agriculture story in marathi, crop alert infestation of american army worm (Spodoptera Frugiparda)) on maize crop | Agrowon

मका पिकावर नवी कीड अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
डॉ. अंकुश चोरमुले
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही एक अळी असून ती मका या पिकावर प्रामुख्याने आढळून येते. भारतात सर्वप्रथम कर्नाटक राज्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून अाला होता. अाता महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये मका पिकावर या किडीचा प्रादुर्भाव दिसून अाला अाहे. या किडीचे शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा हे आहे. पीक नष्ट करण्याची ताकद असल्यामुळं या किडीला फ्रुगीपर्डा हे नाव देण्यात आले आहे.

अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही एक अळी असून ती मका या पिकावर प्रामुख्याने आढळून येते. भारतात सर्वप्रथम कर्नाटक राज्यात या किडीचा प्रादुर्भाव दिसून अाला होता. अाता महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये मका पिकावर या किडीचा प्रादुर्भाव दिसून अाला अाहे. या किडीचे शास्त्रीय नाव स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा हे आहे. पीक नष्ट करण्याची ताकद असल्यामुळं या किडीला फ्रुगीपर्डा हे नाव देण्यात आले आहे.

नुकसानीचा प्रकार
ही कीड मका पिकाचे पाने खाऊन नुकसान करते. प्रथम अवस्थेतील अळी कोवळ्या पानावर उपजीविका करते. एका बाजूने खरवडून खाल्ल्यामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या पानावर छिद्रे पाडून पानाच्या कडेपासून शिरेकडे  पाने खायला सुरवात करतात. पोंग्यामध्ये असताना जर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास पान उघडल्यानंतर पानावर एका रांगेत गोल छिद्रे दिसून येतात. ही कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळे एका मक्याच्या झाडावर एक किंवा जास्तीत जास्त दोन अळ्या आढळून येतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या अधाशीपणे झाडाची पाने खाऊन पानांच्या फक्त शिराच शिल्लक ठेवतात. मका पिकात सुरवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो, परंतु नंतरच्या अवस्थेत पूर्ण पोंग्याचे नुकसान होते. मक्याच्या एका झाडावर एक अळी असेल तर उत्पादनात जवळपास ५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत घट येऊ शकते.

महाराष्ट्रात इतर भागांत ही कीड पसरू शकते?
महाराष्ट्रामध्ये मका हे पीक कमी-जास्त प्रमाणात सर्वच भागांत घेतले जाते, त्यामुळे इतर भागांत देखील ही कीड पसरण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ऊस, कापूस ही पिके देखील या किडीच्या यजमान वनस्पती आहेत त्यामुळे भविष्यात या किडीचा प्रादुर्भाव ऊस, कापूस या पिकावर झाला आणि जर ही कीड स्थिरावली, तर महाराष्ट्रातील या नगदी पिकांच्या उत्पादकांस मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागेल.

ही कीड इतकी धोकादायक का आहे?
या किडीचे पतंग हे ताकदवान असून एका रात्रीत सुमारे १००  किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात. त्यासोबत या किडीची प्रजनन क्षमतादेखील खूप जास्त आहे. मादी तिच्या जीवनक्रमात सुमारे एक ते दोन हजार अंडी घालते.

नियंत्रणाचे उपाय
शिमोगा कृषी विद्यापीठातील कीटक शास्त्रज्ञ  डॉ. सी. एम. कल्लेश्वरा स्वामी आणि डॉ. शरणबसाप्पा यांनी सुचवलेले नियंत्रणाचे उपाय

  • लॅबडा-सायहॅलोथ्रीन (५ ई सी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी (प्रक्षेत्रावरील चाचण्यांमध्ये या कीटकनाशकाची जैव परिणामकारकता अभ्यासली गेली आहे.)
  • नोमुरिया रिलेयी (जैविक कीटकनाशक) ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणीदेखील उपयुक्त ठरली आहे.

(लेखक सिक्स्थ ग्रेन ग्लोबल या खासगी कंपनीत कार्यरत आहेत.)  

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...