Agriculture story in marathi, cashue fruit crop insurance | Agrowon

काजूसाठी फळपीक विमा योजना

विनयकुमार आवटे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

काजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या सात जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्‍यांतील अधिसूचित महसूल मंडळांत राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवलेल्या  हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसानभरपाई देईल.

काजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या सात जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्‍यांतील अधिसूचित महसूल मंडळांत राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवलेल्या  हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसानभरपाई देईल.

  • एकूण नियमित विमा संरक्षण रक्कम प्रतिहेक्‍टर ः ७६,००० रुपये आणि शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ३८०० रुपये.
  • गारपिटीपासून विमा संरक्षण कालावधी ः १ जानेवारी २०१८ ते ३० एप्रिल २०१८
  • प्रतिहेक्‍टर विमा संरक्षण रक्कम ः २५,३०० रुपये.
  • शेतकऱ्यासाठी विमा हप्ता ः १२६५ रुपये.
  • शेतकऱ्याने गारपिटीमुळे नुकसान झाल्यापासून ४८ तासांत माहिती संबंधित विमा कंपनी/संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्‍यक आहे. त्यानंतर विमा कंपनी महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्‍चित करेल.

योजनेतील सहभाग ः

  • काजूसाठी पीककर्ज घेतले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. मात्र गारपीट या हवामान धोक्‍यासाठी सहभाग ऐच्छिक राहील.
  • बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योनजा ऐच्छिक राहील.
  • फळपिकाखालील किमान २० हेक्‍टर किंवा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळांत ही योजना राबविण्यात येते, मात्र सदर मंडळ शासनामार्फत अधिसूचित होणे आवश्‍यक असते.
  • योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सीएससी मार्फत ऑनलाइन अर्ज भरावेत. सोबत ७/१२, आधार कार्ड, बॅंक खाते तपशील आवश्‍यक आहे.

भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ः ३० नोव्हेंबर २०१७.
संपर्क ः संबंधित तालुका कृषी अधिकारी, संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग
संकेतस्थळ ः  www.krishi.maharashtra.gov.in

काजू पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्‍यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) व विमा संरक्षण कालावधी प्रमाणके(ट्रगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रती हेक्टर रु.)
अवेळी पाऊस
दि. १ डिसेंबर २०१७ ते
२८ फेब्रुवारी २०१८, कमाल देय नुकसान भरपाई रु. ५०,०००  
१. कोणत्याही एका दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. १०,००० देय.
२. कोणत्याही सलग दोन दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २०,००० देय.
३. कोणत्याही सलग तीन दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ३५,००० देय.
४. कोणत्याही सलग चार दिवशी  ५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ५०,००० देय.
कमी तापमान
 दि. १ डिसेंबर २०१७ ते
२८ फेब्रुवारी २०१८, कमाल देय नुकसान भरपाई रु. २६,०००  
१. तापमान सलग ३ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. १०,४०० देय.
२. तापमान सलग ४ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. १५,६०० देय.
३. तापमान सलग ५ दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास रु. २६,००० देय.

एकूण विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर रु. ७६,०००

सदर योजना खालील विमा कंपनीमार्फत खालील जिल्ह्यातील काजू फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर कार्यान्वित करण्यात येईल.

विमा कंपनीचे नाव     जिल्हे
एचडीएफसी - अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी   ठाणे, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक
इफ्को टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड     रत्नागिरी
बजाज अलयांज जनरल इन्शुरन्स कंपनी   पालघर

संपर्क ः विनयकुमार आवटे ः ९४०४९६३८७०
अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे विभाग

 


इतर शासन निर्णय
खरिपासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनाहवामानातील बदलांमुळे पिकांचे कधीही नुकसान होऊ...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
खत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची...
डोंगरसोनी झाले १२६ शेततळ्यांचे गावशासकीय योजना बांधापर्यंत चांगल्या अर्थाने पोचली...
शाश्वत सिंचनासाठी आहेत विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे....
बेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...
रब्बी हंगामासाठी पीकविमा योजनाराज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
खाद्यतेल अायात शुल्कात दुप्पट वाढमुंबई : देशांतर्गत तेलबियांच्या दरात होणारी...
बारा हजार ट्रॅक्टर्सला मिळणार अनुदान !मुंबई : उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत...
काजूसाठी फळपीक विमा योजनाकाजू पिकासाठी ही योजना कोल्हापूर, रत्नागिरी,...
मोसंबीसाठी फळपीक विमा योजनामोसंबी पिकासाठी ही योजना औरंगाबाद, परभणी, सोलापूर...
गांधी जयंतीपर्यंत राज्यात हागणदारीमुक्‍...मुंबई ः राज्यातील सर्वच्या सर्व; म्हणजे ३८४ शहरे...
खत नियंत्रण प्रयोगशाळांचे बळकटीकरण :...राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत (RKVY) राज्यातील...
सेंद्रिय शेती संशाेधन, प्रशिक्षणसाठी २०...पुणे : नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन आणि...
कमी पावसाच्या तालुक्यांत कृषी पंपासाठी...राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (ता.२३) झालेले...
आयात निर्बंधाने उडीद, मूग वधारलेनवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी (ता. २१...