agriculture story in marathi, Baramati Market Commitee has made its identity in the state by implementation of different initiatives for farmers welfare. | Agrowon

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची राज्यात वेगळी ओळख 

संदीप नवले
बुधवार, 17 जुलै 2019

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे) विविध सोयीसुविधा, उपक्रमांद्वारे राज्यात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. उघड लिलाव पद्धती, वजन मापांवर देखरेख, गूळ व भुसार मार्केट, भाजीपाला व फळे बाजार, रयतभवन, गांडूळखत प्रकल्प आदी विविध उपक्रम राबवून शेतकरी हिताचे अनेक निर्णय बाजार समितीने घेतले आहेत. 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे) विविध सोयीसुविधा, उपक्रमांद्वारे राज्यात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. उघड लिलाव पद्धती, वजन मापांवर देखरेख, गूळ व भुसार मार्केट, भाजीपाला व फळे बाजार, रयतभवन, गांडूळखत प्रकल्प आदी विविध उपक्रम राबवून शेतकरी हिताचे अनेक निर्णय बाजार समितीने घेतले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीची १६ डिसेंबर १९३५ मध्ये स्थापना झाली. इंग्रज राजवटीत कापसाच्या गाठींची गरज भासत असल्याने त्यावर नियंत्रण सुरवातीला कापूस हा शेतमाल नियमनाखाली आणला गेला. पुढे कृषी उत्पन्न बाजार समितीत रूपांतर व एक जून १९४८ पासून गूळ शेतमाल नियमनाखाली आणला गेला. 

बाजार समिती कार्यक्षेत्र 

 • बारामती तालुक्यातील १०८ गावांपैकी ६८ गावे बारामती मार्केट क्षेत्र म्हणून जाहीर 
 • विविध शेतीमालाची, जनावरांची खरेदी 
 • सुमारे ३१.२० एकर जागेत प्रमुख आवार 

बाजार समिती वैशिष्ट्ये 

 • उघड पध्दतीने लिलाव. यात व्यापारी व खरेदीदार यांच्यात चुरस असल्याने शेतकऱ्यांस चांगला दर मिळतो. जनावरे, शेळी, मेंढी, वैरण यांची विक्रीही आपापसातील बोलीने. 
 • वजन मापावर देखरेख, नियंत्रण. आवक होताच त्वरित वजन. त्यामुळे वजनात घट येत नाही. त्याच दिवशी हिशोब पट्टी व माल विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती. 
 • अन्य बाजारांतील मालही मोठ्या प्रमाणात विक्रीस. 
 • समितीअंतर्गत सुपे येथे तीन एकरांत आणि जळोची येथे ४२ एकरांवर दुय्यम बाजार. 
 • मार्केट शुल्क, इमारत भाडे, वजनकाटा, परवाना, यांत्रिक चाळणी, रयतभवन, पेट्रोलपंप, गांडूळखत अशा विविध मार्गांनी उत्पन्न. 
 • शेतकऱ्यांकडून अनावश्यक कपात निर्बंध. 
 • साठ टनी क्षमतेचा इलेक्ट्रॅानिक भुईकाटा. 

भाजीपाला व फळबाजार 
भाजीपाला व फळांच्या विक्रीसाठी जळोची येथे उपबाजार आवारात ५६ गाळे व्यापाऱ्यांना दिले आहेत. लिलाव दररोज सकाळी सात वाजता सुरू होऊन ११ वाजेपर्यंत पूर्ण होतो. हे मार्केट कमी पडत असल्याने जळोची येथे आणखी अद्ययावत भाजी मार्केटची उभारणी करून आणखी २८ व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. 

यांत्रिक चाळणी 

 • दोन यांत्रिक चाळणी आणि दोन डिस्टोनर यंत्रे. यात शेतकऱ्याने आपला माल स्वच्छ करून विकावा हा 
 • मुख्य उद्देश. स्वच्छता व ग्रेडिंग केल्याने जास्तीत जास्त भाव शेतकऱ्यांस मिळून ग्राहकांनाही स्वच्छ माल मिळतो. व्यापाऱ्यांनाही बाहेरील बाजारात माल पाठविताना दर्जेदार माल करून पाठविता येतो. 
 • निर्यातीसाठीही वापर. एक क्विंटल स्वच्छतेसाठी हमाली, इलेक्ट्रॅानिक चार्जेस, दोरा 
 • आदी खर्च प्रतिक्विंटल ६० रुपयांप्रमाणे शुल्क. पॅकिंग आकारानुसार आकारणी. 
 • दरवर्षी शेतकरी सुमारे २० हजार क्विंटल तर व्यापारी १५ हजार क्विंटल भुसार मालाची चाळणी करतात. याच कामासाठी बाहेर जास्त पैसे मोजावे लागत होते. यांत्रिक चाळणीमुळे प्रती क्विंटल ५० ते १५० रुपयांचा जादा दर शेतकऱ्यांना मिळतो. 

अन्य मुख्य सुविधा 

 • रयतभवन- बाजार आवारात शेतकऱ्यांचे मेळावे, धान्य महोत्सव, ग्राहक ते थेट विक्री, कृषी प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकरी सहलीच्या अनुषंगाने निवास, लग्न समारंभ आदी कामांसाठी रयतभवनचा उपयोग होतो. 
 • भुईमूग शेंग, तेलबिया, गूळ आदींच्या विक्रीसाठी भव्य सेल हॉल. कांदा विक्री जळोची मार्केटमध्ये सुरू असल्याने भुसार माल विक्रीसाठी हा हॉलचा वापर. भविष्यात संगणकीय लिलाव पद्धतीसाठी दोन्ही हॉल्सचा वापर होणार. 
 • देशभरातील प्रमुख बाजार समित्यांचे बाजारभाव, पीक लागवड, ड्रीप इरिगेशन, पॉलिहाउस आदींच्या माहितीसाठी बाजार समितीच्या मुख्यालयातील माहिती केंद्रात साठ इंची प्रोजेक्शन टीव्ही. 
 • संगणकीय लिलावाचे एलईडी टीव्ही बसविल्याने शेतकऱ्यांना मुख्यालयातच दर मिळण्यास मदत. 

उलाढाल 

 • दरवर्षी एकूण उलाढाल- १८० ते २०० कोटी रुपये. गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. त्यामुळे बाजार समितीत ज्वारी, गहू, बाजरी, सोयाबीन, सुर्यफूल, करडई आदी विविध मालांच्या आवकेत घट झाली. 
 • त्या तुलनेत गूळ, भाजीपाला आवकेत वाढ झाली होती. यंदा उलाढाल सुमारे २०० कोटींची झाली. 

गांडूळखत प्रकल्प 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वनिधीतून २५ लाख रुपये खर्च करून मुख्य बाजार समिती व जळोची येथे गांडूळखत प्रकल्प उभारला आहे. प्रतिमहिना ४० टन खत तयार होते. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ३२ एकूण ६४ बेडस आहेत. पन्नास किलो पॉलिथीन बॅग दोनशे रुपये दराने कृषी समृद्धी या ब्रॅण्डखाली शेतकऱ्यांना विक्री केली जाते. 

सुविधा 

 • पिण्याच्या पाण्यासाठी पक्की विहीर. पाइपलाइनद्वारे संपूर्ण आवारात पाणीपुरवठा 
 • समिती आवारात डांबरीकरण, रूंद रस्ते 
 • ठिकठिकाणी सावलीसाठी वृक्षारोपण 
 • सुरक्षिततेसाठी आरसीसी तसेच दगडी भिंत. त्यावर काटेरी तार कुंपण 
 • स्वतंत्र हमाल भवनाची उभारणी 
 • चहा, नाश्ता व जेवणासाठी कॅन्टीन 
 • विश्रामशेड, स्वच्छतागृह 
 • आवार संरक्षणासाठी पोलिस चौकीसाठी जागा 
 • सायकाल स्टॅन्ड, कांदा प्रतवारी यंत्र 
 • आडते, व्यापारी यांना ७१ प्लॉटस. मोठे १५ व्यापारी गाळे बांधून ते भाडेत्त्वावर. 
 • जागतिक बॅक प्रकल्पांतर्गत संगणकीय लिलाव पद्धत. प्रायोगिक तत्त्वावर गूळ व तेलबिया यांच्यासाठी. 

लिलावाचे वेळापत्रक 
 

 • सोमवार ---   गूळ, भुसार, कडधान्य, जळोची उपबाजारात लिंबू, कांदा व डाळिंब 
 • मंगळवार --- गूळ, तेलबिया, फळे व भाजी मार्केट, डाळिंब
 •  बुधवार --- गूळ, जळोची उपबाजारात कांदा, केळी, डाळिंब 
 • गुरुवार --- गूळ, भुसार, लिंबू, जळोची येथे - जनावरे, शेळी, मेंढी, वैरण, फळे व भाजीपाला, डाळिंब 
 • शुक्रवार --- गूळ, तेलबिया 
 • शनिवार --- गूळ, कांदा, लिंबू, 
 • रविवार --- जळोची उपबाजारात केळी, फळे व भाजी मार्केट, डाळिंब 

बाजारभावांना प्रसिद्धी 
ही बाजारपेठ पुणे जिल्ह्यातील मोठी भुसार बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रमुख मालांचे भाव 
पणन, मुंबई आकाशवाणी केंद्रासाठी प्रसिद्धीसाठी पाठविले जातात. बाजार समितीच्या प्रसिद्धी फलकावर तसेच विद्या प्रतिष्ठानच्या कृषी वाहिनीवरून ते प्रसारित होतात. 
 

संपर्क- अरविंद जगताप- ९८६०३०५०९३ 
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती 
शौकत कोतवाल 
सभापती- ९४२३५२४९९२ 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...