Coccidiosis disease management in poultry birds
Coccidiosis disease management in poultry birds

प्रतिबंधात्मक उपायातून टाळा कोंबड्यांतील रक्ती हगवण 

रक्ती हगवण रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शेड स्वच्छ ठेवणे विशेषतः लीटरचे योग्य व्यवस्थापन ठेवणे आवश्यक असते. खाद्यांमध्ये रोग प्रतिबंधक औषधांचा वापर करून तसेच आजारी कोंबड्यांना वेगळे ठेऊन या रोगावर नियंत्रण मिळवता येते. 

‘आयमेरिया’ या एकपेशीय जंतूपासून रक्ती हगवण हा रोग होतो. लहान तसेच मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग आढळतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मरतूक येऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. 

रोगाचा प्रसार 

  • खाद्य तसेच पाण्यामधून रोगजंतूचे उसिष्ट पोटात गेल्यामुळे प्रसार होतो. 
  • रोगग्रस्त कोंबड्यांच्या विष्ठेतून रोगकारक जंतूचे उसिष्ट शरीराबाहेर टाकले जाते, त्याच्या संपर्कात खाद्य आणि
  • पाणी आल्यास ते दूषित होते. हे दूषित खाद्य निरोगी कोंबडीने खाल्यास त्यांना रोगाचा संसर्ग होतो. 
  • रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेडमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या चपलांना, कपड्यांना तसेच भांड्यांना रोगजंतू
  • असलेली विष्ठा लागते आणि हे कामगार दुसऱ्या निरोगी शेडमध्ये गेल्यावर तेथे या रोगाचा प्रसार होतो. 
  • उंदीर, घुशी, पाळीव प्राणी, झुरळे यांच्यामुळे देखील रोगप्रसार होतो. 
  • रोगाची लक्षणे 

  • लहान आतडे तसेच मोठ्या आतड्यांमध्ये रोगाची लक्षणे आढळतात. 
  • लहान पक्षात मोठ्या आतड्यात तर मोठ्या पक्षात लहान आतड्यात या रोगाची लक्षणे आढळतात. 
  • लहान कोंबड्यांतील लक्षणे 

  • पाण्यासारखे जुलाब होणे, विष्ठेबरोबर आव पडणे तसेच विष्ठा तांबड्या किंवा चॉकलेटी रंगाची दिसते. 
  • ॲनेमिया आढळून येतो. 
  • तुरा फिकट पडतो. 
  • हालचाल मंदावते आणि पुढे झुकून उभ्या राहतात. 
  • एका ठिकाणी घोळका करून उभे राहतात. 
  • पंख कोरडे, राठ आणि खाली पडल्यासारखे दिसतात. 
  • कोंबड्या डोळे झाकून उभे राहतात. 
  • भूक मंदावल्यामुळे खाद्य कमी खातात, त्यामुळे शरीर वाळत जाते. 
  • क्रॉप अवयव मोठा होतो. 
  • काही कोंबड्या रोगातून बरे होतात, पण त्यांची उत्पादन क्षमता कमी होते. 
  • मोठ्या कोंबड्यातील लक्षणे 

  • यांच्यात लहान आतड्यात हा रोग आढळतो. 
  • पंख राठ होतात तसेच तुरा फिकट होतो. 
  • भूक कमी होते त्यामुळे वजन घटते आणि कोंबड्या वाळत जातात. 
  • कोंबड्या फारच अशक्त झाल्यामुळे हालचाल करत नाहीत. 
  • पातळ जुलाब होणे तसेच चॉकलेटी रंगाची विष्ठा आढळून येते. 
  • रक्तपरीक्षणामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालेले आढळते. 
  • रक्तातील तांबड्या पेशींची संख्या कमी झालेली आढळून येते. 
  • रोगनिदान  

  • रक्तमिश्रीत किंवा चॉकलेटी रंगाची विष्ठा. 
  • रोगग्रस्त कोंबड्यांची विष्ठा तपासल्यास, रोगकारक जंतूचे अस्तित्व दिसून येते. 
  • औषध उपयोगात कसे आणावे 

  • ज्यावेळेस कळपात रोग सुरू असतो, त्यावेळेस कोंबड्यांचे खाणे कमी होते, खाद्यावर वासना जात नाही. त्यामुळे
  • औषधाचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे औषधे पाण्यातून द्यावीत. रोगाच्या प्रादुर्भावाच्या काळात ३-२
  • -३ या पद्धतीने वापरावीत. याचा अर्धा दिवस औषधयुक्त पाणी २ दिवस साधेपाणी नंतर ३ दिवस औषधयुक्त पाणी
  • पक्षांना उपलब्ध करावे. 
  • प्रतिबंधात्मक उपाय 

  • कोणतेही उपचार पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली करावेत. 
  • शेडमधील ‘डीप लिटर’ ओले होणार नाहीत याची काळजी घ्यावी. 
  • ओल्या झालेल्या डीप लिटरचा भाग काढून, त्या ठिकाणी नवीन लिटर टाकावे. त्यापूर्वी चुन्याची फक्की मारावी. 
  • शेडमधील डीप लिटर पायाने खालीवर करावे, म्हणजे हवा खेळती राहते. तसेच डीप लिटर कोरडे राहण्यास मदत होते. 
  • शेड स्वच्छ ठेवावे. 
  • शेडच्या बाहेर ‘फिटबाथ’ तयार करावे आणि त्यामध्ये पाय ठेवूनच शेडमध्ये प्रवेश करावा. बाथमध्ये चुना किंवा
  • फिनेलचे पाणी टाकावे. 
  • कमी जागेत जास्त कोंबड्या ठेवू नये. 
  • आजारी कोंबड्यांना वेगळे ठेवावे तसेच त्यांची विष्ठा गोळा करून लांब फेकून द्यावी. 
  • निरोगी आणि रोगग्रस्त कोंबड्यांचा एकमेकांशी संपर्क होऊ देऊ नये. 
  • भांडी तसेच उपकरणे निर्जंतुक करूनच वापरावीत. 
  • खाद्यांमध्ये रोग प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. 
  • संपर्क ः डॉ. श्रीकांत सरदेशपांडे, ९६५७२५७८०४ सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com