडे आहेत. पिकाच्या काही अवस्थांमध्ये रिंगण पद्धतीने ठिबकचा वापर होतो. झाडाच्या मुळांपासून काही विशिष्ट अंतरावर पाणी दिले जाते. त्यातून झाड रोगमुक्‍त ठेवण्याचा प्रयत्न असतो. पाण्यासाठी बोअरवेल, दोन विहिरी आहेत. १८ एकरांपैकी तीन एकर क्षेत्र कोरडवाहू आहे. यात सोयाबीन घेतले जाते.
  • बागेचे आरोग्य जपण्यासाठी शेणखताचा वापर दरवर्षी प्रति झाड ५० ते ७० किलो अथवा झाडाच्या वयानुसार होतो. आशिष म्हणतात, की झाडांवर पाने कमी असणे, झाड सलावणे याचे मुख्य कारण म्हणजे पानांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा खोडामार्फत न होणे. फायटोप्थोरा बुरशीजन्य रोगामुळे झाडाचे मोठे नुकसान होते. खोडातून डिंक्‍याचा स्राव बाहेर येतो. त्यामुळे खोडाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
  •  वर्षातून तीन वेळा कीडनाशकांचा वापर ते करतात. वर्षातून दोन ते तीन वेळा जेथून पाने चालू होतात त्याखाली फांद्यावर बुरशीनाशक फवारल्यास फायदा होतो असा अनुभव आहे. संत्र्यात काही शेतकरी जीएचा वापर करतात. यामुळे वायबारचे (वेडीवाकडी फळे) प्रमाण वाढते. जीएचा वापर फळांचा आकार सेट करण्यावेळी अति आवश्‍यक असेल तरच करावा, असे आशिष अनुभवातून सांगतात.
  • रसशोषक किडी, पतंग, प्रौढ किडी व फळमाशी यांच्या अनुषंगाने कीडनिहाय पिवळे, निळे चिकट सापळे, मक्षिकारी सापळे लावले आहेत.
  •  झाडांवरील फळांची संख्या पाहता फांद्या तुटण्याची भीती राहते. त्यासाठी झाडाला बेगण्याचा (बांबू) आधार दिला जातो.
  • तणविरहित बाग ठेवण्यावर भर दिला असून, दर दीड महिन्याने बागेची स्वच्छता केली जाते.
  • वर्षातून चार महत्त्वाच्या टप्प्यात खतांचे नियोजन होते. यात डिसेंबर-जानेवारी, त्यानंतर फळ ज्वारीच्या आकाराएवढे असताना युरिया व कॅल्शियम, एप्रिल-मे व जून-जुलै आदींचा समावेश असतो.

उत्पादन
शक्यतो आंबिया बहरच घेण्यात येतो. एकरी ८ ते १० टन उत्पादन मिळते. एकरी व्यवस्थापन खर्च किमान ७० हजार ते ७५ हजार रुपये येतो.

तोडणी नियोजन
बागेतील फळांची तोड एकाचवेळी शक्‍य होत नाही. तोडणी लवकर केल्यास लहान फळांना बाजारात दर मिळत नाही आणि उशिरा केल्यास सुरुवातीला झाडावर असलेली दर्जेदार फळे राहत नाहीत. त्यामुळे ३० ते ३५ टक्‍के नुकसान संभवते. हे नुकसान टाळण्यासाठी तोडणी टप्प्याटप्प्याने करून आकार आणि योग्य दर यांचा समन्वय साधला जातो. यामुळे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन शक्‍य होते. कारंजा घाडगे (ता. वर्धा) येथील निर्यात सुविधा केंद्राला संत्र्याचा पुरवठा होतो. या भागातीलच एका कंपनीला चार वर्षांपासून अधिकाधिक संत्रा दिला जातो. उर्वरित विक्री कळमणा-नागपूर बाजारात केली जाते.

मिळालेले दर
सन २०१७-१८ मध्ये प्रति टन ३५ हजार रुपये, २०१८-१९ मध्ये ३९ हजार रुपये तर कोरोना लॉकडाउन काळात १९ हजार रुपये दर मिळाला. या काळात बाजारातील दर प्रति किलो सात ते १० रुपयांच्या दरम्यान होते. या वर्षी आंबिया बहरातील फळांना ३५ हजार ते ४० हजार रुपये, तर मृग बहरातील फळांना ५० हजार रुपये दर मिळविणार असा विश्‍वास आशिष व्यक्‍त करतात. यामागे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन व दर्जा ही कारणे ते नमूद करतात.

संपर्क- आशिष बोलके, ९६२३११४६४६


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...