आयरीश मातीमध्ये सापडला नवा जिवाणू

आजवर बुरशी असल्याचे मानले जात असलेल्या स्ट्रेप्टोमायसेस हा जिवाणू वैद्यकीय उपयुक्त अशी प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा आहे. (स्रोत ः जी. क्विन्न, स्वानसी विद्यापीठ)
आजवर बुरशी असल्याचे मानले जात असलेल्या स्ट्रेप्टोमायसेस हा जिवाणू वैद्यकीय उपयुक्त अशी प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा आहे. (स्रोत ः जी. क्विन्न, स्वानसी विद्यापीठ)

आयर्लंड येथील मातीमध्ये संशोधकांना आजवर अज्ञात असलेली जिवाणूंची प्रजात आढळली आहे. हा जिवाणूमुळे वैद्यकीय कारणांसाठी उपयुक्त ठरू शकेल, असे प्रतिजैविक बनवणे शक्य होणार आहे. सध्या प्रतिजैविकांना प्रतिकारकता विकसित केल्यामुळे आरोग्यासाठी हानीकारक ठरणाऱ्या सहा जिवाणूंपैकी चार जिवाणूंना हे प्रतिजैविक रोखू शकेल, असा दावा स्वानसी विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. युरोपमध्ये प्रतिजैविकांना प्रतिकारकता विकसित केलेल्या जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे २०५० पर्यंत सुमारे १२ लाख लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या समस्येला जागतिक आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका मानले आहे. प्रतिजैविकांना पर्याय ठरतील अशा औषधांचा शोध सध्या सुरू आहे. उत्तर आयर्लंड भागातील फेरमानाघ येथील बोहो प्रदेशातील मातीच्या प्रामुख्याने अल्कलीयुक्त गुणधर्मासह कुरणांची आहे. ही माती जखमा भरून येण्यासाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिक संस्कृतीनुसार अत्यल्प प्रमाणातील माती कॉटनच्या कपड्यात गुंडाळली जाते. दातदुखी, घसा आणि मानेच्या विविध दुखण्यामध्ये त्याचा वापर केला जातो. येथे पूर्वी वास्तव्य असलेल्या डॉ. गेरी क्विन्न यांना माहीत होते. संशोधकांनी या मातीचे विश्लेषण केले असून, त्यातून स्ट्रेप्टोमायसिस ची नवी प्रजाती ओळखली आहे.

  • स्वानसी विद्यापीठातील वेल्स, ब्राझील, इराक, उत्तर आयर्लंड येथील संशोधकांच्या गटाने स्ट्रेप्टोमायसेस स्पे. मायरोफोरिया ही नवी जिवाणू प्रजाती शोधली आहे. त्याचे नाव स्ट्रेप्टोमायसेस स्पे. मायरोफोरिया असे ठेवण्यात आले आहे. ही प्रजाती विंटरग्रीन वनस्पतीच्या तेलाप्रमाणे विशिष्ट गंध निर्माण करते.
  • सध्या प्रतिजैविकांना प्रतिकारकता विकसित केलेल्या सहा जिवाणू हे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. या सहा पैकी १) व्हॅन्कोमायसीनला प्रतिकारक एन्टेरोकोक्कस फेईसीयम (व्हिआरई), २) मेथिसिलिन प्रतिकारक स्टॅफिलोकोक्कस ऑरस (एमआरएसए), ३) क्लिसियेल्ला न्यूमोनिया आणि कार्बेनेपेनेम प्रतिकारक अॅसिनेटोबॅक्टर बौमानीई या जिवाणूंविरुद्ध नवी प्रजाती अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकेल, असे संशोधनात आढळले आहे.
  • यातील नेमक्या कोणत्या घटकामुळे सूक्ष्मजीवांचा वाढ रोखली जाते, या विषयी अद्याप फारसे ज्ञान नाही. त्यावर संशोधन करण्यात येत आहे. प्रो. पॉल डायसन यांनी सांगितले, की आमच्या संशोधनामुळे नव्या प्रतिजैविकांच्या शोधासाठी पारंपरिक औषधे उपयुक्त ठरू शकतील, ही बाब पुढे आली आहे. या नव्या जीवाणुमुळे सहा हानीकारक सूक्ष्मजीवांपैकी ४ सूक्ष्मजीवांना रोखणे शक्य होणार आहे.
  • हे संशोधन ‘फ्रंटिटर्स इन मायक्रोबायोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com