उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे सूर्यप्रकाश रोखण्याची कल्पना व्यहवार्य नाही

ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी वातावरणामध्ये धुळीचे कण मिसळले जातात. परिणामी तापमानामध्ये घट होते. हेतुतः वातावरणामध्ये अशा प्रकारे एअरोसोल्स मिसळल्यास तापमानवाढीच्या संकटावर मात करणे शक्य होऊ शकेल, असा काही संशोधकांचा दावा आहे. (स्रोत ः सोलोमॉन हसियांग,
ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी वातावरणामध्ये धुळीचे कण मिसळले जातात. परिणामी तापमानामध्ये घट होते. हेतुतः वातावरणामध्ये अशा प्रकारे एअरोसोल्स मिसळल्यास तापमानवाढीच्या संकटावर मात करणे शक्य होऊ शकेल, असा काही संशोधकांचा दावा आहे. (स्रोत ः सोलोमॉन हसियांग,

पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट एअरोसोल्स मिसळून, त्याद्वारे सूर्यप्रकाश रोखून जागतिक तापमानवाढीचे पिकांच्या वाढीवरील विपरीत परिणाम कमी करण्याची कल्पना तितकीशी व्यहवार्य ठरत नसल्याचे कॅलिफोर्निया-बर्कले विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासात आढळले आहे. या दोन्ही बाबी एकमेकांचे चांगले परिणाम नष्ट करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. सोलोमॉन हसियांग हे कॅलिफोर्निया विद्यापीठातील ग्लोबल पॉलिसी लॅबोरेटरी येथे संचालक असून, जोनाथन प्रॉक्टर हे पी.एचडी संशोधक आहेत. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. जागतिक तापमानामध्ये होत असलेल्या वाढीमुळे पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम संभवतात. हे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी वातावरणामध्ये धुळीचे कण सोडून, त्यांच्या साह्याने तापमान कमी करणे शक्य असल्याचा दावा काही संशोधकांकडून होत होता. त्यासाठी ज्वालामुखी फुटण्याच्या वेळी वातावरणामध्ये पसरणाऱ्या कार्बन कणांमुळे परिसरातील तापमानामध्ये घट व पीक उत्पादनात वाढ होत असल्याचा संदर्भही दिला जातो. या काळात पिकांवरील उष्णतेचा ताण कमी असल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचेही मत मांडले जाते. मात्र, वातावरणातील धुळीच्या कणामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेवर परिणाम होऊ शकतो. गेल्या दोन ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळच्या एकूण परिस्थिती व माहिती साठ्याचे विश्‍लेषण कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथील संशोधकांनी पीक उत्पादनाच्या अनुषंगाने केले आहे. याबाबत माहिती देताना संशोधक जोनाथन प्रॉक्टर यांनी सांगितले, की पृथ्वीभोवती एअरोसोल्स पसरलेले असताना तापमानामध्ये घट होऊन पिकाच्या वाढीसाठी मदत होऊ शकते. मात्र, पिकाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाचीही आवश्‍यकता असते. सूर्यप्रकाशाला अडवल्यास पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होईल. थोडक्यात, तापमान कमी झाल्याने होणाऱ्या फायद्याइतकाच प्रकाश संश्‍लेषणातील घटीमुळे नुकसानही संभवते. हे एखाद्या शल्यक्रियेमुळे उदभवणारे साइडइफेक्टस हे मूळ आजाराइतकेच असण्यासारखे आहे. असे आहेत संशोधन

  • १९९१ मध्ये फिलिपिन्स येथील माऊंट पिनाट्यूबो येथील ज्वालामुखी उद्रेकादरम्यात तापमानामध्ये घट झाली होती. एकूण जागतिक पातळीवरील तापमानात आवश्‍यक तेवढी घट करण्यासाठी पृथ्वीच्या उच्चतम वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट एअरोसोल्स मिसळण्याची कल्पना काही संशोधकांनी मांडली होती. हे कण त्यावर पडणारा सूर्यप्रकाश परावर्तित करतील. सध्या वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे ग्रीनहाउस इफेक्ट व तापमानवाढीची स्थिती दिसून येत आहे.
  • पिनाट्यूबो ज्वालामुखीच्या वेळी वातावरणामध्ये २० दशलक्ष टन सल्फर डायऑक्साईड मिसळला गेला होता. त्यामुळे सूर्यप्रकाशामध्ये २.५ टक्क्याने घट झाली. सरासरी जागतिक तापमानामध्ये अर्धा अंश सेल्सिअसने घट झाली होती.
  • संशोधकांच्या गटाने १९७९ ते २००९ या काळातील १०५ देशातील मका, सोयाबीन, भात आणि गहू उत्पादनाशी उपग्रहाद्वारे प्राप्त एअरोसोल्सच्या नेमक्या आकडेवारीची सांगड घातली. एअरोसोल्सचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम मिळवण्यात आला. त्याच वेळी जागतिक हवामानाच्या प्रारूपाद्वारे सल्फेट आधारित जिओइंजिनिअरींग प्रकल्पामुळे सूर्यप्रकाशामध्ये झालेली घटही मोजण्यात आली. त्याचा पिकाच्या उत्पादनावरील परिणामही मोजण्यात आला.
  • हे दोन्ही घटक एकमेकांचे चांगले परिणाम नष्ट करत असल्याचे दिसून आले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com