चिकू पिकातील फांदीमर, करपा रोगाचे नियंत्रण

चिकुवरील पाने व कळ्या खाणारी अळी
चिकुवरील पाने व कळ्या खाणारी अळी

चिकू फळपिकात सद्यस्थितीत फांदीमर, पानावरील करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पाने व कळ्या खाणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात.

फांदीमर : रोगकारक बुरशी : बोट्रीओडीप्लोडीया थिओब्रोमी लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त फांद्यांची पाने सुकतात व गळून पडतात. बुरशीचा प्रसार फांदीच्या टोकाकडून मागे पसरत असल्याने फांदी टोकाकडून मरते.

नियंत्रण :   रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. एक टक्के बोर्डी मिश्रणाची फवारणी करावी. पानावरील करपा : लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त पानांवर तपकिरी चट्टे दिसून येतात. नंतर हे राखेच्या रंगासारखे होतात.  पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. परिणामी उत्पादनात घट येते. नियंत्रण : फवारणी बोर्डो मिश्रण - १ टक्का किंवा कार्बेन्डॅझिम ( ५० टक्के) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी . पाने आणि कळ्या खाणारी अळी  : नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर क्विनाॅलफाॅस (२५ टक्के) २ मि. लि. किंवा निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अॅझाडिरॅक्टीन (५०००० पीपीएम) - ०.५ मि.लि. सूचना : अळीने फांद्यावर तयार केलेली पानांची जाळी आतील अळीसह काढून त्यांचा नाश करावा. संपर्क : ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६ (कृषि संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com