agriculture story in marathi, care and management of pregnent cow and new born calf | Agrowon

कोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात करा बदल
कुलदीप शिंदे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होणे, पाणी पिणे कमी होणे, प्रजनन क्षमता आणि अंडी उबवणक्षमता कमी होणे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांच्या शेडचे, लिटरचे अाणि आहाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल याकडे लक्ष द्यावे.

लिटरचे व्यवस्थापन

कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होणे, पाणी पिणे कमी होणे, प्रजनन क्षमता आणि अंडी उबवणक्षमता कमी होणे अशा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात कोंबड्यांच्या शेडचे, लिटरचे अाणि आहाराचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल याकडे लक्ष द्यावे.

लिटरचे व्यवस्थापन

  • शेडमध्ये चांगल्या प्रकारचे लिटर वापरल्यामुळे कोंबड्यांना ऊब मिळते, शेडमध्ये एकसारखे तापमान राखले जाते त्याचप्रमाणे लिटर पानी शोषून घेण्यासाठी देखील मदत करते. कोंबड्यांच्या विष्टेची रासायनिक प्रक्रियेची तीव्रता कमी करते त्यामुळे कोंबड्यांचा आणि विष्टेचा थेट संपर्क होत नाही.
  • हिवाळ्यात शेडमध्ये ६ इंच जाडीच्या चांगल्या प्रकारच्या लिटरचे अाच्छादन करावे. लिटरसाठी भाताचे तूस, काड याचा वापर करावा.
  • लिटर दर आठवड्याला खाली वर करावे अाणि त्यामध्ये अावश्यकतेनुसार चुना मिसळावा.

कोंबड्यांचे शेड

  • शेडची दिशा पूर्व-पश्चिम असावी त्यामुळे हिवाळ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शेडमध्ये येण्यास मदत होते.
  • शेडच्या ज्या भागातून थंड हवा शेडमध्ये येते अशा ठिकाणी गोनपाट लावावेत. सकाळी शेडमध्ये सूर्यकिरणे येण्यासाठी गोणपाट पुन्हा गुंडाळून ठेवावेत.
  • कोंबड्यांच्या विष्ठेमुळे शेडमध्ये मोठ्या प्रमाणात अमोनिया वायू तयार होत असतो. शेडमध्ये जर हवा खेळती नसेल तर अमोनिया वायूमुळे कोंबड्यांमध्ये श्वसनाविषयी समस्या निर्माण होतात. त्यासाठी शेडमध्ये सरकनाऱ्या खिडक्यांचा वापर करावा कारण त्या दिवसा सोप्या पद्धतीने उघडता येतात आणि रात्रीच्या वेळी पटकन बंद करता येतात.
  • शेडमधील प्रदूषित हवा बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट पंख्याची व्यवस्था करावी.

कोंबड्यांचा आहार

  • शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीर क्रिया चालू ठेवून हाडे, मांस, पंख आणि अंड्याच्या निर्मितीसाठी कोंबड्यांना उत्तम दर्जाचे खाद्य देणे अावश्यक अाहे.
  • - कमी तापमानात कोंबड्या जास्त प्रमाणात खाद्य खातात आणि या वेळी त्यांची ऑक्सिजनची मागणीदेखील जास्त असते. ज्या वेळी तापमान खूपच कमी असेल त्या वेळी कोंबड्यांना जास्त प्रमाणात खाद्य द्यावे. कारण शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते.
  • चयापचायच्या क्रियेत प्रत्येक कोंबड्यांमध्ये प्रत्येक दिवसाला जसे तापमान बदलेल तशी ऊर्जा वापरण्यात (कॅलरी) भिन्नता दिसून येते. ज्या वेळी कोंबड्यां खूप खाद्य खातात त्या वेळी घेतल्या जाणाऱ्या ऊर्जेबरोबर न लागणारे बाकीचे पोषक द्रव्ये पण मोठ्या प्रमाणावर खातात त्यामुळे असे अन्न द्रव्य वाया जाते.
  • वाया जाणाऱ्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कोंबड्या खाद्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा असणाऱ्या स्रोतांचा प्रामुख्याने स्निग्ध पदार्थाचा वापर करावा किंवा खाद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण समान ठेवून बाकीच्या पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी करावे.
  • शेडमध्ये फीडर्सची संख्या वाढवावी. दिवसभर कोंबड्यांना खाद्य उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.

पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन

  • हिवाळ्यामध्ये कोंबड्या खूप कमी पाणी पितात, त्यामुळे शरीरामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण ठेवण्यासाठी त्यांना ताज्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पाणी खूप थंड असेल तर त्यामध्ये गरम पाणी मिसळून द्यावे. त्यामुळे पाण्याचे तापमान पिण्यायोग्य होते.
  • कोंबड्यांना अनेक प्रतिबंधात्मक लसी, अाैषधे, जीवनसत्त्वे ही पाण्यामधूनच दिली जातात. त्यामुळे
  • लस, अाैषधे, जीवनसत्त्वे देण्यापूर्वी काही तास अगोदर पाणी देऊ नये. अाैषधे देताना ती कमी पाण्यातच द्यावीत.

संपर्क ः कुलदीप शिंदे, ९८८१४१४९६७
(राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर, राजस्थान)

 

इतर कृषिपूरक
गोठ्याची स्वच्छता ठेवा, माश्यांवर...गोठ्यामध्ये अस्वच्छता असल्यास माश्यांचा...
गाभण जनावरांकडे द्या लक्षपावसाळी काळात वातावरणात बदल होत असतात....
जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या...
प्रक्रियेतून वाढवा कोरड्या चाऱ्याची...निकृष्ट दर्जाच्या कोरड्या चाऱ्यावर प्रक्रिया करून...
चिकन, मांस विक्रीसाठी गुणवत्ता नियमचिकन, मांस विक्रेत्यांना परवाना घेण्यासाठी...
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...