सुधारित तंत्राद्वारे वाढवली उसाची उत्पादकता

सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची धडपड याद्वारे सोगाव (पूर्व) (जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी ब्रम्हदेव सरडे यांनी उसाची प्रगतशील शेती केली आहे. पूर्वी एकरी ३४ टनांच्या आसपास असलेली एकरी उत्पादकता टप्प्याटप्प्याने ९५ टनांच्या आसपास पोचवली आहे.
पाच बाय दोन फुटांवर लागवड. उसाची भरीव जाडी
पाच बाय दोन फुटांवर लागवड. उसाची भरीव जाडी

सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची धडपड याद्वारे सोगाव (पूर्व) (जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी ब्रम्हदेव सरडे यांनी उसाची प्रगतशील शेती केली आहे. पूर्वी एकरी ३४ टनांच्या आसपास असलेली एकरी उत्पादकता टप्प्याटप्प्याने ९५ टनांच्या आसपास पोचवली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या ‘बॅकवॅाटर’ च्या काठावर करमाळा तालुक्यातील सोगाव (पूर्व) येथे ब्रम्हदेव सरडे यांची शेती आहे. ब्रम्हदेव रसायनशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत. सन २०१० मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी चालून आली. दरम्यान वडिलांचे निधन झाले. मग घरची व शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली. सरडे यांची पाच एकर शेती असून सर्व क्षेत्रावर ऊस आहे. पूर्वी एकरी ३४ टनांच्या आसपास असलेले उत्पादन त्यांनी टप्प्याटप्प्याने वाढवण्यास सुरवात केली. अभ्यास, शिकाऊवृत्ती, नवे तंत्रज्ञान वापरण्याची धडपड, प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्लॉट पाहणे व मार्गदर्शन यातून त्यांनी प्रगतिशील शेतीकडे वाटचाल केली. तंत्रज्ञान आधारित शेती दहा वर्षांचा अनुभव ब्रम्हदेव शेतीत वापरत आहेत. उजनीच्या धरणाच्या काठावरच शेती असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. अनियंत्रित पाणी व खत वापरामुळेच या भागातील अनेकांच्या जमिनी खराब झाल्या आहेत. ब्रम्हदेव यांच्या ही बाब चांगलीच ध्यानात आली. त्यांनी केलेल्या व्यवस्थापनातील ठळक बाबी

  • जमीन प्रकार- काळी कसदार मध्यम जमीन
  • पाच बाय दोन फूट अंतरावर लागवड
  • लागवड कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट
  • वाण- फुले २६५
  • एक डोळा पध्दतीचा वापर
  • उसशेतीत पूर्वमशागतीला फार महत्त्व. दर तीन वर्षांनी सबसॅायलर यंत्राचा वापर. त्यामुळे जमिनीची जास्त खोलीपर्यंत नांगरणी होते.
  • काढणी केलेल्या उसाचे पाचट कुट्टी करून जमिनीमध्ये गाडण्यात येते.
  • जमिनीची उभी आणि आडवी नांगरट चांगली दीड फुटापर्यंत.
  • त्यानंतर रोटर वापरून एकरी १५ टनापर्यंत शेणखताचा वापर (दर तीन वर्षांनी)
  • लागवडीसाठी घरचेच निरोगी, रसरशीत, कीडमुक्त, नऊ ते अकरा महिने वयाचे बेणे वापरले जाते.
  • रासायनिक आणि जैविक पद्धतीने बेणेप्रक्रिया
  • पाण्याची मुबलक उपलब्धता असूनही बेसुमार वापराने जमिनीची प्रत खराब होऊ नये यासाठी नेमकेपणाने आणि हवे तेवढेच पाणी उसाला मिळावे यासाठी ठिबक सिंचनाचा वापर
  • उन्हाळ्यात रेनगनचा वापर
  • -माती-पाणी परीक्षण करून त्या आधारेच एनपीके, सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्याचा डोस ठरवला जातो.
  • घरचे तीन सदस्य शेतात अखंड राबतात. त्यातून मजुरांवरील खर्च केला कमी.  
  • खतांचे नियोजन (एकरी) लागवडीसोबत युरिया दोन बॅग्ज (प्रति ४५ किलोची) डीएपी- ५० किलो पोटॅश- ५० किलो दीड महिन्यांनी दुसरा डोस युरिया- दोन बॅग्स सल्फर- २५ किलो -सिलिकॅान- १० किलो -निंबोळी पेंड- १० किलो -मॅग्नेशिअम सल्फेट- १० किलो बाळबांधणी युरिया, डीएपी, पोटॅश- प्रत्येकी दोन बॅग्ज सूक्ष्म अन्नद्रव्य- पाच किलो मॅग्नेशिअम व सल्फर- प्रत्येकी ५ किलो   चौथ्या महिन्यात हाच डोस पुन्हा दिला जातो. सहाव्या, आठव्या, दहाव्या आणि बाराव्या महिन्यात युरिया व पोटॅश प्रत्येकी एक बॅग   विद्राव्य खते दर पंधरवड्याने १९-१९-१९. १२-६१-०, १३-०- ४५ (पीकवाढीच्या अवस्थेनुसार) प्रति पाच किलो   उत्पादन पूर्वी एकरी ३४ टन उत्पादन ६५ टन व अलीकडील काळात ९५ टनांपर्यंत पोचवले आहे. उत्पादन खर्च किमान ६० ते ६५ हजार रुपये येतो. करमाळा तालुक्यात यंदाच्या हंगामात एकही कारखाना सुरु नाही. त्यामुळे शेजारच्या नगर आणि पुणे जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पुरवला जातो. अलीकडील काळात सरासरी दर प्रति टन २५०० ते २६०० रुपये मिळाला. आंतरपीक म्हणून कोथिंबीर घेतली जाते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उसाचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी केला जातो. मुंबईच्या व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे. प्रति पेंढी पाच रुपये दराप्रमाणे विक्री होते. पुरस्कार केंद्रीय कृषी व अन्न मंत्रालयाचा ‘प्रोग्रेसिव्ह फार्मर’, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा कृषी सन्मान, राज्य शासनाच्या उत्कृष्ट ऊस उत्पादक आदी अनेक पुरस्कार ब्रम्हदेव यांना मिळाले आहेत. विविध चर्चासत्रांना ते उपस्थित राहतात. सांगली जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी संजीव माने, सुरेश माने-पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. व्हॅाटस ॲप वा अन्य सोशल मिडियाद्वारे ते संवाद साधतात. संपर्क- ब्रम्हदेव सरडे- ९८२२९९६५३८, ९३७०७८५३४६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com