Agriculture story in marathi bakery products and their importance | Agrowon

बेकरी व्यवसायातील विविध उत्पादने

राजेंद्र वारे
शनिवार, 7 मार्च 2020

इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. थोड्याशा गुंतवणुकीत हा व्यवसाय उत्तम रीतीने करता येतो. बेकरी व्यवसायातील विविध उत्पादने व त्यासाठी लागणाऱ्या यंत्रांविषयी आजच्या लेखात माहिती घेऊ...
 

इतर व्यवसायांच्या तुलनेत बेकरी व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. थोड्याशा गुंतवणुकीत हा व्यवसाय उत्तम रीतीने करता येतो. बेकरी व्यवसायातील विविध उत्पादने व त्यासाठी लागणाऱ्या यंत्रांविषयी आजच्या लेखात माहिती घेऊ...
 
आज बेकरी व्यवसाय ही काळाची गरज बनली आहे. सध्या बेकरीतील विविध उत्पादने मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्यामुळे या उत्पादनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी ठरावीक प्रसंगी म्हणजेच फक्त वाढदिवसालाच बेकरीतील केक खाल्ला जायचा. आता मात्र कोणत्याही प्रसंगी केक अथवा इतर बेकरी उत्पादने सर्रास खाल्ली जातात. सध्या वाढत्या मागणीमुळे बेकरी उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू लागली आहे.
 
विविध बेकरी उत्पादने
अ) ड्राय बेकरी उत्पादने
१) खारी

खारीमध्ये चीज, जीरा आणि मेथी असे प्रकार बनवता येतात.

२) टोस्ट
मिल्क, टूटी फ्रुटी, इलायची आणि मसाला असे टोस्टचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

३) बटर
बटरमध्ये मसाला, जीरा आणि ओवायुक्त असे विविध स्वादाचे बटर मिळतात.

४) क्रीमरोल 
चॉकलेट, पाईन ॲप्पल, मँगो, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी असे क्रीमरोलचे विविध प्रकार आहेत.

५) कुकीज ः
कुकीजमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत यामध्ये पिस्ता, चोको चिप्स, चॉकलेट, ड्राय फ्रुट, स्विस बेरी, पीनट बटर, जिंजर, ओट्स आणि काजू विशेष लोकप्रिय आहेत.

ब) वेट बेकरी उत्पादने
१) ब्रेड

होल व्हीट (गव्हापासून बनवलेला), मैदा, गार्लिक, मिल्क, सॅंडविच, फॅमिली, डोनटस् , ब्रेड स्टिक्स असे ब्रेडचे विविध प्रकार आहेत.

२) पाव
पावापासून बनविलेल्या विविध पदार्थांप्रमाणे पाव बनविले जातात यामध्ये बन पाव, कच्ची दाबेली पाव, बर्गर बन पाव, पिझ्झा बेस पाव इ. प्रकार आहेत.

केकचे प्रकार
केके सर्वांनाच प्रिय असतो. सध्या केकचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. यापैकी ब्लॅक फॉरेस्ट, पाईन ॲप्पल, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मावा, रस मलाई, रेड वेलवेट, ब्लू बेरी, ब्लू बेरी, चोको चिप्स, ग्रीन ॲपल, मुस केक, बटर, फोटो केक, डेझर्ट, आईस क्रीम केक विशेष लोकप्रिय आहेत.
 
बेकरी व्यवसायातील विविध यंत्रे ः

 • वजन काटा
 • शिफ्टर/सिव्हर (चाळण्यासाठी उपयुक्त)
 • डफ मिक्सर ः मिसळण्यासाठी उपयुक्त
 • शिटर/शिटिंग मशिन (पोळी पातळ लाटण्यासाठी उपयुक्त)
 • बन डिव्हायडर
 • कटर
 • मोल्ड (साचा)
 • बेकिंग ओव्हन
 • प्रुफर (ब्रेड फुगविण्यासाठी )
 • ब्रेड स्लाईसर (ब्रेडचे काप करण्यासाठी)
 • हॅन्ड सिलर
 • प्लॅनेटरी मिक्सर
 • डीप फ्रीझ
 • शीतगृह

या सर्व यंत्रांच्या खरेदीसाठी साधारणपणे १५ ते १८ लाख रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो.  
 


इतर कृषी प्रक्रिया
खरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....
गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...
केळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
भाजीपाला, फळे प्रक्रियेसाठी अत्याधुनिक...भाजीपाला व फळे प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे....
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
अननसापासून जॅम, स्क्वॅश, मुरंब्बाअननसाच्या गरामधे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात...
मोसंबी, आवळा वाढवितात रोग प्रतिकारशक्ती सध्याच्या काळात योग्य व समतोल पौष्टिक आहार...
संरक्षक पदार्थांचा प्रमाणबद्ध वापर...संरक्षक पदार्थ म्हणजे असे घटक जे पदार्थामध्ये...
आंब्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थआंबा फळावर आधारित प्रक्रिया लघुउद्योग निश्चितपणे...
फळे व पालेभाज्यांचे प्रीकूलिंग, पॅकिंग...फळे व भाज्या नाशवंत असल्यामुळे वेळीच त्यांची...
काढणीपश्चात टिकवण क्षमतेवर परिणाम...भाजीपाला पिकांमध्ये अधिक काळ साठविण्यावर अनेक...
पदार्थाच्या मूल्यवर्धनासाठी गुलकंदाचा...गुलाब हे फूल म्हणून प्रसिद्ध आहेच त्याच बरोबरीने...
साठवणीतील धान्यावरील प्राथमिक किडीजगभरामध्ये किडीमुळे अन्नधान्याचे प्रति वर्ष...
वाढवा मटकीची पौष्टिकतामटकीचे बियाणे क्षारांमध्ये (मीठ)भिजवल्याने...
शेंगदाण्यापासून विविध पदार्थांची...पौष्टिक गुणधर्मामुळे शेंगदाण्यापासून बनविलेल्या...
औषधी कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थकवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या...
केक विक्रीतून मिळतील रोजगाराच्या संधीबेकरी पदार्थांत केक या पदार्थाला अनन्यसाधारण...