दुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापन

ऊर्जा भरून काढण्यासाठी व्यालेल्या गायीला संतुलित परिपूर्ण आहार द्यावा.
ऊर्जा भरून काढण्यासाठी व्यालेल्या गायीला संतुलित परिपूर्ण आहार द्यावा.

गाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात कमी होते. ही ऊर्जा भरून काढण्यासाठी गायीला संतुलित परिपूर्ण आहार देणे गरजेचे असते. गाय व्यायल्यानंतर घ्यायची काळजी

  • गाय व्यायल्यानंतर गायीला कोमट पाण्याने अंघोळ घालावी म्हणजे गाईला तर तरी येईल व तिच्या वेदना थोड्या कमी होतील.
  • ५ लीटर पाण्यामध्ये २ किलो गूळ मिसळून प्यायला द्यावे, मिश्रण बनवताना कोमट पाणीच वापरावे; कारण त्यामुळे गूळ शरीरामध्ये लगेच शोषला जाऊन गाईला त्वरित ऊर्जा मिळते.
  • गुळाच्या पाण्याने गाईला ऊर्जा व कॅल्शियम मिळते. जार (प्लासेंटा) पडण्यास मदत होते. हे मिश्रण २-३ दिवस गाईला प्यायला द्यावे.
  • बाजरी, मेथी, गूळ, खोबरे, हळीव व तेल यांची शिजवलेली खिचडी गाईला खायला द्यावी.
  • व्यायल्यावर एक आठवड्यानंतर गायीचे जंत निर्मूलन करून घ्यावे.
  • रोजच्या आहारातून कॅल्शियम, फॉस्फरस व जीवनसत्त्वयुक्त खाद्याचा समावेश करावा. म्हणजे गाईचे आरोग्य चांगले राहते व दूग्धोत्पादनात सातत्य राहते.
  • गाईला संतुलित आहारामध्ये २/३ हिरवा चारा व १/३ कोरडा चारा [२/३ कोंडा खाद्य व १/३ खुराक] द्यावा.
  • प्रत्येकी २.५ लिटर दुधासाठी १ किलो खुराक व संगोपनासाठी १ किलो खुराक देणे गरजेचे आहे.
  • रोजच्या खाद्यातून २ टक्के खनिज मिश्रण द्यावे.
  • स्वच्छ व मुबलक पाणी गाईला द्यावे.
  • दुधाळ गाईचे व्यवस्थापन

  • गोठ्यामधे दुधाळ गाईसाठी वेगळी व पुरेशी जागा असावी.
  • गोठ्यातील तळ/जमीन निसरडी नसावी. जमिनीचा उतार १.५ इंच असावा.
  • गव्हाणी चुन्याने रंगवावी, म्हणजे गोचीड व इतर किटक लगेच नजरेस दिसतात.
  • गोठ्यामध्ये व परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी, हवा खेळती असावी व पुरेसा सूर्यप्रकाश गोठ्यामध्ये असावा.
  • गोठा कोरडा असावा, ओलसरपणामुळे जनावरे आजारी पडू शकतात.
  • ठराविक दिवसानंतर गोठ्यामध्ये जंतुनाशक फवारणी करावी.
  • दुग्धव्यवसाय परवडण्यासाठी दोन वेतांमधील अंतर कमी असणे गरजेचे आहे. तसेच भाकडकाळ २ महिने असावा.
  • गाईच्या पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लीचिंग पावडर टाकावी, तसेच पाण्याची तपासणी केलेली असावी.
  • स्वच्छ दूध उत्पादन

  • दूध काढण्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था असावी व खोलीचा तळ स्वच्छ असावा.
  • दूध काढताना गाईना हळुवारपणे व काळजीने हाताळावे, पाठीवरून हात फिरवावा.
  • दूध काढण्यासाठी वेळ ठरवून त्यावेळीच दूध काढावे. दूध दिवसातून दोन वेळा काढावे. जास्त दूध देणाऱ्या‍या गाईचे दिवसातून तीन वेळा दूध काढावे.
  • दूध काढण्यासाठी वापरायची भांडी स्वच्छ असावीत.
  • कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा, तसेच त्यामधे पोटॅशिअम परमॅग्नेट चा वापर करावा.
  • दूध काढणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ असावेत, हाताला जखमा नसाव्यात, नखे कापलेली असावीत, त्या व्यक्तीस त्वचेचा आजार नसावा व तो धूम्रपान करणारा नसावा.
  • सुरवातीचे दूध काढून टाकून द्यावे कारण त्यामधे जीवणूंचे प्रमाण जास्त असते. ५ ते ७ मिनिटांमधे सगळे दूध काढावे. कासेमधे दूध शिल्लक ठेवू नये त्यामुळे कासदाह होऊ शकतो.
  • संपर्क ः डॉ. मीनल प-हाड, ९०११२३१२२९ प्रणिता सहाणे, ८६००३०१३२९ (डॉ. प-हाड कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे येथे कार्यरत आहेत. तर, सहाणे कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, गुंजाळवाडी पठार, संगमनेर, जि. नगर येथे कार्यरत आहेत. ) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com