भात लावणी ते झोडणीपर्यंत आदिवासी तरुणाचे यांत्रिकीकरण

पालघर जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या आदिवासी तरुणाने भातलावणीपासून ते झोडणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. त्यातून मजूरबळ, वेळ, श्रम व आर्थिक बचत साधली आहे.शिवाय भाडेतत्वावर यंत्रे देऊन पूरक उत्पन्नाची जोडही साधली आहे.
तणनियंत्रणासाठी कोनो वीडर
तणनियंत्रणासाठी कोनो वीडर

पालघर जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या आदिवासी तरुणाने भातलावणीपासून ते झोडणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. त्यातून मजूरबळ, वेळ, श्रम व आर्थिक बचत साधली आहे. शिवाय भाडेतत्वावर यंत्रे देऊन पूरक उत्पन्नाची जोडही साधली आहे. पालघर जिल्हातील बहुतांश भाग आदिवासी डोंगराळ आहे. येथे भातशेती मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने केली जाते. बहुतांश शेतकऱ्यांचा भात लागवड कालावधी व पर्यायाने कापणीपर्यंतचा कालावधी एकाचवेळी येतो. त्यामुळे मजुरांचा मोठा तुटवडा भासतो. परिणामी कामे वेळेवर होत नाहीत. काहीवेळा मजुरांना वाढीव दर देऊन काम वेळेत पूर्ण करून घ्यावे लागते. त्याची मोठी आर्थिक झळ बसते. जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या आदिवासी तरुणाने ही समस्या ओळखली. अशा परिस्थितीत भात शेती फायदेशीर करायची असेल तर यांत्रिकीकरण आवश्यक असल्याचे ओळखले. त्यानुसार सुधारणा केली. कोलेकर यांची शेती आई, दोन भाऊ, पत्नी, मुलगा व बहीण असे १० जणांचे कोलेकर यांचे एकत्रित कुटुंब आहे. वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. त्यात भात, मोगरा, आंबा, काजू, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. कोलेकर सुरवातीला शिलाईकाम करायचे. वडिलांच्या निधनानंतर शेती आणि घरची जबाबदारी येऊन पडली. केवळ शिलाई कामावर घर चालविणे शक्य नव्हते. मग त्यांनी शेतीही प्रगत करायचे ठरवले. उन्हाळ्यात धरणाचे पाणी उपलब्ध होते. चंद्रकांत यांची जमीन कॅनॉलला लागून असल्याने तेथे कायम पाणी पाझरत असते. त्यामुळे पावसाळी भाताबरोबरच उन्हाळी भाताची लागवड करणेही शक्य होते. ‘केव्हीके’ च्या संपर्कातून सुधारली शेती कोलेकर कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, पालघर यांच्या संपर्कात आले. तेथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून भातशेतीत विविध प्रयोग व तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरवात केली. ते पुढीलप्रमाणे. चटई पद्धतीची रोपवाटिका ही रोपवाटिका घरच्या अंगणातच सुक्या मातीचा किंवा चिखलाचा वापर करून तयार केली जाते. सुक्या मातीचा वापर करत असताना माती व कंपोस्ट खताचे मिश्रण केले जाते. साधारण एक एकर भात लागवडीसाठी १० ते ११ किलो बियाणे लागते. रोपवाटिका तयार करण्याचा खर्च सुमारे एकहजार रुपये येतो. नियंत्रित पद्धतीची लागवड यात दोरीच्या साहाय्याने २५ बाय २५ सेंटीमीटरवर दोन काडी लागवड घरातील व्यक्तींकडूनच केली जाते.केली जाते. पावसाळ्यात एक एकर तर उन्हाळ्यात सुमारे १७ गुंठे क्षेत्र असते. एक एकर लागवडीसाठी पावसाळ्यात ५ ते ६ दिवस तर उन्हाळ्यात दोन दिवस लागतात. लागवड करताना भाताच्या पाच ओळींनंतर दीड फूट जागा फवारणी, खत व्यवस्थापन व तण नियंत्रणासाठी आवर्जून ठेवली जाते. या पट्टा पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे करणे सोपे जाते. उत्पादनात वाढ मिळते. कोनोवीडरचा वापर भातात तण नियंत्रण खूप महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कोनोवीडरचा वापर लागवडीनंतर १५ व्या व ३० व्या दिवशी करतात. या साधनामुळे मजुरीमध्ये बचत झालीच. शिवाय गवत जमिनीतच गाडले जाते. वैभव विळयाचा वापर याच विद्यापीठाने विकसित केलेल्या वैभव विळयाचा वापर भात कपणीसाठी होतो. त्याद्वारे कापणी जमिनीलगत होते. खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पेंढ्या उत्पादनातही वाढ झाली आहे. विद्युत चलित  झोडणी यंत्राचा वापर सुरवातीला भात झोडणी पारंपरिक पद्धतीने केली जायची. सन २०१६-१७ मध्ये आदिवासी उपाय योजनेतून केव्हीकेने गांजे गावात भात झोडणी व उफवणी यंत्राची प्रत्यक्षिके घेतली. शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध करून दिले. आता कोलेकर भात झोडणी यंत्र अन्य शेतकऱ्यांनाही भाडेतत्वावर देतात. दिवसाला त्यातून ३५० रुपये शुल्क भाडे मिळते. पावसाळा व उन्हाळ्यात गाव परिसरातही भात शेती होत असल्याने ५० ते ६० दिवस यंत्राला काम व रोजगार मिळतो. त्यातील उत्पन्नातून व थोडी स्वतःकडील रक्कम गुंतवून २०१८ मध्ये ‘सेकंड हँड पॉवर टीलर’ त्यांनी खरेदी केला. तोही शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात येतो. कोलेकर यांच्या भातशेतीला शेतकरी भेट देऊन माहिती घेत असतात. काहीजण त्यांच्या शेतीचे अनुकरणही करू लागले आहेत. कोलेकर यांच्या यांत्रिकी शेतीतील बाबी

  • चटई पद्धतीच्या भात रोपवाटिकेमुळे रोपे १० ते १५ दिवसांत लावणीला येतात. या पद्धतीमुळे बियाणे, खत तसेच राब करण्यासाठीच्या मजुरीत बचत होते..
  • भात लावणीच्या वेळी रोपे खणण्याची तसेच जुड्या बांधण्याची गरज भासत नाही.
  • दोरीच्या साहाय्याने दोन काडया रोपांची लागवड केल्यामुळे तसेच रोपांमध्ये योग्य अंतर असल्यामुळे हवा खेळती राहते. त्यामुळे फुटव्यांची संख्या ४० ते ४५ पर्यंत वाढते.
  • विविध टप्प्यावर विविध यंत्रांचा वापर केल्याने एकूणच मजुरी खर्चात, वेळ, श्रम व पैशांत बचत झाली.
  • एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत भाताचे उत्पादन मिळते. शक्यतो संकरित वाणांचा वापर करतात. सुमारे १८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो. जोडीला पेंढ्यांचेही पूरक उत्पादन मिळते.
  • संपर्क- चंद्रकांत कोलेकर- ८४४६५९४७३२, ७०२०५५५३७६ अनुजा दिवटे-९९२०९३५२२३ (अनुजा दिवटे केव्हीके पालघर येथे विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) आहेत. तर डॉ. विलास जाधव केव्हीके प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com