सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची सेवा

आपली शेती म्हणजे जणू प्रात्यक्षिक प्लॉटस म्हणून तयार करायचे असा निश्‍चय केला. त्यानुसार पीकपद्धती व शेतीची रचना आखली आहे. -दादा काळे
 इंडो इस्त्रायल पद्धतीने संत्रा लागवड. मल्चिंगचा वापर.
इंडो इस्त्रायल पद्धतीने संत्रा लागवड. मल्चिंगचा वापर.

सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा  काटोल येथील मंडल कृषी अधिकारी दादासाहेब केशवराव काळे २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले. पण आरामदायी जीवन पसंत न करता त्यांनी प्रयोगशील शेतीलाच वाहून घेतले आहे. आपले क्षेत्र म्हणजे शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक प्लॉट ठरावेत असे उद्दिष्ट ठेवून त्यांनी पीक पद्धती व विविध तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. इंडो इस्त्रायल पद्धतीने संत्र्याची शेती, जोडीला मोसंबी, हंगामी पिके व दुग्ध व्यवसाय अशी विविधता त्यांनी आपल्या शेतीत साकारली आहे.    नागपूर-काटोल हा भाग संत्रा पिकासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. दादासाहेब काळे येथे मंडल कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. कृषी विभागात सुमारे ३३ वर्षे नोकरी केल्यानंतर २०१६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तेलगाव (ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर) हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील केशवराव हेदेखील शेतकरीच होते. या संयुक्‍त कुटुंबाची गावात ६० एकर शेती. यामध्ये सिंचनाची सोय तीन किलोमीटरवरील कोलार प्रकल्पावरून केली आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू यासारखी हंगामी पिके इथे होतातच. पण पाण्याची सोय झाल्यानंतर दहा वर्षांपूर्वी या शिवारात ३० एकरांत संत्रा लागवड करण्यात आली.  प्रयोगशील शेतीचा अंगीकार 

  • सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवन पसंत न करता काळे यांनी शेतीलाच पूर्ण वेळ वाहून घेतले आहे. तेलगावपासून १२ किलोमीटरवर असलेले झिल्पा गावात काळे यांचे वडील केशवराव यांनी ५० एकर क्षेत्र १९९६ मध्ये खरेदी केले. काळे यांनी वडिलांचाच वारसा जपताना प्रयोगशील शेतीचा अंगीकार केला आहे. 
  • तेलगाव येथील क्षेत्र- संत्रा- एकूण सुमारे ३००० झाडे, सहा बाय सहा मीटर अंतरावर लागवड 
  • झिल्पा क्षेत्र- इंडो इस्त्रायल पद्धतीने व सहा बाय तीन मीटर अंतरावर संत्रा लागवड 
  • येथील हेक्टरी झाडांची संख्या- सुमारे ५५० 
  • एकूण झाडे- ८००० 
  • संत्रा आणि मोसंबी झाडांचा विकास अलीकडील तीन ते साडेतीन वर्षांचा. अद्याप उत्पादन सुरू व्हायचे आहे. संत्रा बागेत फ्लॉवर, वांगी, मिरची, टोमॅटो ही पिके घेण्यात आली आहेत. 
  • माझ्या शेतात करून दाखवेन  काळे म्हणाले की, नोकरीत असताना अनेक ठिकाणी चर्चासत्रांना जावे लागे. विविध भेटी होत. त्या वेळी लेक्चर देणे सोपे असते. पण शेतात करून दाखवणे अवघड असते असे टोमणे ऐकावे लागत. ही गोष्ट मनाला खूप वेदना द्यायची. अखेर आपल्याच क्षेत्रात सुधारीत शेती करायची. विविध तंत्रांचा वापर करायचा. आपली शेती म्हणजे जणू प्रात्यक्षिक प्लॉटस म्हणून तयार करायचे असा निश्‍चय केला. त्यानुसार पीकपद्धती व शेतीची रचना आखल्याचे काळे म्हणाले.  तंत्रज्ञान सुधारणा 

  • काळे यांच्या वडिलांनी पूर्वी १५ एकरांवर संत्रा लागवड केली होती. काही झाडे वाळल्याने ती काढण्यात आली. बागेत मल्चिंग करून खाडे पडलेल्या ठिकाणी इंडो इस्त्रायल पद्धतीने नवीन झाडांची लागवड. 
  • झिल्पा येथील शेतात शंभर टक्के स्वयंचलित ठिबक. या यंत्रणेवर सुमारे ७० लाख रुपयांचा खर्च. 
  • तंत्रज्ञानासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. 
  • आसामहून ८५० रुपये प्रति मीटरप्रमाणे कुंपणाची खरेदी. यास काटेरी दाते असल्याने वन्यप्राणी वा मनुष्याला शेतात प्रवेश करणे अशक्य. याला विजेच्या प्रवाहाचीही गरज नाही. संपूर्ण ५० एकर शिवार या माध्यमातून संरक्षित. 
  • पंचवीस रुपये प्रति चौरस फूट दर असलेल्या खास मल्चिंगचा वापर संत्रा, मोसंबी लागवडीसाठी. 
  • सूर्याची अतीनील किरणे यातून प्रवेश करीत नाहीत. परंतू सच्छिद्र असल्याने हवा आणि पाणी मात्र मुळांना मिळते असे वैशिष्ट्य. पाण्याची ५० ते ६० टक्‍के बचत शक्‍य. 
  • झिल्पा येथे फार्महाउस. येथे राहून शेतीचे व्यवस्थापन करणे शक्‍य. 
  • कीडनाशकचे द्रावण तयार करण्यासाठी सात हजार लिटर क्षमतेचा सिमेंट टॅंक. 
  • संत्रा झाडाला जीवामृत, शेण स्लरीचा पुरवठा होण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेचा मड-पंप 
  • पारंपरिक संत्रा बागेतून एकरी १० टनांंपर्यंत उत्पादन. दहा एकरांवरील हरभऱ्याचे मागील वर्षी 
  • एकरी आठ क्‍विंटलप्रमाणे तर कपाशीचे १० क्विंटलपर्यंत उत्पादन. 
  • भागीदारीत दुग्ध व्यवसाय  पूर्वी ५० गावरान गायी व ३० म्हशी काळे कुटुंबीयांकडे होत्या. पंधरा वर्षे या व्यवसायात सातत्य होते. चारा, मजूर टंचाई भेडसावू लागल्याने या व्यवसायातून माघार घ्यावी लागली. मात्र दोन वर्षांपूर्वी काटोल येथील राजू माळोदे यांच्या भागीदारीत पुन्हा व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे. तीस एचएफ गायींचे संगोपन होते. सुमारे १७५ लिटर दुधाचे संकलन दररोज होते. विक्री काटोल येथील खवा व्यावसायिकाला होते. पाच एकरांत जनावरांसाठी मका लागवड केली आहे. 

    संपर्क- दादासाहेब काळे- ९४२२१४९२९८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com