agriculture story in marathi, big Joint Family of Kadam from Khadki, Nanded has raised its livelyhood through dairy farming. | Page 2 ||| Agrowon

संयुक्त कुटुंबाने दुग्धव्य़वसायातून दिली शेतीला बळकटी

माणिक रासवे
मंगळवार, 30 जून 2020

खडकी (ता. जि. नांदेड) येथील कदम यांचे तब्बल ३५ सदस्यांचे मोठे कुटुंब एकत्रित गुण्यागोविंदाने नांदते आहे. सुमारे ९० एकर शेतीत फळपिके, हंगामी पिके घेताना ४० म्हशींच्या संगोपनातून दुग्धव्यवसाही त्यांनी आकारास आणला आहे. 

खडकी (ता. जि. नांदेड) येथील कदम यांचे तब्बल ३५ सदस्यांचे मोठे कुटुंब एकत्रित गुण्यागोविंदाने नांदते आहे. सुमारे ९० एकर शेतीत फळपिके, हंगामी पिके घेताना ४० म्हशींच्या संगोपनातून दुग्धव्यवसाही त्यांनी आकारास आणला आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी समर्थपणे पार पाडत एकोप्यातून कुटुंबाच्या अर्थकारणाला बळकटी दिली आहे.
 
नांदेडपासून सुमारे आठ किलोमीटरवरील खडकी येथील मारोतराव, रामराव व शंकरराव या कदम
बंधूंचे एकत्रित मोठे कुटुंब आहे. गावच्या शिवारात त्यांची सुमारे ९० एकर मध्यम ते भारी जमीन आहे. ऊस, मोसंबी, हळद, ज्वारी, सोयाबीन, गहू, मूग, उडीद, भाजीपाला, चारा अशी बहुविध पीक पद्धती त्यांनी जोपासली आहे. सिंचनासाठी चार विहिरी, दोन बोअर्स आहेत.

अवर्षणामुळे शेतीत पर्याय
हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येलदरी-सिध्देश्वर धरणाच्या एकमेव कालव्याच्या लाभक्षेत्रात कदम कुटुंबाची शेती आहे. घेल्या पाच वर्षांतील अपुऱ्या पावसामुळे धरण भरण्याची खात्री राहिली नाही.
धरणाच्या कालव्याचे पाणीही त्यामुळे पुरेसे मिळत नसल्याने कदम यांच्या शेतीवर परिणाम झाला. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात सहा किलोमीटरवरून पाणी विकत आणून मोसंबीची बाग जगवली. सततच्या अवर्षणात पीक उत्पादन धोक्यात आले. तेवढ्या उत्पन्नावर मोठ्या कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड झाले होते. पर्याय शोधताना दुग्धव्यवसायाचा विचार पुढे आला.

दोन म्हशींपासून सुरुवात
दोन वर्षांपूर्वी दोन जाफराबादी म्हशी खरेदी केल्या. नांदेड शहरात दूधविक्री सुरू केली. दोन वेळेचे मिळून दररोज २० ते २५ लीटर दूध मिळायचे. त्यातून ताजे उत्पन्न मिळू लागले. त्यासह पीक उत्पन्नातील बचतीतून कदम यांनी टप्प्याटप्प्याने म्हशी खरेदी करून व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली.

ठळक बाबी

 • सध्या म्हशींची संख्या ४०
 • भाकड म्हशी खरेदी करून त्यांचाही सांभाळ
 • दररोजचे दूध संकलन १५० ते २०० लीटर
 • १०० बाय ३५ फूट आकाराचा सुसज्ज गोठा
 • सिमेंट विटांच्या भिंती, टीन पत्र्याचे छत असलेल्या गोठ्यामध्ये जमिनीवर सिमेंटचा थर. त्यामुळे
 • साफसफाई करणे सोपे.
 • परस्पर विरुद्ध दिशेला गव्हाणीची रचना
 • तापमानामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी छताला पंखे
 • १०० बाय ४० फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा.
 • त्यासाठी बांबू, उसाचे पाचट, तुऱ्हाट्यांचा वापर

चारा व्यवस्थापन

 • जनावरांची संख्या अधिक असल्याने पाच ते सहा एकरांत विविध जातीच्या गवतांची लागवड
 • त्यामुळे सुका तसेच हिरवा चारा उपलब्ध
 • -कडब्याची नासाडी टाळण्यासाठी यंत्राव्दारे कुट्टी
 • विविध पिकांचा भुस्सा जमा करून साठवणूक
 • दुधाळ म्हशीला दररोज एका वेळेस अडीच किलो सरकी पेंडीचा खुराक

कुटुंबाची एकी हेच यशस्वी शेतीचे कारण
कदम यांच्या कुटुंबात तब्बल ३५ सदस्य आहेत. नांदेडसह शेजारील जिल्ह्यांमधील मोजक्या मोठ्या कुटुंबांपैकी त्यांचे कुटुंब आहे. संपूर्ण कुटुंब शेतीवरच आधारलेले आहे. मारोतराव यांना संभाजी, गजानन, संदीप, शंकरराव यांना शिवाजी, त्र्यंबक, अर्जुन हे तीन तर रामराव यांना वसंत, उद्धव, आदिनाथ हे तीन मुलगे आहेत. उद्धव आणि संदीप पैलवान आहेत. घरची कुस्तीची परंपरा त्यांनी जपली आहे. विविध कुस्त्यांच्या स्पर्धेतील विजयाचे ते मानकरी आहेत.
हे दोघे तसेच अर्जून यांच्यावर दुग्धव्यवसायाची जबाबदारी आहे. अन्य भाऊ शेतीकामांचे व्यवस्थापन पाहतात. प्रत्येकजण आपापली जबाबदारी ओळखून स्वयंस्फूर्तीने राबतो. कदम वारकरी व माळकरी कुटुंब आहे. त्यामुळे घरच्या सदस्यांवर आध्यात्मिक संस्कार झालेले आहेत. सर्वांमध्ये एकोपा असल्यानेच शेतीतील ताण हलका होण्यास व अर्थकारणाला बळकटी मिळण्यास मदत झाल्याचे कुटुंबातील उद्धव सांगतात.

दूध विक्री
नांदेड येथे सोयरिकांचेच दूध विक्री केंद्र आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी मोटरसायकलला कॅन बांधून तेथे दूध पोचविले जाते. प्रतिलीटर सरासरी ५० रुपये दर मिळतो. या व्यवहारातून कदम व सोयरीक अशा दोघांचा फायदा होतो.

शेणखतामुळे जमिनीची वाढली सुपीकता
म्हशी, बैल, गीर गायी अशी लहान मोठी मिळून ५५ जनावरे आहेत. दरवर्षी १०० ते १२५ ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत मिळते. त्यातून जमिनीची सुपीकता वाढली आहे. रासायनिक खतांचा वापर व खर्चही कमी झाला आहे. उत्पादनात वाढ झाली आहे.

पीक पद्धती

 • मोसंबी १५ एकर
 • हळद १० एकर, ऊस ३५ एकर, ज्वारी ५ एकर, सोयाबीन २० एकर, मूग, उडीद प्रत्येकी १ एकर, गहू १० एकर, उर्वरित क्षेत्रावर चारा तसेच भाजीपाला
 • मोसंबीचे एकरी दहा टनांपर्यंत उत्पादन. नागपूर येथील कळमना बाजार समितीत विक्री
 • उसाचे एकरी ५० ते ६० टनांपर्यंत उत्पादन
 • अन्नधान्य पिकांच्या उत्पादनातून कुटुंबाच्या गरजा भागतात.

कृषी विभागाचे सहकार्य...

 • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील, कृषी पर्यवेक्षक एस.एम. करंजकर, कृषी सहाय्यक यू.जे.मगर यांचे मार्गदर्शन
 • कांदा चाळ, मागेल त्याला शेततळे, कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर चलित रोटाव्हेटर आदी साधनांचा लाभ
 • शेततळ्याला अस्तरीकरण केल्याने संरक्षित सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता

संपर्क- उद्धव कदम- ९९२१३०००३०
संभाजी कदम-९८२२६४०८२१ 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
सहा गुंठ्यात पंचवीसहून अधिक सेंद्रिय...मखमलाबाद (जि. नाशिक) येथील सुनील दराडे घराशेजारील...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
उच्चशिक्षित युवा महिला झाली व्यावसायिक...पळशी (जि. सांगली) येथील शैला शिंदे या उच्चशिक्षित...
दुग्धव्यवसायातून साधली गाडेकरांनी भरभराटशेळकेवाडी (अकलापूर) (ता. संगमनेर. जि. पुणे) येथील...
महिला बचत गट बनवतो २६ प्रकारचे मसालेपाहुणेवाडी (ता.बारामती, जि.पुणे) येथील सुवर्णा...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा...नाशिक शहराजवळ शिवनगर (पंचवटी) येथील क्षीरसागर...
बेरड जातीच्या कोंबडीपालनाने अर्थकारण...प्रयत्नवाद, सातत्याने प्रयोग करण्यातला उत्साह,...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
युवा शेतकऱ्याची वीस एकर व्यावसायिक करार...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील...
एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ,...राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एकनाथ...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
संयमवृत्तीनेच होते नफावृध्दी व...जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य...
दूग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले...परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला...
शेतकरी नियोजन- कापूसमाझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२...
पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक...बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या...हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे......