Agriculture story in marathi communication behaviour in sheeps | Agrowon

मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धत

रूपसिंग खानविलकर
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या आवाजावरून मेंढीला नक्की काय होत आहे किंवा मेंढीला नक्की काय पाहिजे हे कळते. मेंढका किंवा मेंढ्यांमधील कामाचा दीर्घ अनुभव असलेले मेंढपाळ तसेच पशुधन पर्यवेक्षक मेंढ्यांच्या आवाजावरून ही गरज ओळखू शकतात.
 
आपण सकाळी मेंढ्यांना गोळी पेंड टाकतो तेव्हा गोळी पेंड ठेवलेल्या खोलीत गेल्यापासून ते गोळी पेंड गव्हाणीत पडेपर्यंत सर्वच मेंढ्या मोठमोठ्याने कर्कश आवाजात ओरडत असतात. आवडीचे खाद्य असल्यामुळे ते मिळेपर्यंत मेंढ्या खूप मोठ्याने ओरडत असतात.

मेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या आवाजावरून मेंढीला नक्की काय होत आहे किंवा मेंढीला नक्की काय पाहिजे हे कळते. मेंढका किंवा मेंढ्यांमधील कामाचा दीर्घ अनुभव असलेले मेंढपाळ तसेच पशुधन पर्यवेक्षक मेंढ्यांच्या आवाजावरून ही गरज ओळखू शकतात.
 
आपण सकाळी मेंढ्यांना गोळी पेंड टाकतो तेव्हा गोळी पेंड ठेवलेल्या खोलीत गेल्यापासून ते गोळी पेंड गव्हाणीत पडेपर्यंत सर्वच मेंढ्या मोठमोठ्याने कर्कश आवाजात ओरडत असतात. आवडीचे खाद्य असल्यामुळे ते मिळेपर्यंत मेंढ्या खूप मोठ्याने ओरडत असतात.

 • मेंढी विताना पिल्लू मोठे असल्यामुळे किंवा मेंढी पहिलारू असल्यामुळे तिला त्रास झाला तर ती कण्हत असल्यासारखा आवाज काढते. हा आवाज वेगळाच असतो. त्यामुळे कोणती मेंढी व्यायला झाली आहे हे मेंढी न पाहता आवाज लक्षात घेऊन लगेच ओळखता येते.
 • मेंढी व्यायल्यानंतर पिल्लाला चाटताना खूप वेगळा, लहान नाजूक आवाज काढत असते. त्या वेळी ती जणू पिल्लाला शिकवत आहे किंवा मी तुझी आई आहे.
 • संध्याकाळी मेंढी चरून आली आणि चुकून तिच्या पिल्लांच्या वाडग्याऐवजी दुसऱ्या वाडग्यात गेली तर त्या वेळचा पिल्लाला बोलवण्याचा आवाज हा वेगळा असतो. पिल्लू जवळ येईपर्यंत ती ओरडत राहते. तिकडून तिचे पिल्लूपण एकसारखे ओरडत असते.
 • काही वेळा पिल्ले लेंडी टाकताना किंवा पातळ संडास होत असेल तेव्हा खाली बसूनच कण्हल्यासारखा आवाज काढतात. हा आजारी पिल्लाचा आवाज ओळखता आला पाहिजे. त्या पिल्लाला त्रास होत असेल तर तातडीने योग्य उपचार करता येतो.
 • जेव्हा बालिंगा (नर) माजावरील मेंढीमागे पळत असतो, त्या वेळी तो एक वेगळा आवाज काढतो. त्या वेळी तो जीभपण बाहेर काढतो.
 • बालिंग्याचे वीर्य (सिमेन) गोळा करताना कृत्रिम योनीमध्ये वीर्य देतेवेळी एक वेगळाच आवाज बालिंगा काढतो.
 • पिल्लू, कोकरू, लाव्हरी, मेंढीचे आवाज त्यांच्या वयानुसार वेगळेच असतात. काही वेळा मेंढीच्या आवाजावरून कळते की ही खूप वयस्कर मेंढी आहे.

काही निरीक्षणे ः

 • कोकराला कानात बिल्ला मारला तरी ते ओरडत नाही. फक्त धडपडते.
 • मेंढीला कानात बिल्ला मारला तरी मेंढीपण ओरडत नाही.
 • मेंढीचा पाय तारेत अडकला किंवा मोडला, गव्हाण अंगावर पडण्यासारखा अपघात झाला तरी मेंढी ओरडत नाही.
 • मेंढीला इंजेक्शन दिले तर त्या वेळी ती ओरडत नाही. त्याच ठिकाणी शेळी असेल तर जोरात ओरडते.
 • तपासणीसाठी लेंडी काढताना मेंढी ओरडत नाही, पण शेळी मोठ्याने ओरडते.
 • एखाद्या मेंढीचे पिल्लू काही कारणास्तव मेले तर संध्याकाळी मेंढी बाहेरून चरून आली की पिल्लासाठी नक्की ओरडते. अशा वेळी एखादे तिळ्यातील किंवा जुळ्यातील दुसऱ्या मेंढीचे लहान पिल्लू आम्ही त्या मेंढीला धरून पाजतो. मात्र तरी देखील दोन ते तीन दिवस ही मेंढी तिच्या मेलेल्या पिल्लासाठी ओरडते. एक आठवड्यानंतर मात्र जे तिचे स्वतःचे नसलेले पिल्लू तिला पाजले जाते त्याच्यासाठी ओरडायला लागते आणि ते पिल्लू स्वतःचे आहे असे समजून आपोआप त्याला पाजू लागते. नंतर ती मेंढी धरावी लागत नाही.

संपर्क ः रूपसिंग खानविलकर, ७४९९९४०९७० 
(पशुसंवर्धन विभाग, निंबकर कृषी संशोधन संस्था, फलटण, जि. सातारा)

टॅग्स

इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...