काजूसाठी फळपीक विमा योजना

काजू विमा
काजू विमा

काजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या सात जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्‍यांतील अधिसूचित महसूल मंडळांत राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवलेल्या  हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसानभरपाई देईल.

  • एकूण नियमित विमा संरक्षण रक्कम प्रतिहेक्‍टर ः ७६,००० रुपये आणि शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ३८०० रुपये.
  • गारपिटीपासून विमा संरक्षण कालावधी ः १ जानेवारी २०१८ ते ३० एप्रिल २०१८
  • प्रतिहेक्‍टर विमा संरक्षण रक्कम ः २५,३०० रुपये.
  • शेतकऱ्यासाठी विमा हप्ता ः १२६५ रुपये.
  • शेतकऱ्याने गारपिटीमुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासांत माहिती संबंधित विमा कंपनी/संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्‍यक आहे. त्यानंतर विमा कंपनी महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्‍चित करेल.
  • योजनेतील सहभाग ः

  • काजूसाठी पीककर्ज घेतले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. मात्र गारपीट या हवामान धोक्‍यासाठी सहभाग ऐच्छिक राहील.
  • बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योनजा ऐच्छिक राहील.
  • फळपिकाखालील किमान २० हेक्‍टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळांत ही योजना राबविण्यात येते, मात्र सदर मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्‍यक असते.
  • योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी मार्फत ऑनलाइन अर्ज भरावेत. सोबत ७/१२, आधार कार्ड, बॅंक खाते तपशील आवश्‍यक आहे.
  • भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ः ३० नोव्हेंबर २०१७. संपर्क ः संबंधित तालुका कृषी अधिकारी, संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग संकेतस्थळ ः  www.krishi.maharashtra.gov.in

    काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्‍यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

    विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी प्रमाणके(ट्रगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु.)
    अवेळी पाऊस दि. १ डिसेंबर २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८, कमाल देय नुकसान भरपाई रु. ५०,०००   १. कोणत्याही एका दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. १०,००० देय. २. कोणत्याही सलग दोन दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २०,००० देय. ३. कोणत्याही सलग तीन दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ३५,००० देय. ४. कोणत्याही सलग चार दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ५०,००० देय.
    कमी तापमान  दि. १ डिसेंबर २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८, कमाल देय नुकसान भरपाई रु. २६,०००   १. तापमान सलग ३ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. १०,४०० देय. २. तापमान सलग ४ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. १५,६०० देय. ३. तापमान सलग ५ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. २६,००० देय.

    एकूण विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर रु. ७६,०००

    सदर योजना खालील विमा कंपनीमार्फत खालील जिल्ह्यातील काजू फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.

    विमा कंपनीचे नाव     जिल्हे
    एचडीएफसी - अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी   ठाणे, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक
    इफ्को टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड     रत्नागिरी
    बजाज अलयांज जनरल इन्शुरन्स कंपनी   पालघर

    संपर्क ः विनयकुमार आवटे ः ९४०४९६३८७० अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे विभाग  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com