agriculture story in marathi, custerd apple processing | Agrowon

अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर उपयुक्त
माधुरी रेवणवार
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे आणि गर टिकवून ठेवणे गरजेचे आहे. सीताफळ प्रक्रियेबद्दल म्हणावी तेवढी जागरुकता नाही. सीतापळावर प्रक्रिया करून चांगला लघुउद्याोग सुरू करून ग्रामीण भागातील महिला चांगला फायदा मिळवू शकतात.

सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे आणि गर टिकवून ठेवणे गरजेचे आहे. सीताफळ प्रक्रियेबद्दल म्हणावी तेवढी जागरुकता नाही. सीतापळावर प्रक्रिया करून चांगला लघुउद्याोग सुरू करून ग्रामीण भागातील महिला चांगला फायदा मिळवू शकतात.

सीताफळामध्ये पाण्याचे अधिक प्रमाण असल्यामुळे हे फळ नाशवंत फळामध्ये येते. पूर्ण पिकलेले सीताफळ एक अथवा दोन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. म्हणून सीताफळावर प्रक्रिया करून त्याचा गर काढून साठवून ठेवला तर तो वर्षभर वापरता येतो. यामुळे एक ते दोन महिना कालावधी असलेल्या या फळाचा आस्वाद पूर्ण वर्षभर हवा तेव्हा घेता येतो. जास्त प्रमाणात फळे उपलब्ध असतील किंवा विक्री अभावी वाया जाणार असतील किंवा खूप कमी भाव मिळत असेल तेव्हा प्रक्रिया करून सीताफळाचे मूल्यवर्धन होते.

सीताफळातील पोषक घटक

 • १०० ग्रॅम सीताफळामधील पोषणमूल्य
 • ऊर्जा ः १०४ किलो कॅलरी
 • प्रथिनेः १.६ ग्रॅम
 • कार्बोदके ः २३.५ ग्रॅम
 • तंतू ः ३.१ ग्रॅम
 • फॅट ः ०.४ ग्रॅम

खनिजे

 • कॅल्शिअम ः ९७ मि.ग्रॅम
 • फॉस्फरस ः ४७ मि. ग्रॅम
 • लोह ः ४.३१ मि. ग्रॅम
 • मॅग्नेशियम ः ८४ मि. ग्रॅम

जीवनसत्वे

 • जीवनसत्व क ः ३७ मि.ग्रॅम
 • नायसिन ः १.३ मि. ग्रॅम
 • रायबोल्फेविन ः ०.१७ मि. ग्रॅम

सीताफळ गर

 • पिकलेली आणि जास्त पाकळी युक्त सीताफळे निवडावीत.
 • सीताफळाचे दोन भाग करून आतील गर बियासहीत चमच्याने काढून घ्यावा.
 • बियांचा गर हाताने काढून वेगळा करावा. अथवा, सीताफळ गर काढण्याच्या मशिनद्वारे गर आणि बिया वेगळ्या कराव्या.
 • काढलेल्या एक किलो गरामध्ये एक ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईड हा संरक्षक पदार्थ टाकून पॅकिंग करावी.
 • हा गर २० अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावा.
 • चांगल्या दर्जाच्या फळापासून ३० ते ३५ ग्रॅम गर मिळतो.

सीताफळ गराचे पदार्थ
सीताफळ गर वापरून मिल्क शेक, ज्यूस, बासुंदी, रबडी, आईस्क्रीम असे पदार्थ तयार करता येतात. तसेच गराला वाळवून सीताफळ पावडर; कस्टर्ड पावडरदेखील करता येतो. ज्याचा उपयोग फ्रूट कस्टर्ड, आइस्क्रीम आणि अनेक गोड पदार्थांमध्ये केला जातो. या पदार्थांमुळे बाजारामध्ये सीताफळ गराला सध्या चांगली मागणी आहे. सीताफळाच्या किमतीपेक्षा चार ते पाच पट जास्त उत्पादन मिळू शकते.
 
संपर्क ः माधुरी रेवणवार, ०२४६५-२२७७५७, ९४०३९६२०१४
(गृहविज्ञान तज्‍ज्ञ, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, ता. बिलोली जि. नांदेड)

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
उसापासून साखर निर्मितीची प्रक्रिया जागतिक पातळीवर साखर उद्योग उत्तम विकसित झाला असून...
करटोलीपासून प्रक्रिया पदार्थ करटोली ही रानभाजी असून, त्याच्या विशिष्ट चवीसाठी...
कापूस पऱ्हाट्यांपासून ब्रिकेट, पेलेट...पांढरे सोने या नावाने ओळखले जाणारे कापूस पीक...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
जांभळापासून बनवा जॅम, जेली, टॉफी,पावडरजॅम     परिपक्व जांभळाची फळे निवडून...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोडगोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला...
आरोग्यवर्धक पौष्टिक राजगिराधान्यांच्या तुलनेत राजगिऱ्यामध्ये कॅल्शिअम हे...
औषधी अन् आरोग्यदायी करवंदकरवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर...
बेल फळापासून बनवा जॅम, कॅन्डी, स्क्वॅशबेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर...
आरोग्यास उपयुक्त कुळीथआयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी...
आरोग्यदायी शेवगा भुकटीचे उपयोगशेवगा वनस्पतीचे इंग्रजी नाव ड्रमस्टिक असे असून,...
केळीपासून बनवा जेली, प्युरी, ज्यूस केळीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. केळी शरीरातील...
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...