Agriculture story in marathi cultivation of tuberose crop | Agrowon

निशिगंध लागवड तंत्रज्ञान

डॉ. मोहन शेटे, डॉ. सुनील काटवटे, डॉ. विनय सुपे
शुक्रवार, 20 मार्च 2020

निशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे फुलदाणीत व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात.
  
निशिगंध या फूलपिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानातही जेथे पाण्याची बारमाही सोय असेल, तेथे या पिकाची फायदेशीर लागवड करता येते. अतिथंड हवामान व अतिपाऊस या पिकास हानिकारक ठरू शकतो.

निशिगंध हे एक कंदवर्गीय फूलझाड असून महाराष्ट्रात गुलछडी या नावाने महत्त्वाचे व्यापारी पीक गणले जाते. फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा अथवा फुलदांडे फुलदाणीत व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात.
  
निशिगंध या फूलपिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानातही जेथे पाण्याची बारमाही सोय असेल, तेथे या पिकाची फायदेशीर लागवड करता येते. अतिथंड हवामान व अतिपाऊस या पिकास हानिकारक ठरू शकतो.

जमीन
पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन चांगली मानवते. जमिनीचा सामू साधारण ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. हलक्‍या जमिनीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा किंवा लागवडीपूर्वी हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ते जमिनीत कुजण्यासाठी गाडावे. शक्‍यतो लागवडीसाठी चुनखडीयुक्त, हरळी आणि लव्हाळायुक्त जमिनीची निवड करू नये.

लागवड
निशिगंध हे पीक बहुवर्षीय असून एकदा लागवड केल्यास त्याच जमिनीत सतत तीन वर्षे ठेवता येते किंवा प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते. एप्रिल - मे महिन्यात लागवड करावी. लागवडीसाठी २० ते ३० ग्रॅम वजनाचे किंवा त्याहून अधिक वजनाचे कंद वापरावेत. निवडलेले कंद ०.२ टक्के तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशक द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लागवडीस वापरावे. लागवड सपाट वाफ्यात अथवा गादी वाफ्यावर ३०x३० सेंमी अंतरावर ५ ते ७ सेंमी खोलीवर करावी. एका ठिकाणी एकच कंद लावावा. हेक्‍टरी ७० ते ८० हजार कंद पुरेसे होतात.

अन्नद्रव्य व्यवस्थापन
हेक्‍टरी ४० ते ५० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश द्यावा. शेणखत लागवडीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे. लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. उरलेले १५० किलो नत्र तीन समान हप्त्यांत लागवडीनंतर ३०, ६० व ९० दिवसांनी द्यावे. लागवडीनंतर आठ- दहा दिवसांनी १० किलो ॲझोटोबॅक्‍टर किंवा ॲझोस्पिरीलम १०० किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत आणि ट्रायकोडर्मा प्रत्येकी १० किलो, १०० किलो ओलसर शेणखत वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्‍टर निशिगंधाच्या पिकास द्यावे.

पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर पावसाळ्यात पाऊस नसेल तर १० ते १२ दिवसांनी, हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी, तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे नियमित पाणी द्यावे. फुलांचे दांडे येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमितपणे पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
 
प्रकार व जाती

फुलांच्या पाकळ्यांची संख्या आणि पानांच्या रंगानुसार सिंगल, डबल, सेमिडबल व व्हेरिगेटेड असे मुख्य चार प्रकार गुलछडीत आहेत.

  • सिंगल प्रकारात - स्थानिक सिंगल, शृंगार, अल्का प्रज्वल व फुले रजनी या जाती आहेत.
  • डबल प्रकारात - स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव आणि फुले रजत या जाती आहेत.
  • व्हेरिगेटेड प्रकारात - सुवर्ण रेखा, रजत रेखा, सिक्कीम लोकल आणि स्थानिक जातींचा समावेश होतो.
  • निशिगंध फुलांपासून ०.०८ ते ०.११ टक्के सुगंधी द्रव्ये मिळू शकतात.

फुलांची काढणी व उत्पादन

  • कंद लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनी फुले काढणीस येतात. पूर्ण वाढ झालेल्या कळ्यांची व उमललेल्या फुलांची काढणी नेहमी सकाळी ५ ते ८ किंवा संध्याकाळी ६ ते ७ वाजता करावी.
  • फुलदाणीत किंवा पुष्पगुच्छासाठी सर्वांत खालची दोन- तीन फुले उमलत असलेले फूलदांडे जमिनीलगत पानांच्या वरील बाजूस छाटावेत. अशा छाटलेल्या फूलदांड्यांच्या एक एक डझनाच्या जुड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून बांबूच्या किंवा कागदाच्या बॉक्‍समध्ये भरून दूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवाव्यात.
  • सर्वसाधारण हेक्‍टरी ८ ते १० लाख फूलदांडे मिळतात, तर सुट्या फुलांचे उत्पादन हेक्‍टरी ७ ते ८ टन मिळते. सुट्या फुलांना भारतीय बाजारपेठेत भरपूर व नियमित मागणी असल्याने अशी फुले बाजारपेठेत पाच ते सात किलो क्षमतेच्या बांबूच्या किंवा कागदाच्या बॉक्‍समध्ये भरून दूरच्या बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत.
  • सुट्या फुलांपासून गुलछडी अर्क हे सुंगधी द्रव्य (०.०८ ते ०.११ टक्के) काढता येते. अशा द्रव्यास परदेशांतूनही चांगली मागणी असते.

संपर्क ः डॉ. मोहन शेटे, ०२० - २५६९३७५०
(सहयोगी संशोधन संचालक (मैदानी प्रदेश), गणेश खिंड, पुणे)


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...