agriculture story in marathi, BDN 711 the variety of pigeon pea has became popular among the farmers. | Page 2 ||| Agrowon

तुरीच्या बीडीएन ७११ वाणाने दिली उत्पादनाची शाश्वती

संतोष मुंढे
शनिवार, 10 जुलै 2021

बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित झालेल्या तुरीच्या बीडीएन-७११ वाणाचा महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही चांगला प्रसार झाला आहे. कमी कालावधीत पक्व होणारा व जिरायती शेतीला अत्यंत अनुकूल असलेल्या या वाणाने एकरी आश्‍वासक उत्पादनाची शाश्‍वतीही दिली आहे.

बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राद्वारे प्रसारित झालेल्या तुरीच्या बीडीएन-७११ वाणाचा महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही चांगला प्रसार झाला आहे. कमी कालावधीत पक्व होणारा व जिरायती शेतीला अत्यंत अनुकूल असलेल्या या वाणाने एकरी आश्‍वासक उत्पादनाची शाश्‍वतीही दिली आहे.

तुरीचा कालावधी सुमारे सहा महिन्याचा असल्याने पावसाळा संपल्यानंतर अनेकदा पाण्याचा ताण पडतो. जिरायती क्षेत्रात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. याचा सारासार विचार करून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (वनामकृवी) बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने केला. सन २०१२ मध्ये तुरीचे बीडीएन-७११ वाण प्रसारित केले. मराठवाड्यातील जिल्हे, बुलडाणा, नगर, नाशिक, सांगली व सोलापूर, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशापर्यंत या वाणाचा प्रसार झाला. सुमारे १० हजार ते १२ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत त्याचा वापर झाला असावा.

बीडीएन ७११ वाणाचे गुणधर्म

 • मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य.
 • कमी पाऊसमान (५५० ते ६५० मिमी.) असलेल्या भागातही चांगले येते.
 • पीक कालावधी १५० ते १५५ दिवस.
 • पाण्याच्या ताणास बळी पडत नाही.
 • दाण्याचा रंग पांढरा, मर व वांझ रोगास प्रतिकारक
 • शेंगा एकदाच पक्व होतात. शेंगगळ नाही. यंत्राद्वारे काढणीस योग्य.
 • कमी कालावधी असल्याने काढणी नोव्हेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात शक्य.

ठळक बाबी

 • ७५ ते १०० मिमी. पाऊस झाल्यानंतर वाफसा येताच पेरणी. ती १५ जुलैपूर्वी संपवावी. पंधरा दिवस उशीर झाल्यास २७ टक्के तर ३० दिवसांचा विलंब झाल्यास उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट.
 • फुले व शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे व समशीतोष्ण हवामान आवश्यक.
 • जिरायती लागवड- ९० बाय २० ते ३० सेंमी. हेक्‍टरी १२ ते १५ किलो बियाणे पुरेसे.
 • बागायतीसाठी एके ठिकाणी दोन ते तीन बिया वापरून ९० बाय ९० सेंमी टोकण पद्धतीने लागवड.
 • टोकण पद्धतीत पाच ते सहा किलो प्रति हेक्‍टरी बियाणे पुरेसे.
 • उत्पादन व जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी तूर अधिक बाजरी २-४, तूर अधिक ज्वारी ३-३ किंवा २-४, तूर अधिक सोयाबीन किंवा उडीद किंवा मूग १-२, किंवा २-४ ओळींचे प्रमाण ठेवून आंतरपीक पद्धतीचा वापर फायदेशीर.
 • सुरवातीचे १५ ते २० दिवस, शेंगा तयार होण्याच्या काळात २५ ते ३० दिवस पाणी आवश्यक. फुलोरा, शेंगात दाणे भरतानाचा कालावधी अत्यंत संवेदनशील. या अवस्थेत जमिनीत ओलावा नसल्यास पाण्याच्या पाळ्या आवश्यक.
 • सरीवरंबा पद्धतीची जमीन बांधणी केल्यास पाणी देणे सुलभ. पावसाचे पाणी अधिक झाल्यास सरीतून निचरा होतो.

विद्यापीठ कार्यक्षेत्रात बियाणे विक्री केंद्रे
कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद, जालना, तुळजापूर (उस्मानाबाद), खामगाव (बीड), गळीत धान्य संशोधन केंद्र, लातूर, कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई, कृषी महाविद्यालय, गोळेगाव (हिंगोली), कापूस संशोधन केंद्र, नांदेड, बीजप्रक्रिया केंद्र, परभणी

विद्यापीठाकडून सत्यतादर्शक
बियाणे पुरवठा (क्विंटल) व प्रातिनिधीक
  वर्ष                   बियाणे

२०१४-१५          १३५. ७२
२०१६-१७          ९२. ८८
२०१८-१९-         १७३. १२
२०२०- २१         २९६
२०२१-२२          ५१०

प्रतिक्रिया
बीडीएन ७११ वाण बिजोत्पादन साखळीच्या सुरवातीच्या टप्प्यापासून आघाडीवर आहे. लवकर काढणीस येत असल्याने पावसाच्या शेवटच्या टप्प्यात कमी पावसाच्या परिस्थितीत उत्पादकता टिकवून धरतो. शेतकऱ्यांच्या पसंतीमुळे बियाण्यास मोठी मागणी असते.
-डॉ. एस.बी घुगे.
वनामकृवी, परभणी

दुष्काळातही या वाणाने एकरी पाच क्विंटल उत्पादन दिले आहे. महाराष्ट्राबरोबर गुजरात, आंध्र प्रदेशातूनही मागणी वाढत आहे.
-डॉ. डी के पाटील, 
प्रमुख, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर

या वाणाने उत्पादनात शाश्वती दिली असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे कल आहे. जिरायतीत ९० बाय २० सेंमी लागवड करावी अशी विद्यापीठाची शिफारस आहे. परंतु शेतकरी किमान चार फूट अंतर ठेवतात. काही सोयाबीन आंतरपीक म्हणून घेत दोन ओळीत ८ फुटांवरही लागवड करतात. सलग तूर घेण्याकडेही औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल दिसतो.
-रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद
९४२०४०६९०१

सलग पाच वर्षांपासून बीडीएम ७११ वाण आहे. जिरायतीत एकरी ७ ते ९ क्विंटलपर्यंत पाऊसकाळानुसार उत्पादन मिळाले आहे. वीस एकरांत हे वाण तर उर्वरित २० एकरांत बीडीएन ७१६ व अन्य वाण आहे.
-कैलास निर्मळ
थेरगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.
९४२०४९१०८५

वाणाविषयी सर्वेक्षण
बदनापूरच्या संशोधन केंद्राने बीडीएन ७११ वाण घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रातिनिधिक रूपात सर्वेक्षण केले. त्यातील निवडक निष्कर्ष

 • सलग पीक घेणाऱ्यात ८३ तर आंतरपीक घेणाऱ्यांत १७ शेतकऱ्यांचा समावेश.
 • जिरायती व बागायती परिस्थितीत १५० ते १६० दिवसांत काढणी करणारे शेतकरी- ५९
 • १६० ते १७० दिवसांत काढणी करणारे ३२ तर १७० ते १८० दिवसांत काढणी करणारे शेतकरी ९.
 • जिरायती परिस्थितीत हेक्टरी १ ते १५ क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी ३१.
 • १६ ते २० क्विंटल हेक्टरी उत्पादन- जिरायती- २२ तर बागायतीत ६ शेतकरी.
 • २१ ते २५ क्विंटल हे. उत्पादन- जिरायती- २१ तर बागायती ४ शेतकरी.
 • हेक्टरी २५ क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन- जिरायती- १० तर बागायतीत ३ शेतकरी.
 • सोयाबीनमध्ये तूर- आंतरपीक- पाच शेतकऱ्यांनी हेक्‍टरी १ ते १५ क्विंटल तर तीन शेतकऱ्यांनी हेक्टरी १६ ते २० क्विंटल दरम्यान उत्पादन घेतले.

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...