agriculture story in marathi, Bramhadev Sarde has increased the sugarcane yield with the use of technology. | Agrowon

सुधारित तंत्राद्वारे वाढवली उसाची उत्पादकता

सुदर्शन सुतार
बुधवार, 10 मार्च 2021

सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची धडपड याद्वारे
सोगाव (पूर्व) (जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी ब्रम्हदेव सरडे यांनी उसाची प्रगतशील शेती केली आहे. पूर्वी एकरी ३४ टनांच्या आसपास असलेली एकरी उत्पादकता टप्प्याटप्प्याने ९५ टनांच्या आसपास पोचवली आहे.

सतत शिकण्याची आस, अभ्यास, मेहनत व सुधारित तंत्रज्ञान वापरण्याची धडपड याद्वारे सोगाव (पूर्व) (जि. सोलापूर) येथील युवा शेतकरी ब्रम्हदेव सरडे यांनी उसाची प्रगतशील शेती केली आहे. पूर्वी एकरी ३४ टनांच्या आसपास असलेली एकरी उत्पादकता टप्प्याटप्प्याने ९५ टनांच्या आसपास पोचवली आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या ‘बॅकवॅाटर’ च्या काठावर करमाळा तालुक्यातील सोगाव (पूर्व) येथे ब्रम्हदेव सरडे यांची शेती आहे. ब्रम्हदेव रसायनशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत. सन २०१० मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी चालून आली. दरम्यान वडिलांचे निधन झाले. मग घरची व शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली.
सरडे यांची पाच एकर शेती असून सर्व क्षेत्रावर ऊस आहे. पूर्वी एकरी ३४ टनांच्या आसपास असलेले उत्पादन त्यांनी टप्प्याटप्प्याने वाढवण्यास सुरवात केली. अभ्यास, शिकाऊवृत्ती, नवे तंत्रज्ञान वापरण्याची धडपड, प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्लॉट पाहणे व मार्गदर्शन यातून त्यांनी प्रगतिशील शेतीकडे वाटचाल केली.

तंत्रज्ञान आधारित शेती
दहा वर्षांचा अनुभव ब्रम्हदेव शेतीत वापरत आहेत. उजनीच्या धरणाच्या काठावरच शेती असल्याने पाण्याचा प्रश्नच नव्हता. अनियंत्रित पाणी व खत वापरामुळेच या भागातील अनेकांच्या जमिनी खराब झाल्या आहेत. ब्रम्हदेव यांच्या ही बाब चांगलीच ध्यानात आली. त्यांनी केलेल्या व्यवस्थापनातील ठळक बाबी

 • जमीन प्रकार- काळी कसदार मध्यम जमीन
 • पाच बाय दोन फूट अंतरावर लागवड
 • लागवड कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट
 • वाण- फुले २६५
 • एक डोळा पध्दतीचा वापर
 • उसशेतीत पूर्वमशागतीला फार महत्त्व. दर तीन वर्षांनी सबसॅायलर यंत्राचा वापर. त्यामुळे जमिनीची जास्त खोलीपर्यंत नांगरणी होते.
 • काढणी केलेल्या उसाचे पाचट कुट्टी करून जमिनीमध्ये गाडण्यात येते.
 • जमिनीची उभी आणि आडवी नांगरट चांगली दीड फुटापर्यंत.
 • त्यानंतर रोटर वापरून एकरी १५ टनापर्यंत शेणखताचा वापर (दर तीन वर्षांनी)
 • लागवडीसाठी घरचेच निरोगी, रसरशीत, कीडमुक्त, नऊ ते अकरा महिने वयाचे बेणे वापरले जाते.
 • रासायनिक आणि जैविक पद्धतीने बेणेप्रक्रिया
 • पाण्याची मुबलक उपलब्धता असूनही बेसुमार वापराने जमिनीची प्रत खराब होऊ नये यासाठी नेमकेपणाने आणि हवे तेवढेच पाणी उसाला मिळावे यासाठी ठिबक सिंचनाचा वापर
 • उन्हाळ्यात रेनगनचा वापर
 • -माती-पाणी परीक्षण करून त्या आधारेच एनपीके, सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्याचा डोस ठरवला जातो.
 • घरचे तीन सदस्य शेतात अखंड राबतात. त्यातून मजुरांवरील खर्च केला कमी.  

खतांचे नियोजन (एकरी)

लागवडीसोबत युरिया दोन बॅग्ज (प्रति ४५ किलोची)
डीएपी- ५० किलो
पोटॅश- ५० किलो

दीड महिन्यांनी दुसरा डोस
युरिया- दोन बॅग्स
सल्फर- २५ किलो
-सिलिकॅान- १० किलो
-निंबोळी पेंड- १० किलो
-मॅग्नेशिअम सल्फेट- १० किलो

बाळबांधणी
युरिया, डीएपी, पोटॅश- प्रत्येकी दोन बॅग्ज
सूक्ष्म अन्नद्रव्य- पाच किलो
मॅग्नेशिअम व सल्फर- प्रत्येकी ५ किलो
 
चौथ्या महिन्यात

हाच डोस पुन्हा दिला जातो.
सहाव्या, आठव्या, दहाव्या आणि बाराव्या महिन्यात
युरिया व पोटॅश प्रत्येकी एक बॅग
 
विद्राव्य खते

दर पंधरवड्याने १९-१९-१९. १२-६१-०, १३-०- ४५ (पीकवाढीच्या अवस्थेनुसार)
प्रति पाच किलो
 
उत्पादन

पूर्वी एकरी ३४ टन उत्पादन ६५ टन व अलीकडील काळात ९५ टनांपर्यंत पोचवले आहे.
उत्पादन खर्च किमान ६० ते ६५ हजार रुपये येतो. करमाळा तालुक्यात यंदाच्या हंगामात एकही कारखाना सुरु नाही. त्यामुळे शेजारच्या नगर आणि पुणे जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पुरवला जातो. अलीकडील काळात सरासरी दर प्रति टन २५०० ते २६०० रुपये मिळाला. आंतरपीक म्हणून कोथिंबीर घेतली जाते. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून
उसाचा खर्च बऱ्याच प्रमाणात कमी केला जातो. मुंबईच्या व्यापाऱ्यांसोबत करार केला आहे. प्रति पेंढी पाच रुपये दराप्रमाणे विक्री होते.

पुरस्कार
केंद्रीय कृषी व अन्न मंत्रालयाचा ‘प्रोग्रेसिव्ह फार्मर’, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा कृषी सन्मान, राज्य शासनाच्या उत्कृष्ट ऊस उत्पादक आदी अनेक पुरस्कार ब्रम्हदेव यांना मिळाले आहेत. विविध चर्चासत्रांना ते उपस्थित राहतात. सांगली जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी संजीव माने, सुरेश माने-पाटील यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. व्हॅाटस ॲप वा अन्य सोशल मिडियाद्वारे ते संवाद साधतात.

संपर्क- ब्रम्हदेव सरडे- ९८२२९९६५३८, ९३७०७८५३४६


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
इलेक्ट्रिक वाहने डिझेल वाहनांशी नक्कीच...डिझेल इंजिनवर चालणारी वाहने आणि शेतीपयोगी...
जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलरट्रॅक्टरचलित लेझर मार्गदर्शित लेव्हलरमध्ये...
सायकलचलित गिरणीमुळे घरगुती पीठ मिळवणे...नागपूर : उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथील...
कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क...मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह...
निचऱ्यासाठी मोल नांगर, सबसॉयलरभारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी...
पीकविषयक माहितीसाठी मोबाईल ॲपकोणत्याही ॲपची उपयुक्तता ही त्यामध्ये असलेली...
मालमत्ता मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा...पंचायतराज मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार तयार...
शेती व्यवस्थापनात सेन्सर तंत्रज्ञानड्रोनमधील सेन्सर हे पिकांची स्थिती किंवा...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापरउसासाठी योग्य ठिबक सिंचन शक्यतो १६ मी.मी....
रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा...सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र...
सौरऊर्जेवरील वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित...पीक संरक्षणाच्या  खर्चात वाढ होत असून,...
सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणासूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत...
सीआयसीआर’ने विकसित केली कापूस वेचणी बॅग नागपूर ः कापूस वेचणीतील महिलांचे श्रम कमी व्हावे...
बटाटा साठवणीत हवा खेळती ठेवणारी प्रणालीदक्षिण कर्नाटकमध्ये सामान्यतः सरासरी तापमान कमाल...
पेंढा कापणी, गोळा करणारे ‘स्ट्रॉ कंबाइन...अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन...
कच्च्या हळदीपासून भुकटी करण्याचे वेगवान...* १२ ते २४ तासांत ओल्या हळदीपासून भुकटी शक्य *...
सेंद्रिय शेतीचे तंत्र केले आत्मसातआगर (ता. डहाणू, जि. पालघर) येथील चंद्रकांत पाटील...
कृषी क्षेत्रामध्ये महिला अनुकूल यंत्रे...प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान कौतुकास्पद...
हरितगृहावरील पांढरा थर शेवंती पिकाला...शेवंतीसारख्या प्रकाशासाठी संवेदनशील पिकामध्ये...
ग्रामीण उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाइन...मोबाईल हाती आला तरी अद्याप शेतकरी व ग्रामीण...