Agriculture story in marathi communication behaviour in sheeps | Agrowon

मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धत

रूपसिंग खानविलकर
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या आवाजावरून मेंढीला नक्की काय होत आहे किंवा मेंढीला नक्की काय पाहिजे हे कळते. मेंढका किंवा मेंढ्यांमधील कामाचा दीर्घ अनुभव असलेले मेंढपाळ तसेच पशुधन पर्यवेक्षक मेंढ्यांच्या आवाजावरून ही गरज ओळखू शकतात.
 
आपण सकाळी मेंढ्यांना गोळी पेंड टाकतो तेव्हा गोळी पेंड ठेवलेल्या खोलीत गेल्यापासून ते गोळी पेंड गव्हाणीत पडेपर्यंत सर्वच मेंढ्या मोठमोठ्याने कर्कश आवाजात ओरडत असतात. आवडीचे खाद्य असल्यामुळे ते मिळेपर्यंत मेंढ्या खूप मोठ्याने ओरडत असतात.

मेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या आवाजावरून मेंढीला नक्की काय होत आहे किंवा मेंढीला नक्की काय पाहिजे हे कळते. मेंढका किंवा मेंढ्यांमधील कामाचा दीर्घ अनुभव असलेले मेंढपाळ तसेच पशुधन पर्यवेक्षक मेंढ्यांच्या आवाजावरून ही गरज ओळखू शकतात.
 
आपण सकाळी मेंढ्यांना गोळी पेंड टाकतो तेव्हा गोळी पेंड ठेवलेल्या खोलीत गेल्यापासून ते गोळी पेंड गव्हाणीत पडेपर्यंत सर्वच मेंढ्या मोठमोठ्याने कर्कश आवाजात ओरडत असतात. आवडीचे खाद्य असल्यामुळे ते मिळेपर्यंत मेंढ्या खूप मोठ्याने ओरडत असतात.

 • मेंढी विताना पिल्लू मोठे असल्यामुळे किंवा मेंढी पहिलारू असल्यामुळे तिला त्रास झाला तर ती कण्हत असल्यासारखा आवाज काढते. हा आवाज वेगळाच असतो. त्यामुळे कोणती मेंढी व्यायला झाली आहे हे मेंढी न पाहता आवाज लक्षात घेऊन लगेच ओळखता येते.
 • मेंढी व्यायल्यानंतर पिल्लाला चाटताना खूप वेगळा, लहान नाजूक आवाज काढत असते. त्या वेळी ती जणू पिल्लाला शिकवत आहे किंवा मी तुझी आई आहे.
 • संध्याकाळी मेंढी चरून आली आणि चुकून तिच्या पिल्लांच्या वाडग्याऐवजी दुसऱ्या वाडग्यात गेली तर त्या वेळचा पिल्लाला बोलवण्याचा आवाज हा वेगळा असतो. पिल्लू जवळ येईपर्यंत ती ओरडत राहते. तिकडून तिचे पिल्लूपण एकसारखे ओरडत असते.
 • काही वेळा पिल्ले लेंडी टाकताना किंवा पातळ संडास होत असेल तेव्हा खाली बसूनच कण्हल्यासारखा आवाज काढतात. हा आजारी पिल्लाचा आवाज ओळखता आला पाहिजे. त्या पिल्लाला त्रास होत असेल तर तातडीने योग्य उपचार करता येतो.
 • जेव्हा बालिंगा (नर) माजावरील मेंढीमागे पळत असतो, त्या वेळी तो एक वेगळा आवाज काढतो. त्या वेळी तो जीभपण बाहेर काढतो.
 • बालिंग्याचे वीर्य (सिमेन) गोळा करताना कृत्रिम योनीमध्ये वीर्य देतेवेळी एक वेगळाच आवाज बालिंगा काढतो.
 • पिल्लू, कोकरू, लाव्हरी, मेंढीचे आवाज त्यांच्या वयानुसार वेगळेच असतात. काही वेळा मेंढीच्या आवाजावरून कळते की ही खूप वयस्कर मेंढी आहे.

काही निरीक्षणे ः

 • कोकराला कानात बिल्ला मारला तरी ते ओरडत नाही. फक्त धडपडते.
 • मेंढीला कानात बिल्ला मारला तरी मेंढीपण ओरडत नाही.
 • मेंढीचा पाय तारेत अडकला किंवा मोडला, गव्हाण अंगावर पडण्यासारखा अपघात झाला तरी मेंढी ओरडत नाही.
 • मेंढीला इंजेक्शन दिले तर त्या वेळी ती ओरडत नाही. त्याच ठिकाणी शेळी असेल तर जोरात ओरडते.
 • तपासणीसाठी लेंडी काढताना मेंढी ओरडत नाही, पण शेळी मोठ्याने ओरडते.
 • एखाद्या मेंढीचे पिल्लू काही कारणास्तव मेले तर संध्याकाळी मेंढी बाहेरून चरून आली की पिल्लासाठी नक्की ओरडते. अशा वेळी एखादे तिळ्यातील किंवा जुळ्यातील दुसऱ्या मेंढीचे लहान पिल्लू आम्ही त्या मेंढीला धरून पाजतो. मात्र तरी देखील दोन ते तीन दिवस ही मेंढी तिच्या मेलेल्या पिल्लासाठी ओरडते. एक आठवड्यानंतर मात्र जे तिचे स्वतःचे नसलेले पिल्लू तिला पाजले जाते त्याच्यासाठी ओरडायला लागते आणि ते पिल्लू स्वतःचे आहे असे समजून आपोआप त्याला पाजू लागते. नंतर ती मेंढी धरावी लागत नाही.

संपर्क ः रूपसिंग खानविलकर, ७४९९९४०९७० 
(पशुसंवर्धन विभाग, निंबकर कृषी संशोधन संस्था, फलटण, जि. सातारा)

टॅग्स

इतर कृषिपूरक
पशुपालनात सुरक्षितता महत्त्वाची...पशू सांभाळ, दैनंदिन निगा, चारा-पाण्याची सोय, दूध...
अनुदानाचा योग्य विनियोगअनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच...
आजारांपासून कोंबड्यांचे संरक्षणकोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन...
बदलत्या हवामानानुसार जनावरांचे...बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा,...
उत्पादन धिंगरी अळिंबीचेअळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने...
फायदेशीर पशुपालनाचे तंत्रगाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे...
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापरआपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा...
स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्तादुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक...
अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि...
दुधातील फॅट कमी राहण्याची कारणे,...दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने...
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन...स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि...
उन्हाळ्यातील जनावरांच्या प्रजनन समस्याउन्हाळ्यात जनावरे चारा कमी व पाणी जास्त पितात....
जनावरातील गोचीड नियंत्रणउन्हाळ्यात जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात गोचीडांचा...
चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया...उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही...
ओळख पशू संस्थांची...पुण्यश्‍लोक...पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी...
पशुप्रजननातील संभाव्य अडथळे ओळखाप्रजनन व्यवस्थापनात ऋतुमानानुसार, तांत्रिक...
जाणून घ्या कमी अंडी उत्पादनाची कारणे,...देशी कोंबड्यांचे अंडी उत्पादन मुळातच कमी असते आणि...
दुधाळ जनावरांचे उन्हाळ्यातील आहार...नैसर्गिक आपत्ती नियोजन व व्यवस्थापनाबद्दलची...
जनावरांतील मायांग बाहेर येण्याची समस्याम्हशीमधील मायांग बाहेर येण्याचे प्रमाण इतर बाकी...
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...