मोसंबी फळगळीवरील उपाय

रस शोषण करणारा पतंग
रस शोषण करणारा पतंग

 कारणे

  • रोगग्रस्त, कीडग्रस्त, दुखापत झालेली किंवा जास्त वयाचे झाड.
  • झाडामध्ये ऑक्झीन संजीवकाचे असंतुलन.
  • कर्ब: नत्र गुणोत्तरामध्ये असंतुलन.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व झाडांना अन्नद्रव्यांची कमतरता.
  • पाण्याच्या ताण किंवा अतिरिक्त वापर.
  • तापमानातील चढउतार.
  • ओलिताचे व्यवस्थापन बरोबर नसणे, कमी किंवा आधिक पाण्यामुळे फळझाडांस ताण बसतो. त्यामुळे फळ गळण्यास सुरवात होते. संतुलित पाण्याचा वापर असल्यास फळझाडांवरील फळांना ताण बसत नाही.
  • कीड नियंत्रण रस शोषण करणा­ऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव ः

  • अंबिया बहाराची फळगळ ही रस शोषण करणा­ऱ्या पतंगामुळे होते.
  • किडीचे प्रौढ पंतग सायंकाळी ७ ते ९ दरम्यानच्या काळात फळांवर बसून आपली सोंड फळात खूपसून रस शोषण करतात. त्या ठिकाणी सुईच्या जाडीचे छिद्र तयार होते. त्यामुळे रोगजंतुना प्रवेश करण्यास मार्ग तयार होतो. रसात साखराचे प्रमाण असल्यामुळे जंतुची वाढ होते. छिद्राभोवती फळे सडायला लागतात. फळे मोठ्या प्रमाणात गळतात.
  •  उपाययोजना

  • प्रकाश सापळ्यांचा उपयोग करावा. बागेत रात्री १०० वॅटचे बल्ब अधून मधून लावावेत. याखाली केरोसिन किंवा कीटकनाशकयुक्त पाणी असलेले पसरट भांडे ठेवावे. विद्यूत प्रवाह नसल्यास गॅसबत्तीचा वापर करावा. पतंग प्रकाश झोताकडे आकर्षित होऊन बल्ब किंवा गॅसबत्तीला धडक देतात आणि भांड्यातील पाण्यात पडतात.
  • पतंगाला आकर्षित करून मारण्यासाठी विषारी आमिषांचा वापर करावा. त्यासाठी दहा लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ आणि  मॅलेथिऑन (०.१ टक्के) २०० मि.लि. मिसळून आमिषाचे द्रावण तयार करावे. साधारणत: २५० मि.लि. द्रावण मोठे तोंड असलेल्या डब्यात टाकावे. हे झाडावर टांगावेत. यासाठी रिकाम्या झालेल्या कीटकनाशकांच्या डब्यांचा वापर करता येतो.
  • पतंगाच्या अळ्या गुळवेल, वासनवेल किंवा तत्सम तणांवर उपजिविका करीत असल्यामुळे परिसरातील या तणांचे नियंत्रण करावे.
  • खाली पडलेली फळे नियमित वेचून खड्ड्यात पुरून टाकावीत.
  • रात्री सात वाजायच्या दरम्यान ओलसर कचरा अधूनमधून जाळून बागेत धूर करावा. परंतु, यामुळे झाडांना इजा होणार नाही यांची दक्षता घ्यावी.
  • रोग नियंत्रण कोलेटोट्रिकम बुरशी देठ पिवळे पडते, देठाजवळ काळा डाग दिसून फळगळ होते. नियंत्रण ः कार्बेन्डाझीम १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी.

    फायटोप्थोरा बुरशी खालच्या बाजूची फळे अगोदर सडण्यास सुरवात होते. नियंत्रण : मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी. पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या. डॉ. एम. बी. पाटील ः ७५८८५९८२४२  डॉ. संजय पाटील ः ९८२२०७१८५४ (फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com