agriculture story in marathi Balkrishna Belnekar has done Bamboo plantation in 65 acres. | Page 2 ||| Agrowon

साठ एकरांवरील बांबूलागवडीतून समृद्धी

एकनाथ पवार
गुरुवार, 7 ऑक्टोबर 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस (ता..कुडाळ) येथील बाळकृष्ण (दादा) शंकर बेळणेकर यांनी बांबू पीक पद्धतीवर भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने लागवडीत वाढ करीत क्षेत्र ६० एकरांवर नेत त्यातून आर्थिक समृद्धी साधली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस (ता..कुडाळ) येथील बाळकृष्ण (दादा) शंकर बेळणेकर यांनी बांबू पीक पद्धतीवर भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने लागवडीत वाढ करीत क्षेत्र ६० एकरांवर नेत त्यातून आर्थिक समृद्धी साधली आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ तालुक्यातील झाराप –शिवापूर मार्गावर वाडोस हे माणगाव खोऱ्यातील निसर्ग संपन्न गाव आहे. खरिपात मोठ्या प्रमाणात भात उत्पादन, आंबा, काजू, नारळ, सुपारी यासह उन्हाळी-पावसाळी भाजीपाल्याची पिके शेतकरी घेतात. कोकणात बांधावर सर्वत्र बांबू लागवड असते. वाडोस गावातील बाळकृष्ण ऊर्फ दादा बेळणेकर हे बांबू उत्पादक म्हणून पंचक्रोशीत ओळखले तीस ते ३५ वर्षांपूर्वी शासनाच्या १०० टक्के फलोद्यान योजनेतून साडेचार हजार काजूरोपांची लागवड त्यांनी केली. तीन चार वर्षांपासून त्यातून उत्पादन मिळू लागले. काही वर्षांनंतर अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व एकूणच वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम बागेवर दिसू लागला. किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढत गेला. उपाययोजना करूनही अपेक्षित उत्पादन मिळेना. दरम्यान बेळणेकर यांना बांबू लागवडीचा पर्याय मिळाला. शेताच्या बांधावर असलेली काही बेटे हमखास उत्पादन देत होती. त्यामुळे काजू बागेत ज्या झाडांची मरतूक झाली तेथे व पडीक जमिनीत बांबू लागवड करण्यास सुरवात केली.

रोपनिर्मिती कौशल्य
सुरवातीला बेळणेकर स्वतःकडील बांबू बेटातील रोपे काढून त्यांची थेट लागवड करायचे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड करावयाची असल्याने बांबूला कोंब फुटण्याची प्रकिया सुरू असते. एका बांबूला पाच ते सहा कोंब त्या कालावधीत येतात. मात्र लागवडीसाठी रोपे काढताना कोंबाचे नुकसान होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी अनेक ठिकाणी चौकशी केली. परंतु पुरेशी योग्य माहिती मिळाली नाही. अखेर स्वतःच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. डिसेंबरमध्ये लागवडीयोग्य बांबू बाहेर काढून तीन फुटांवर तोड केली. वरचा भाग विक्रीसाठी दिला. तीन फुटांचा खालील मुळाचा तुकडा पिशवीत भरला. त्यात लागवड केलेल्या बांबूला पाणी दिले. तीन चार महिन्यात कोंब फुटू लागले. त्याची लागवड केली. पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता लागवडीसाठी आवश्यक रोपे तयार केली जातात. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड होते. बेळणेकर यांना शेतीत कुटुंबाची भक्कम साथ मिळते. मुलगी सरीता ‘हॉर्टीकल्चर’विषयातून ‘एमएस्सी’ झाली आहे. तिच्यासह पत्नी वैशाली यांची मोलाची मदत होते.

पीकपद्धती

 • ९० एकर जमीन.
 • बांबू लागवडीचा ३१ वर्षांचा अनुभव.
 • ६० एकरांवर बांबू लागवड. २० एकरांवर काजू.
 • पाच एकरांत सुपारी, नारळ
 • तीन ते चार एकरांत भात उत्पादन.

बांबू लागवडीतील मुद्दे

 • एप्रिल-मेमध्ये दोन बाय दोन फूट लांबी-रुंदी आणि दीड फूट खोलीचा खड्डा खोदला जातो.
 • खड्डा पालापाचोळा, शेणखत, मातीने पूर्णपणे भरला जातो.
 • जूनच्या पहिल्या आठवड्यात तयार केलेल्या रोपांची लागवड होते.
 • एकाच रेषेतील दोन बांबूमध्ये दहा फुटांचे अंतर ठेवले जाते.
 • सप्टेंबर ते डिसेंबर कालावधीत बांबूची तोडणी होते. अन्य
 • महिन्यातही तोडणी करता येते. जू,जुलै, ऑगस्टमध्ये कोंब येत असल्यामुळे तोडणी करीत नाहीत.
 • माणगा वाणाचीच लागवड
 • बांबूला कोणतेही रासायनिक खत दिले जात नाही.

बाजारपेठ, विक्री व्यवस्था
बांबूला बाजारपेठ शोधण्याची गरज भासत नाही. अनेक व्यापाऱ्यांमध्ये खरेदी करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. मुंबई, बंगळूर, गोवा येथील व्यापारी देखील खरेदी करतात. आकार ,लांबी आणि जाडीप्रमाणे दर दिला जातो. १२ फूट लांबीच्या बांबूला २० ते २५ रुपये, १६ फुटीला ३५ ते ४० रुपये तर २४ फूट लांबीच्या बांबूला ७५ रुपयांपर्यंत दर मिळतो. दरवर्षी विक्रीतून १५ लाख रुपयांच्या आसपास उलाढाल होते. काजूतून पाच लाख तर सुपारी, नारळ बागेतून वार्षिक प्रत्येकी दोन ते तीन लाख रुपयांची उलाढाल होते.

बांबू लागवडीचा अनुभव
बेळणेकर यांची बहुतांशी जमीन डोंगर उताराची आहे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी लागवड करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांच्या वरच्या बाजूला अर्धा फूट खोलीचा चर खोदला जातो. जिल्ह्यातील शेतकरी सहा -सात वर्षांपासून बांबू लागवडीकडे वळत आहेत मात्र बेळणेकर दूरदृष्टीने ३० वर्षांपूर्वीच तिकडे वळले. त्यात दीर्घ अनुभव असल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केले आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत अलीकडेच झालेल्या ऑनलाइन चर्चासत्रात बेळणेकर देखील निमंत्रित होते. ४० स्थानिक मजुरांनाही बारमाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

मान्यवरांच्या भेटी
उत्कृष्ट रोपनिर्मिती, नियोजनबद्ध लागवड, उत्तम व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्था यामुळे बेळणेकर यांच्या बांबू बेटाला विविध जिल्ह्यांसह गोव्यातील तज्ज्ञ, मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिल्या आहेत. यामध्ये वनविभागाचे उपसंचालक एम.के.राव, राष्ट्रीय बागवानी मंडळाचे डॉ.आर.के.अगरवाल, जिल्हा कृषी अधीक्षक एस.एन.म्हेत्रे, गोव्याचे कृषी उपसंचालक संजीव मयेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण,ओमकार शेट्ये, वनक्षेत्रपाल श्री.. ननावरे यांच्यासह बांबू प्रकिया क्षेत्रातील नामवंत आणि अभ्यासकांचा समावेश आहे.

शेणाच्या पाण्याचा प्रयोग
बांबूची लागवड केल्यानंतर २५ ते ३० वर्षांनी किंबहुना त्याही पुढे फुलोरा येतो. त्यानंतर बेटे नष्ट होतात. परंतु त्यावर देखील बेळणेकर यांनी प्रयोग केला आहे. बेटाला फुलोरा येण्याची प्रकिया सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बांबू तोडून मुळावर शेणाचे पाणी दिले. त्यास दुसरा कोंब चांगला आल्याचे निर्दशनास आले. अजूनही यासंदर्भात प्रयोग सुरू आहेत.

संपर्क- बाळकृष्ण बेळणेकर- ९४२११४५१५३/९४२११४०४१८,


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
दर्जेदार, शास्त्रीय पद्धतीने गांडूळ...माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी...
राइसमिल’द्वारे शोधला स्वयंरोजगार,...सांगली जिल्ह्यातील मोरेवाडी (शेडगेवाडी) येथील...
एकट्याने नव्हे, इतरांना घेऊन पुढे जाऊ;...एकटा नाही तर इतरांना घेऊन पुढे जाऊ हा विचार टेंभे...
आंब्यासाठी उभारले स्वतःचे रायपनिंग चेंबररत्नागिरी येथील संयुक्त झापडेकर कुटुंब आंबा...
घोळवा परिसर झाला कांद्याचे ‘क्लस्टर’हिंगोली जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घोळवा (ता....
अन्नप्रक्रिया यंत्रनिर्मितीतील सावंत...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रकाश सावंत...
अधिक ‘कुरकुमीन’ युक्त हळदीचा यशस्वी...पास्टुल (जि. अकोला) येथील संतोष घुगे यांनी आपल्या...
मुक्तसंचार व तंत्रशुध्द पद्धतीने...सातारा जिल्ह्यातील चौधरवाडी येथील हाफीज काझी...
शेतीला मिळाली दुग्ध व्यवसायाची जोडपुण्याच्या पश्‍चिम भागातील मुळशी तालुक्याच्या...
सीताफळाचा ‘कांचन’ ब्रॅण्ड अन्...पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा...
लाकडी घाण्यावरील तेलाची युवा...कापसेवाडी (जि. सोलापूर) येथील युवा अभियंता संदीप...
नरवाडने जोपासली पानमळ्याची परंपरासांगली जिल्ह्यातील नरवाड हे गाव खाऊच्या पानांसाठी...
एकरी ४० टन सातत्यपूर्ण दर्जेदार केळी...नेवासे (जि. नगर) येथील पठाण कुटुंबाने ऊस पट्ट्यात...
मधमाशीपालनातून मिळाली स्वयंरोजगाराची...उत्तर प्रदेशातील मदारपूर केवली (ता. गोसाईगंज, जि...
प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोडप्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत...
वडजीत फुलतात वर्षभर गुलाबाचे मळेसोलापूर जिल्ह्यातील वडजी गावशिवारात वर्षभर देशी...
रोपनिर्मिती व्यवसायाने दिला हातभारगळवेवाडी (जि. सांगली) येथील राजाराम गळवे अनेक...