ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
यशोगाथा
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी देण्याचे तंत्र
साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या दादासाहेब शिंदे यांनी शेतीतील व्यासंग कायम जपला आहे. कुशल बुद्धी व तांत्रिक अनुभवाचा वापर करून ट्रॅक्टरचलित टॅंक, मडपंप व पाईप्स यांची यंत्रणा त्यांनी तयार केली आहे. या तंत्राद्वारे केवळ एका मनुष्यबळादारे व कमी वेळेत बागेच्या दोन्ही बाजूंना शेणस्लरी देणे शक्य झाले आहे. त्यातून खतांवरील खर्चही दीडपट ते दुपटीने कमी केला आहे.
साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या दादासाहेब शिंदे यांनी शेतीतील व्यासंग कायम जपला आहे. कुशल बुद्धी व तांत्रिक अनुभवाचा वापर करून ट्रॅक्टरचलित टॅंक, मडपंप व पाईप्स यांची यंत्रणा त्यांनी तयार केली आहे. या तंत्राद्वारे केवळ एका मनुष्यबळादारे व कमी वेळेत बागेच्या दोन्ही बाजूंना शेणस्लरी देणे शक्य झाले आहे. त्यातून खतांवरील खर्चही दीडपट ते दुपटीने कमी केला आहे.
सिंदोन (ता. जि.औरंगाबाद) येथील दादासाहेब दौलतराव शिंदे यांची १६ एकर शेती आहे. ‘चीफ केमिस्ट’, त्यानंतर सहवीज निर्मिती व्यवस्थापक व स्वेच्छानिवृत्तीवेळी ‘जनरल मॅनेजर’ अशा विविध पदांवर त्यांनी साखर कारखान्यांमधून सेवा बजावली. सन २०१३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते पूर्णवेळ शेती करीत आहेत. डाळिंब हे त्यांचे मुख्य पीक आहे. त्याचे जुने व नवे मिळून सुमारे ११ एकर क्षेत्र आहे. सुमारे २८०० झाडे आहेत. त्यांनी गावात सर्वांत आधी डाळिंबाची लागवड केली. पिकातील योजनांसाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची मदत घेतली.
डाळिंबासाठी शेणस्लरी देण्याचे तंत्र
दादासाहेब पूर्वी डाळिंब बागेला रासायनिक खते देत. त्यावरील खर्च सुमारे एक लाखांपर्यंत व्हायचा. पूर्वी मजुरांच्या साहाय्याने ते पाच एकर बागेला नियमितपणे द्यायचे. दहा किलो गायीचे शेण अधिक १० लीटर गोमूत्र अधिक पाच किलो गूळ यांचे मिश्रण तीन दिवस डिकंपोज करून मजुरांच्या साहाय्याने झाडाच्या खोडाशेजारी दिले जायचे. यात मनुष्यबळ, श्रम व पैसे खर्च होत. ही प्रक्रिया देखील किचकट असायची. सहकारी साखर कारखान्यात २२ वर्ष नोकरी केलेल्या व वयाच्या साठीत असलेल्या दादासाहेबांकडे कुशल बुद्धी व तांत्रिक ज्ञानाचा अनुभव आहे. त्या जोरावर त्यांनी शेणस्लरी यांत्रिक व सोप्या प्रकारे देण्याची पद्धत तयार केली. ती अशी.
- स्थानिक कारागिराकडून गरजेनुसार संयंत्र बनवून घेतले. यू ट्यूबवर मिळालेल्या माहितीचा उपयोग करुन घेतला. यासाठी ६३ हजार रुपये खर्च आला.
- २४ एचपीच्या ट्रॅक्टरचा उपयोग. ट्रॅक्टरच्या पाठीमागे एका सांगाड्यावर शेणस्लरी भरण्यासाठी एकहजार लीटर क्षमतेचा स्टोरेज टॅंक.
- शेणस्लरी झाडांना देण्यासाठी तीन एचपीचा मडपंप. ट्रॅक्टरच्या पाठीमागील सांगाड्यावर सुरुवातीस मडपंप व त्यानंतर स्टोरेज टॅंक बसविला.
- दोन्हींमध्ये चार व्हॉल्व्हज.
- मडपंपास एका बाजूस हौदातील शेणस्लरी टाकीत ओढण्यासाठी पाईप. दुसऱ्या बाजूचा
- पाईप हा टाकीत शेणस्लरी टाकण्यासाठी.
- टॅंकमधील शेणस्लरी डाळिंब बागेच्या दोन्ही बाजूंना देण्यासाठी दोन आऊटलेट पाईप्स.
- शेणस्लरी घट्ट होऊन जमा होऊ नये म्हणून टाकीच्या खालील बाजूस शाप्ट. ट्रॅक्टर सुरू असताना तो फिरत असल्याने शेणस्लरी सतत ढवळली जाते.
- ट्रॅक्टरचा वेग १२०० आरपीएम असताना पीटीएओ शाप्टचा आरपीएम ५४०. पुलीच्या साह्याने मंडपंपाला २८०० आरपीएम वेग देऊन शेणस्लरीचा दाब नियंत्रित ठेवण्यात येतो.
वैशिष्ट्य़े
- सुमारे २५० झाडांसाठी एकहजार लीटर टॅंक स्लरी पुरते.
- सुमारे २८०० झाडे पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लागतात.
- केवळ एक मनुष्य ही यंत्रणा असलेला ट्रॅक्टर चालवू शकतो.
फिलींग युनिट
शेणस्लरी भरण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा हौद. त्याची क्षमता आठहजार लीटरची.
त्याच्या बाजूला पाण्याचा हौद. टॅंकमध्ये भरायच्या वेळी शेणस्लरी पाणी टाकून पातळ केली जाते. ट्रॅक्टर सुरू केला की मडपंप सुरू होतो. हौदातील शेणस्लरी टाकीत भरली जाते.
या तंत्राचे झालेले फायदे
- स्लरी देण्यासाठी लागणारे मजूरबळ, वेळ. श्रम यात बचत
- खतांच्या वापरावर व खर्चावर दीडपट ते दुपट्ट बचत
पाचटाचे मल्चिंग :
- डाळिंबाच्या बेडवर पाचटाचे मल्चिंग. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.
- शेणस्लरी पाचटावर पडली जात असल्याने ते लवकर कुजण्याची प्रक्रिया होते.
- मल्चिंगमुळे तणांचा प्रादुर्भाव नाही. बेडची माती भुसभुशीत.
- -जमीन अधिक सुपीक होण्यासाठी पीएसबी, ट्रायकोडर्मा, वेस्ट डिकंपोजर, विविध मित्रबुरशी व जिवाणूंच्या मिश्रणांचाही वापर.
बायोगॅसची उभारणी :
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दादासाहेबांना बायोगॅस उभारणीसाठी मार्गदर्शन केले. पाच जनावरे आहेत. त्यांच्या शेणापासून बायोगॅस तयार होतो. त्यापासून १० मजुरांचा स्वयंपाक होतो.
अन्य वैशिष्ट्य़े
- विजेवर अवलंबून न राहता पाच एचपीचा सोलर पंप विहिरीवर बसवला. पाच लाख रुपये खर्च आला. नाबार्डकडून दोन लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान.
- स्वयंचलित खत व्यवस्थापन प्रणाली उभारली आहे.
बांधावर नारळ :
- बांधावर गवत वाढते. हा त्रास कमी करण्यासाठी त्या जागेत नारळ व आंब्याची लागवड
- गेल्यावर्षी ४०० शहाळी २० ते २५ रुपये प्रति नग दराने व्यापाऱ्यांना विकली.
संपर्क- दादासाहेब शिंदे- ९८२२५०४२०५
बायोगॅस उभारणी योजना
- केंद्र शासनाची बायोगॅस उभारणी योजना महाराष्ट्रात ग्रामविकास विभागामार्फत कृषी विभागाच्या मदतीने अनुदानावर राबवली जाते.
- राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रम असे नाव
- -आरसीसी पद्धतीने ‘बायोगॅस’ ची उभारणी. त्यामुळे २५ वर्षांपेक्षा जास्त काळ सुस्थितीत राहू शकते.
- दोन घनमीटर आकाराचे आरसीसी दीनबंधू बायोगॅस युनिट बांधण्यासाठी लाभार्थीस केंद्र शासनामार्फत १२ हजार रुपयांचे अनुदान. औरंगाबाद जिल्हा परिषद सेसमधूनही अनुदान
- युनिट बांधण्यास २६ ते २८ हजार रुपये खर्च.
- युनिटमध्ये दररोज दोन ते चार टोपले शेणखत टाकले की सुमारे ८ जणांचा स्वयंपाक होतो. घरची चार जनावरे असली तरी पुरेसे होते.
संपर्क- आनंद गंजेवार-९४२२१८६४८३
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)
फोटो गॅलरी
- 1 of 91
- ››