Agriculture story in marathi crop protection practices before sowing | Agrowon

पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा पीकसंरक्षण

एस. सी. बोकन, डॉ. ए. ए. चव्हाण
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल या प्रमुख पिकांची पेरणी केली जाते. तसेच उसाचीही लागवड केली जाते. या पिकांवर येणाऱ्या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्व मशागतीय पद्धत उपयुक्त ठरू शकते. परतीचा पाऊसकाळ लांबल्याने वाफसा नसल्यामुळे अनेक ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. पेरणीवेळी खालील बाबींचा अंमलबजावणी केल्यास पिकाच्या काळातील कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी राखणे शक्य होते.
 
१. रब्बी ज्वारी 
खोड माशी व कीड

रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल या प्रमुख पिकांची पेरणी केली जाते. तसेच उसाचीही लागवड केली जाते. या पिकांवर येणाऱ्या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्व मशागतीय पद्धत उपयुक्त ठरू शकते. परतीचा पाऊसकाळ लांबल्याने वाफसा नसल्यामुळे अनेक ठिकाणी अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. पेरणीवेळी खालील बाबींचा अंमलबजावणी केल्यास पिकाच्या काळातील कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी राखणे शक्य होते.
 
१. रब्बी ज्वारी 
खोड माशी व कीड

 • जमिनीची खोल नांगरट व कुळवणी करून काडी, कचरा वेचून शेत साफ ठेवावे.
 • रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.
 • काही कारणाने पेरणी लांबल्यास, इमिडाक्लोप्रिड (४८ एफएस) १२ मिलि किंवा इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यूएस) १० ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करावी.
 • शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो एकाच वेळी आठवड्याच्या आत पेरणी केल्यास मिजमाशीपासून संरक्षण होते.

रोग : केवडा, काणी

 • स्वच्छ व निरोगी बियाणे वापरावे.
 • बियाण्यास थायरम किंवा मेटालॅक्झिल १ ग्रॅम किंवा गंधकाची ५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

२. गहू 
वाळवी

 • जमिनीची खोल नांगरट करून शेतातील मागील पिकाचे अवशेष काढून टाकावेत.
 • जमिनीच्या उताराला आडवे सारे/सारी पाडून पेरणीसाठी तयार करावी.
 • वाळवीच्या बंदोबस्तासाठी बांधावरील वारुळे नष्ट करावीत. त्यातील राणीचा नाश करावा.
 • जमीन सपाट केल्यावर मध्यभागी ३० सें.मी. खोलवर एक छिद्र करावे. त्यात क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) १.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे वारुळात ओतावे.

रोग : तांबेरा, मूळकुजव्या

 • -रोगमुक्त बियाणे वापरावे गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी.
 • -बियाण्यास थायरम २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया करावी.

३. हरभरा 
घाटे अळी

 • हरभरा पिकात आंतरपीक अथवा शेताभोवती दोन ओळी जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या पिकाची पेरणी करावी, त्यामुळे परभक्षी कीटकांचे संवर्धन होण्यास मदत होईल.
 • हरभरा पिकामध्ये ज्वारीची १०० ग्रॅम बियाणे प्रति हेक्टरी मिसळून पेरणी करावी.
 • पिकांच्या फेरपालटीसाठी ज्वारी किंवा भुईमूग वापरावा.
 • मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
 • एक महिन्यापर्यंत शेत तणविरहित ठेवावे.
 • कोळशी व रानभेंडी यांसारखी पर्यायी खाद्यतणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.

रोग : मर, मूळकुज

 • पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.
 • रायझोबियम व स्फुरद उपलब्ध करणारी जिवाणू संवर्धन २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे बियाण्यांस चोळावे.

४. करडई 

 • हंगाम संपल्यानंतर शेतातील काडीकचरा वेचून नष्ट करावा.
 • पेरणीसाठी कुसूमा, शारदा, भीमा किंवा पीबीएनएस – १२ या मावा व मर रोगास प्रतिकारक्षम असलेल्या जातीचा वापर करावा.
 • पेरणीपासून ४० दिवसापर्यंत पीक तणविरहित ठेवावे.
 • माव्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतातील ग्लिरिसिडिया, चंदन बटवा, तांदूळजा, दुधी या तणांचा नाश करावा.
 • नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर करू नये.

५. सूर्यफूल 

 • पिकांची योग्य फेरपालट करावी. शिफारशीत मात्रेतच नत्रखत द्यावे. त्यापेक्षा अधिक नत्रखत दिल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
 • तुडतुडे व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्लोप्रिड (७० डब्ल्यूएस) किंवा इमिडाक्लोप्रिड (४८ एमएस) ५-९ मिलि प्रति किलो बियाणे या प्रक्रिया करावी.
 • सूर्यफुलाच्या पिकाभोवती असलेल्या गोखरू, गाजर गवत व कोळशी या तणाचा बंदोबस्त केल्यास अनुक्रमे खोडकीड, फुलकिडे व बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.

रोग : केवडा

 • रोपावस्थेत उद्‍भणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा मेटालॅक्झिल ६ ग्रॅम प्रति किलो या प्रक्रिया करावी.

६. ऊस 
खोड व कांडी कीड

 • या किडींचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बेणे लागवडीपूर्वी क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) ४ मिलि प्रति लिटर पाणी या द्रावणामध्ये १५ मिनिटे बुडवून ठेवावे.
 • जमिनीत ओल असल्यास क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) १८.७५ किलो प्रति हेक्टरी लागवडीवेळी किंवा ६० दिवसांनी द्यावे.
 • कांदा, लसूण व कोथिंबीर ही आंतरपिके घ्यावीत, त्यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होईल.

रोग : काणी

 • लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.
 • जमिनीद्वारे उद्‍भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करण्यासाठी बेणे कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणामध्ये १० मिनिटे बुडवावे.

संपर्क ः एस. सी. बोकन, ९९२१७५२०००
डॉ. ए. ए. चव्हाण, ९०७५५३५४९७
(राजीव गांधी कृषी महाविद्यालय, परभणी) 


इतर ताज्या घडामोडी
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...