धान्यासहित कडब्यासाठी दादर ज्वारी आश्‍वासक

कमी पाणी व अल्प खर्चात सकस धान्य, पशुधनासाठी दर्जेदार चारा व पुरेसा नफा देणारे पीक म्हणून खानदेशात दादर ज्वारीची ओळख आहे. काही शेतकऱ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन, सुधारित वाणांद्वारेपिकात हातखंडा तयार केला आहे. त्यांच्याकडील धान्य व कडब्याला कायम चांगली मागणी असते.
 आपल्या दादर ज्वारी पिकात शेतकरी देवेंद्र पाटील (उजवीकडे). समवेत धुळे येथील बीजप्रमाणीकरण अधिकारी उमाकांत पाटील.
आपल्या दादर ज्वारी पिकात शेतकरी देवेंद्र पाटील (उजवीकडे). समवेत धुळे येथील बीजप्रमाणीकरण अधिकारी उमाकांत पाटील.

कमी पाणी व अल्प खर्चात सकस धान्य, पशुधनासाठी दर्जेदार चारा व पुरेसा नफा देणारे पीक म्हणून खानदेशात दादर ज्वारीची ओळख आहे. काही शेतकऱ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन, सुधारित वाणांद्वारे पिकात हातखंडा तयार केला आहे. त्यांच्याकडील धान्य व कडब्याला कायम चांगली मागणी असते.   खानदेशात रब्बी हंगामातील ज्वारीस दादर म्हटले जाते. तापी, गिरणा, गोमाई, पांझरा आदी नद्यांच्या काठी काळी कसदार जमीन आहे. पूर्वी या भागात पाऊस अधिक असायचा. नद्यांचे पाणी अनेकदा शेतांमध्ये शिरायचे. अशावेळी रब्बीत प्रतिकूल परिस्थितीत दादरचे पारंपरिक वाण नदीकाठी घेतले जायचे. काळ्या कसदार जमिनीत अपवाद वगळता कोरडवाहू दादर अधिक असते. काही शेतकरी सिंचन एकदाच करतात. दादर ज्वारीसाठी जळगावमधील चोपडा विशेष प्रसिद्ध तर अमळनेर, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा व तळोदा या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. चोपडा तालुक्यात पेरणीक्षेत्र १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. शेतकरी अनुभव देवेंद्र यांचा बीजोत्पादनात हातखंडा घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) गाव तापीकाठी आहे. देवेंद्र स्वतः शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. एकूण ७० एकर शेती आहे. यातील ३० एकर कोरडवाहू असून तीन सालगडी आहेत. सहा कूपनलिका, ट्रॅक्टर, पाच सालगडी आहेत. देवेंद्र कृषी पदवीधर असल्याने शेतीसाठी ज्ञानाचा उपयोग करून घेतात. त्यांचे ज्वारीचे नियोजन असे.

  • दरवर्षी १० ते १५ एकरांत पेरणी. यंदा ११ एकर. पूर्वी वडील पारंपरिक वाण घ्यायचे. आता कृषी विद्यापीठांचे संशोधित वाण उदा. फुले रेवती, परभणी मोती.
  • १० वर्षांपासून बियाणे कंपन्यांसाठी बीजोत्पादन.
  • एकरी चार किलो बियाणे वापरतात. त्यासाठी ४०० रुपये खर्च.
  • उगवणीनंतर खोडकिडीसाठी एक फवारणी.
  • पेरणीनंतर महिनाभरात विरळणी. त्यासाठी एकरी ४०० रुपये खर्च.
  • ओलितावर पेरणी. पीक दीड महिन्याचे झाल्यानंतर सिंचन. त्यानंतर शक्यतो नाही.
  • बैलजोड्यांच्या मदतीने आंतरमशागत.
  • रासायनिक खते एकदा देतात. कीडनाशकांचा वापर नाही.
  • नऊ ते 10 फुटांपर्यंत ताट्यांची वाढ
  • एकरी १० ते १५ क्विंटल व क्वचित प्रसंगी २० क्विंटलपर्यंतही धान्य उत्पादन तर एकरी किमान १५० ते २०० पेंढ्या उत्पादन.
  • अलीकडील काळात क्विंटलला २५०० ते ३००० रुपये दर.
  • कडब्याला २४०० ते ३,००० रुपये प्रतिशेकडा दर गेले तीन वर्षे मिळाला.
  • दोन बैलजोड्या, तीन गायी, दोन म्हशी असल्याने घरीही दादरच्या कुट्टीची साठवणूक.
  • घरच्या चाऱ्यामुळे त्यावरील सुमारे ४५ हजार रुपये खर्चाची बचत
  • बीजोत्पादनासाठी बाजारभावापेक्षा २० टक्के अधिक दर.
  • संपर्क- देवेंद्र पाटील, ७३५०९९४८१५
  • पाटील यांचे नियोजन सनपुले (ता. चोपडा) येथे तापी नदीकाठी किरण पाटील यांची ५० एकर काळी कसदार शेती आहे. ट्रॅक्टर, तीन सालगडी अशी यंत्रणा आहे. ३० ते ३५ वर्षांपासून ते कोरडवाहू क्षेत्रात दादर ज्वारी घेतात. चार कूपनलिका आहेत. केळी, ऊस आदी पिकेही असतात. दरवर्षी उडीद व मुगानंतर रिकाम्या झालेल्या सात एकरांत दिवाळीनंतर पेरणी होते. त्यांचे थोडक्यात नियोजन असे.

  • रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करतात. एकरी ४०० रुपये खर्च.
  • बियाणे घरचेच. एकरी सात किलो.
  • बीज अंकुरल्यानंतर महिनाभरात विरळणी. त्यास एकरी ४०० रुपये खर्च येतो.
  • सिंचनाची गरज नसल्याने आंतरमशागत करावी लागत नाही. तणनियंत्रणासाठी कुठलाही खर्च येत नाही.
  • रासायनिक खते, कीडनाशके यांचीही गरज फारशी नसते. त्यामुळे रासायनिक अवशेषमुक्त म्हणता येते.
  • पक्ष्यांपासून पीक संरक्षणासाठी एका मजुराची नियुक्ती सुमारे दीड महिन्यासाठी करावी लागते.
  • उत्पादन एकरी कडब्याच्या २०० पेंढ्या मिळतात. शेकडा साडेतीन हजार रुपये दर आहे. घरच्याच पशुधनासाठी त्याचा उपयोग होतो. एकरी किमान २५ हजार रुपये नफा या पिकात मिळतो. तीन वर्षांपासून सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाले आहेत. संपर्क- किरण पाटील, ९४२०२०३०३४   कडब्याला महत्त्व

  • यंदा पेरणी अधिक आहे तेथे किमान दर तीन हजार रुपये तर पेरणी कमी असलेल्या क्षेत्रात साडेचार हजार रुपये प्रतिशेकडा दर
  • दूध उत्पादक दादरच्या कुट्टीची साठवणूक करतात. यामुळे कडब्याला सर्वत्र मोठा उठाव.
  • एकरी पाच हजार ते सहा हजार रुपये उत्पन्न त्यातून शेतकऱ्यांना मिळते. खरेदी मध्य प्रदेश, गुजरातमधील दूध उत्पादकही करतात.
  • परजिल्ह्यातील दूध उत्पादकांचीही खानदेशातील शेतकऱ्यांकडे दरवर्षी आगाऊ नोंदणी.  
  • खानदेशातील दादर ज्वारी पेरणी (हेक्टर)
  • २०१८-१९- २९ हजार
  • २०१९-२० - ३८ हजार
  • २०२०-२१- ४१ हजार
  • दर (प्रतिक्विंटल, रुपयांत) वर्ष   किमान  कमाल      सरासरी दर २०१९ २२००     ३४००         २८०० २०२० १६००      २८००        २४०० २०२१ २४००      ३४००         ३०००   ज्वारीचे सुधारित वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (राहुरी) संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व डॉ. शरद गडाख यांनी दिलेली माहिती

  • फुले रेवती बागायतीसाठी, फुले वसुधा भारी जमिनीसाठी, फुले सुचित्रा मध्यम तर हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा
  • दरवर्षी सुमारे १५० शेतकरी पाचोरा, अमळनेर, चोपडा भागात फुले रेवती, वसुधा वाणांचे बीजोत्पादन घेतात.
  • राज्यात दरवर्षी २२ लाख हेक्टरवर रब्बी ज्वारी. सोलापूर, नगर व पुणे जिल्ह्यात राज्यातील ५० टक्के क्षेत्र. मात्र उत्पादकता कमी आहे. तुलनेने खानदेशाची उत्पादकता अधिक.
  • जळगाव जिल्ह्यात फुले रेवती वाणाची उत्पादकता एका शेतकऱ्याकडे ठिबक व अन्य व्यवस्थापनातून ७० क्विंटल हेक्टरी मिळाली आहे.
  • ज्वारीच्या १२५ उपपदार्थांवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्य
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com